जाहिरात
जाहिरात
Home >> International

International

 • कैरो - इजिप्तचे बडतर्फ राष्ट्रध्यक्ष होस्री मुबारक यांच्याविरुद्धच्या खटल्याला बुधवारी सुरुवात झाली. गेली तीन दशके एकहाती सत्ता उपभोगणा-या मुबारक यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात 850 आंदोलकांना ठार मारण्याचा आदेश देणे तसेच भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या खटल्याच्या सुनावणीसाठी मुबारक त्यांचे दोन पुत्र आणि अन्य सहका-यांसोबत कैरोत दाखल झाले. दरम्यान, खटल्याला विरोध करण्यासाठी न्यायालय परिसरात मुबारक समर्थकांनी गर्दी केली. स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात...
  August 4, 12:36 AM
 • इस्लामाबाद। भारतीय चॅनेलला पाकिस्तान सरकारकडून परवानगी मिळाली नसल्याचे एका मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या चॅनेलचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. भारतीय चॅनेलला परवाना हवा होता; परंतु सदर वाहिनीवरून केवळ भारतीय आशयाचे प्रसारण करण्यात येणार होते. त्यामुळे पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक मंडळाने परवाना दिला नाही. दरम्यान, पाकिस्तानात २३ भारतीय खासगी वाहिन्या भारतीय कार्यक्रमांचे प्रसारण करतात; परंतु नियमानुसार खासगी टीव्ही वाहिनीला १० टक्के एवढाच परदेशी आशय देण्याची...
  August 4, 12:31 AM
 • लाहोर - पाकिस्ताने मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेला भारतीय नागरिक सरबजीत सिंहशी संबंधित एका खटल्याची सुनावणी २० सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकली. सरबजीतला पाक राष्ट्रपतींकडून मिळणाया संभाव्य माफीविरोधात ही याचिका दाखल केली आहे. १९९० मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील कथित सहभागाबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले असून मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
  August 4, 12:29 AM
 • मेलबर्न - ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवरील वाढत्या हल्ल्याच्या घटनांमुळे इथे येण्यास विद्यार्थी अनुत्सुकता दाखवत आहेत. गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियात व्हिसासाठी अर्ज करणा-या विद्यार्थ्याच्या संख्येत ६३ टक्क्यांनी कमतरता आली असल्याचे एका अहवालत सांगण्यात आले आहे. स्थलांतरित रहिवासी खात्याच्या जून महिन्यातील अहवालानुसार २००९-१० या वर्षात १८ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी व्हिसासाठी अर्ज केले होते. गेल्या वर्षी या संख्येत घट होऊन ६ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी व्हिसासाठी अर्ज...
  August 4, 12:24 AM
 • रोजेस - जगातील सर्वांत उत्कृष्ट रेस्टॉरंटचा बहुमान प्राप्त करणारे स्पेनचे एल बुली रेस्टॉरंट बंद झाले आहे. रेस्टॉरंट बंद करण्यापूर्वी एल बुलीचे मालक शेफ फेरान एड्रिया यांनी रेस्टॉरंटमध्ये काम करणा-या कर्मचा-यांच्या कुटुंबीयांसाठी जेवण बनविणार असल्याचे म्हटले आहे. जगातील ५० उत्कृष्ट रेस्टॉरंटमध्ये एल बुलीने पाचवेळा सर्वोच्च स्थान पटकावले आहे. रेस्टॉरंटला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणाया ग्राहकांसाठी शेवटचे डीश समर्पित करणार असल्याचे एड्रिया यांनी सांगितले.
  August 4, 12:22 AM
 • काबूल. प्रेम करणे पाप आहे की काय ? प्रेमी युगुलांना दगडांनी ठेचून ठेचून ठार करण्याचा रानटी प्रकार इस्लामच्या नावावार तालिबानी करीत आहेत. गेल्या महिन्यात एक प्रेमी युगुल लग्नासाठी चालले होते, तेवढ्यात तीनशे लोकांच्या जमावाने त्यांना घेरले. त्या युगुलाला कारमधून ओढून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दंगल सुरू झाली. बघता बघता गावभर दंगल पसरली. 17 वर्षीय हलीमा मोहम्मद आणि रफी मोहम्मद यांना तेथील पोलिस ठाण्यात नेण्यात आले. प्रांतीय परिषदेचे म्हणणे आहे की या प्रेमी युगुलाने कोणताही गुन्हा केला...
  August 3, 07:41 PM
 • दमिश्क- सीरियामध्ये सरकारला विरोध करणा-यांवर मोठयाप्रमाणात हल्ले करणे सुरूच आहे. सुरक्षा दलांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात येत आहे. मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत ७ जणांचा गोळीबारात मृत्यु झाला आहे तर प्रत्यक्षदर्शींच्यामते १७ जण ठार झाले आहेत.गेल्या तीन दिवसांमध्ये १३० जण तर तीन महिन्यांमध्ये १७०० जण गोळीबारात ठार झाले आहेत असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. गेल्या चार महिन्यांपासून सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे. गेल्या आठवडयातील रविवार हा आतापर्यंतच्या...
  August 3, 06:32 PM
 • कैरो- इजिप्तचे पदच्युत सर्वेसर्वा होस्नी मुबारक यांच्यावरील खटल्याला आजपासून राजधानी कैरोमध्ये सुरूवात झाली आहे. या खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी होस्नी मुबारक आज शर्म अल शेखच्या सिनाई येथील रेड सी रिसॉर्टमधून कैरोमध्ये दाखल झाले. मुबारक यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार आणि त्यांच्याविरूद्ध बंड करणाऱ्या आंदोलकांची हत्या केल्याचा आरोप आहे. होस्नी मुबारक यांचा पाडाव हा नव्या जगातील एक अत्याधुनिक संपर्क क्रांतीचं फलित मानले जाते. फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल नेटवर्किंगने...
  August 3, 04:24 PM
 • जेद्दाह- सौदी अरेबियात जगातील सर्वात उंच इमारत बांधली जाणार आहे. सौदीचा अब्जाधिश राजकुमार अलवालिद बिन तलालने या इमारतीची घोषणा केली. जेद्दाहच्या उत्तरेकडे लवकरच या इमारतीचे काम सुरु होणार आहे. इमारतीच्या बांधकामाला पाच वर्ष लागणार असून, इमारतीची उंची १ हजार मीटर असणार आहे. ही इमारत जेद्दाह शहरात बांधल्यानंतर सौदीत असलेल्या आर्थिक सुबत्तेचा संदेश जगभर जाणार असल्याचं अलवालिद यांनी म्हटले आहे. किंगडम टॉवर असे या इमारतीचे नाव राहणार आहे. सध्या दुबईत यापूर्वी बांधण्यात आलेली बुर्ज खलिफा...
  August 3, 12:39 PM
 • वॉशिंग्टन - जेव्हा सुंदर, स्टायलिश आणि फॅशनेबल फर्स्ट लेडीची चर्चा होते तेव्हा नाव समोर येते ते फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सार्कोझींची पत्नी कार्ला ब्रुनी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांची पत्नी मिशेल ओबामांचे. त्या गरोदर राहिल्या, बागेत झाडांना पाणी घातले किंवा पतीबरोबर त्या कुठे दिसल्या की वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या बातमीचा विषय बनतात. त्यांची जादू केवळ त्यांच्या पतींवरच चालत नाही तर अख्ख्या जगाच्या नजरा त्यांच्या अदांवर खिळलेल्या असतात. पण जगातील अन्य काही फर्स्ट लेडी...
  August 3, 04:41 AM
 • तेहरान -माजिदने मला आयुष्यातून उठवले. मी दिलेल्या नकाराला अँसिडने उत्तर देणार्या माजिदला मी क्षमा करते आहे. माझा चेहरा विद्रूप करणार्या, माझे डोळे फोडणार्या माजिदला मी क्षमा करते आहे, त्यामागे माजिदबद्दलचा उमाळा खचितच नाही. मला माजिदच्या चेहर्याची किंवा दृष्टीची चिंता नाही. मला माझ्या देशाच्या जगातील प्रतिमेची आणि त्याच्याकडे (इराणकडे) पाहणार्या जगाच्या दृष्टीची काळजी आहे. म्हणून मी माजिदला क्षमा केली आहे.. हे भावोत्कट उद्गार आहेत..अमेनाह बहरामी हिचे. डोळय़ांच्या बदल्यात डोळे अशा...
  August 3, 04:24 AM
 • बाल्टिक समुद्राच्या किनारी वसलेला लॅटव्हिया पूर्वी रशियाचाच एक भाग होता. पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत संघातील तीन बाल्टिक प्रजासत्ताकांच्या मध्यभागी हा देश आहे. दक्षिणेकडील लिथुआनियाशी याचा भाषासाधर्म्यामुळे संबंध आहे तर इस्टोनियाशी व्यवहारी संबंध आहेत. मूलत: हा देश शेतीप्रधान होता. १३व्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत या ठिकाणी परकीय साम्राज्य होते. पहिल्या महायुद्धानंतर लॅटव्हिया स्वतंत्र झाला. १९२०मध्ये रशियाने त्याला मान्यताही दिली; परंतु दोन दशकांनंतर स्टॅलिन आणि हिटलरमध्ये...
  August 3, 12:19 AM
 • वॉशिंग्टन - माझ्या केसांवर चंदेरी छटा आली असली तरीही मिशेलच्या मते मी अजूनही क्युट दिसतो! हे उद्गार आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे. येत्या गुरुवारी ओबामा ५१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ५० व्या वाढदिवसानिमित्त नॅशनल पब्लिक रेडिओला दिलेल्या मुलाखतीत ओबामा आपल्या कौटुंबिक जीवनाबद्दल अत्यंत मनमोकळेपणे बोलले. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचे नेतृत्व करणा-या ताणतणावातही ओबामांनी एका सामान्य माणसाप्रमाणेच कौटुंबिक जबाबदारी निभावली आहे. राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी...
  August 3, 12:15 AM
 • लंडन। मागील महिन्यात अफगाणिस्तानात नाटोच्या सैन्याने स्थानबद्ध केलेल्या दोन ब्रिटिश नागरिकांची अलिकडेच सुटका करण्यात आली आहे, असे ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी मंगळवारी सांगितले. यात एक महिला व एक पुरुष आहे. या दोघांना जुलैत पकडण्यात आले होते. २९ जुलै रोजी त्यांची लंडनच्या स्थानबद्ध कायद्यानुसार सुटका झाली.
  August 3, 12:12 AM
 • संयुक्त राष्ट्रसंघ - संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे ऑगस्ट महिन्याचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान भारताला मिळाला असून संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत हरदीपसिंग यांनी आज अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. भारत या काळात राजकीय परिपक्वता, प्रतिष्ठा नक्कीच दाखवून देईल. त्यामुळे भारत सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य होण्यासाठी भारत खरोखर योग्य दावेदार आहे असे वाटल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत राजदूत हरदीपसिंग पुरी यांनी भारताचे जोरदार समर्थन केले आहे. आंतरराष्ट्रीय...
  August 3, 12:11 AM
 • कराची - गेल्या चोवीस तासांमध्ये कराचीत उसळलेल्या राजकीय आणि वांशिक दंगलीमध्ये 34 जण ठार झाले असून शेकडो नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. सरकारने हा हिंसाचार थांबवावा यासाठी मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटचे (एमक्यूएम) नेते अल्ताफ हुसेन यांनी अल्टीमेटम दिला आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून कराची शहर ओळखले जाते. या ठिकाणी गेल्या शुक्रवारपासून हिंसाचार भडकला आहे. त्यात आतापर्यंत साठ लोक मृत्युमुखी पडले आहेत. या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका बसला आहे तो सुरजानी टाऊन या भागाला. अज्ञात...
  August 2, 05:56 PM
 • संयुक्त राष्ट्रसंघ- भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद १९ वर्षानंतर मिळाले आहे. हे अध्यक्षपद हंगामी स्वरुपाचे असून महिनाभराच्या कालावधीचे आहे. भारताकडे सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्न नाही. ते मिळविण्याच्या दृष्टीने या हंगामी अध्यक्षपदाची भारताला मदत होईल, अशी अपेक्षा आहे. जागतिक समुदायाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न करु, असा विश्वास संयुक्त राष्ट्रातील भारताचे दूत हरदिपसिंग पुरी यांनी व्यक्त केला. हा कार्यकाळ बघून भारताला कायम सदस्यत्त...
  August 2, 11:08 AM
 • बीजिंग - पाकिस्तानचा जवळचा मित्र चीनने त्या देशावर दहशतवादाचा ठपका ठेवला आहे. शिनिजियांग प्रांतात निष्पाप लोकांवर होणा-या हल्ल्यांसाठी चीनने पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या अतिरेक्यांना जबाबदार धरले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रक्तपातात 20 लोक ठार झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल शुजा पाशा यांना चीनच्या गोपनीय दौ-यावर पाठविले आहे. पाकव्याप्त काश्मीरलगतच्या शिनजियांग प्रांतातील काशगर शहरात घातपाती कारवाया सुरू आहेत. या हल्ल्यात शनिवारी 9 जण ठार...
  August 2, 04:21 AM
 • वॉशिंग्टन - डिप्रेशन किंवा मानसिक तणाव हा शब्द माहीत नसणारी व्यक्ती अभावाने आढळेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात दहा कोटीहून जास्त लोक तणावग्रस्त आहेत. परंतु वैज्ञानिकांनी तणावापासून मुक्त होण्याचा मार्ग शोधून काढल्याचा दावा केला आहे. तुम्ही इतरांप्रती दयाळूपणे वागाल तर तुम्हाला मानसिक तणाव जाणवणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनावरील ताणतणाव वाढत आहेत. तणाव वाढत गेल्याने पुढे गंभीर मानसिक आजारांना सामोरे जावे लागते. हे...
  August 2, 03:51 AM
 • लंडन - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी त्यांच्या शाही विमानाची दुरुस्ती करून त्याला अत्याधुनिक रूप दिले आहे. या कामासाठी खर्च झाले आहेत फक्त पाच कोटी पौंड म्हणजे ३५९.७९ कोटी रुपये. सार्कोझींनी त्यांच्या एअर फ्रान्स कंपनीच्या विमानाची दुरुस्ती केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांनी विमानात सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा बसवून घेतल्या आहेत. आता या विमानात पत्नी कार्ला ब्रुनी यांच्या आवडीचे म्युझिक सेंटर व डीव्हीडी प्लेअर बसवला आहे. याशिवाय या विमानात मिसाइल नियंत्रण व...
  August 2, 03:49 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात