जाहिरात
जाहिरात
Home >> International

International

 • सॅन फ्रान्सिस्को- गुगलच्या प्ले स्टोअरमध्ये असंख्य अॅप आहेत. यातील काही अॅप उपयोगी असले तरी काही अॅप महिला, मुलींसाठी डोकेदुखी ठरत आहेत. सौदी अरबमध्ये तर लोक अॅपच्या माध्यमातून पत्नी आणि मुलींची हेरगिरी करत असल्याचे उघड झाले आहे. कुटुंबातील महिला नेमक्या कुठे आहेत हे अॅब्शर अॅपच्या माध्यमातून ट्रॅक करण्याचा प्रकार वाढला आहे. महिलांनी जर विमानतळावर पासपोर्टचा वापर केला तर त्याची माहिती पतीच्या मोबाइलवर पोहोचते. पुरुषांना वाटले तर ते महिलांना विमानतळावरच रोखू शकतात. या अॅपचा...
  February 16, 08:33 AM
 • बीजिंग- जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 42 जवान शहीद झाले. या हल्ल्याबद्दल चीनने दु:ख व्यक्त केले, परंतु हल्ला घडवणारी संघटना जैश-ए-मोहंमद संघटनेचा संस्थापक मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. चीनचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले की, भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याचा आम्हाला मोठा धक्का बसला. आम्ही कोणत्याही प्रकारचा दहशतवादाचा विरोध करतो. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा विषय आम्ही...
  February 15, 06:56 PM
 • निकोसिया- सायप्रसमधील मारिया नावाच्या महिलेने तिच्या लग्नाच्या दिवशी ७ हजार मीटर लांब गाऊन घालून जागतिक विक्रम नोंदवला आहे. या गाऊनची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून, हा आतापर्यंतचा सर्वात लांब गाऊन ठरला आहे. हा गाऊन बनवण्यासाठी सुमारे ३ लाख १८ हजार रुपये लागले. हा गाऊन इतका मोठा आहेे की, यातून ६३ अमेरिकन फुटबॉल मैदाने झाकली जाऊ शकतात. याबाबत मारियाने सांगितले की, एखादा जागतिक विक्रम नोंदवण्याची माझी लहानपणापासून इच्छा होती. मात्र, हा गाऊन तयार करण्यासाठी कारागीर शोधण्याचेच...
  February 15, 10:42 AM
 • वॉशिंग्टन - अमेरिकेत मूळचा जमैकाचा असलेल्या युवकाने तब्बल 15 लाख पाउंडची लॉटरी जिंकली. इतकी मोठी रक्कम जिंकल्यानंतर ती मिळवण्यासाठी कुणी एक तास सुद्धा वाट पाहू शकणार नाही. परंतु, या बहाद्दराने जवळपास दोन महिने वाट पाहिली. 54 दिवसांनंतर तो आपली जिंकलेली रक्कम मिळवण्यासाठी समोर आला. तोही असा की त्याला पाहून सगळेच हैराण झाले. त्याने आपल्या चेहऱ्यावर विचित्र मास्क लावला होता. आपल्या कपड्यांवरून ओळख पटू नये याचीही काळजी त्याने घेतली होती. एका वेबसाइटच्या वृत्तानुसार, त्याचे नाव ए कॅम्पबेल असे...
  February 14, 03:08 PM
 • जकार्ता- इंडोनेशियातील पापुआमध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली द्यावी म्हणून पोलिसांनी त्याच्या गळ्यात विषारी साप टाकला.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी पोलिसांवर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जाहीर माफी मागितली . पोलिसांनी फोन चोरी केल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीस अटक केली होती. पोलिस त्याची चाैकशी करत होते. तो गुन्हा कबूल करत नव्हता. तेव्हा पोलिसांनी गळ्यात साप सोडला.दरम्यान संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
  February 14, 12:24 PM
 • लंडन- इंग्लंड सरकारने विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी शाळेच्या अभ्यासक्रमात माइंडफुलनेस नावाचा नवा विषय घेण्यात आला आहे. याअंतर्गत प्राणायाम शिकवला जाणार आहे. यामुळे त्यांना मन:शांती मिळणार आहे. या विषयानुसार त्यांना हुशार बनवण्याचे तंत्रही शिकवण्यात येईल. प्रारंभी देशातील ३७० शाळांमधून हा अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. शाळेत मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यात येणार आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने मुलांच्या संपूर्ण मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे, हा यामागचा उद्देश आहे....
  February 14, 11:22 AM
 • इस्लामाबाद- सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान या आठवड्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर पाकिस्तानला जात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या दौऱ्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु त्यांच्या दौऱ्यामुळे प्रिन्सच्या स्वागताची पाकिस्तानात जोरात तयारी सुरू आहे. ही तयारी सुरू असतानाच सलमान येथे येण्याआधीच त्यांच्यासाठी लागणारे सामान घेऊन ५ ट्रक इस्लामाबादेत दाखल झाले आहेत. या ट्रक्समध्ये सलमान यांच्या व्यायामाची यंत्रे, त्यांचे फर्निचर व काही वैयक्तिक सामान आहे....
  February 14, 11:10 AM
 • टोकियो (जपान)- जपानच्या सॅमाता राज्यात सात बोन्साय झाडांची चोरी झाल्याचे प्रकरण उजेडात आले. यात ४०० वर्षे जुन्या शिम्पाकू झाडाचा समावेश आहे. याला बोन्सायच्या जगात सर्वाधिक पसंती देण्यात येते. या सर्व झाडांची किंमत ८३.७८ लाख रुपये आहे. एकट्या शिम्पाकू झाडाची किंमत ६४ लाखांपेक्षाही जास्त आहे. बोन्साय जगतात काम करणाऱ्या फ्युमी लिमुरा यांनी सांगितले, या छोट्या छोट्या झाडांचा मी मुलांप्रमाणे सांभाळ करते. ५ हजार हेक्टर जागेत लावण्यात आलेल्या ३००० बोन्साय झाडांची चोरी कशी करावी? हे...
  February 14, 11:09 AM
 • वॉशिंग्टन, कॅराकस- व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसमध्ये विरोधी पक्ष नेते जॉन गुआडो यांची बुधवारी जाहीर सभा झाली. त्यात सुमारे अडीच लाख लोक सहभागी झाले होते. लष्कराने मानवतेच्या पातळीवर मिळणारा निधी रोखू नये, असे आवाहन गुआडो यांनी केले आहे. राष्ट्रपती निकालेस मदुरो यांच्या आदेशानुसार लष्कराने सीमेवर नाकेबंदी केली आहे. त्यामुळे विविध देशांकडून येणारी खाद्य पदार्थ, औषधी व इतर वस्तू रोखण्यात आल्या आहेत. त्याचा मार्ग खुला करावा, अशी मागणी गुआडो यांनी केली आहे. देशातील २० लाखाहून अधिक लोकांचे...
  February 14, 10:22 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - पाकव्याप्त काश्मिरात स्थानिकांच्या जीवाला काहीच मोल नाही. त्यातच पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटना देखील दिवसेंदिवस समोर येत आहेत. बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैनिकांचा सैतानी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. बलुचिस्तानमध्ये घडलेल्या या चित्तथरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ बलूच फ्रीडम मूवमेंटचे कार्यकर्ते बीबग्र बलोच यांनी ट्विटरवर पोस्ट केला. या धक्कादायक व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे याचा...
  February 13, 02:44 PM
 • कुवेत- कुवेत सरकारने सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय ध्वज तयार करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. याची लांबी मीटर इतकी आहे. ४ हजार विद्यार्थ्यांनी रविवारी मिरवणूक काढली. या विक्रमास गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. अधिकाऱ्यानी तसे प्रमाणपत्रही प्रदान केले आहे. याआधी कुवेतच्या तीन लष्करी अधिकाऱ्यांनी १३ हजार फुटावरून ६७८.१२६ फूट लांबीचा झेंडा घेऊन स्कायडायव्हिंगचा विक्रम रचला होता.
  February 13, 10:07 AM
 • तेहरान- इराणमध्ये राजधानी तेहरानमध्ये सार्वजनिक ठिकाणी पाळीव कुत्र्यांना फिरायला नेण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी इस्लामिक देशात दीर्घकाळापासून कुत्रे पाळण्यावर घालण्यात आलेल्या बंदीचाच एक भाग आहे. काही दिवसापूर्वी सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना नेण्यास बंदी घालण्यासाठी प्रॉसिक्यूटर ऑफिसने शहराचे पोलिस प्रमुख हसन रहिमी यांच्याकडून परवानगी काढली आहे. त्यानंतर शहरातील सार्वजनिक ठिकाणे म्हणजे, पार्कमध्ये कुत्र्यांना नेल्यास दंड तर होईलच शिवाय पोलिस कुत्रे घेऊन जातील,...
  February 13, 10:03 AM
 • इसिसविरोधात झाली शेवटची कारवाई - सिरियाच्या पूर्वेकडील डीर-अल-जोर भागात निर्वासितांच्या शिबिरांना लक्ष्य बनवून सातत्याने हल्ले करण्यात आले. - अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प म्हणाले की, आमच्या सैन्याने इराक व सिरियाचे १००% भाग दहशतवादमुक्त केले आहेत. - सिरियात कुर्द बंडखोरांशी २०११ मध्ये सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत ३.६० लाखांहून जास्त लोक मारले गेले आहेत. दमास्कस- सिरियात अमेरिकेने इसिसच्या खात्म्यासाठी शेवटच्या टप्प्यातील हल्ला केला आहे. मंगळवारी अमेरिकेचे पाठबळ असलेल्या...
  February 13, 09:45 AM
 • बुडापेस्ट- हंगेरी हा युरोपातील देश घटती लोकसंख्या आणि प्रवाशांच्या वाढत्या संख्येने त्रस्त आहे. देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी पंतप्रधान ने व्हिक्टर ऑर्बन यांनी नव्या धोरणाअंतर्गत महिलांना अनेक सवलती देण्याची घोषणा केली. व्हिक्टर म्हणाले की, चारपेक्षा जास्त मुले झाल्यावर महिलांना आयुष्यभर प्राप्तिकर द्यावा लागणार नाही. ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना पहिल्यांदा लग्न केल्यावर २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळेल. तिसरे मूल होताच तिचे कर्ज माफ होईल. त्याशिवाय जे लोक...
  February 12, 10:08 AM
 • न्यूयॉर्क- अमेरिकेत राहणारा विल्यम गेलेघर काही दिवसापूर्वीच हत्येच्या गुन्ह्यात २० वर्षाची शिक्षा भोगून तुरुंगातून सुटला होता. इतर कैद्याप्रमाणे त्यालाही नव्याने आयुष्य सुरू करण्याची इच्छा होती. परंतु बाहेरच्या जगाशी जुळवून घेणे त्याला इतके अवघड झाले की, पुन्हा चोरी करून तुरुंगात परतणेच त्याला योग्य वाटले. न्यू जर्सीच्या तुरुंगातून सुटलेला विल्यम पुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने यावेळी चोरी करण्यासाठी विस्कोंसिनला गेला. कारण त्याला कोणीतरी सांगितले होते की, या परिसरातील...
  February 12, 10:06 AM
 • माद्रिद- स्पेनमध्ये बायो-इंजिनिअरींगचा विद्यार्थी डेव्हीड अगिलर (१९) याने लेगो विटांपासून स्वत:साठी कृत्रिम हाथ बनवला आहे. अनुवंशीक कारणामुळे डेव्हीडला जन्मापासून डावा हात नाही. मित्रांनी लेगो विटा आणून दिल्यानंतर जवळपास एका वर्षात मी रोबोटिक हात बनवल्याचे डेव्हीड सांगतो. इलेक्ट्रीक मोटारचा वापर करून सांध्यापासून हाताची हालचाल करता येते. तसेच विविध वस्तू पकडता येतात. बालपणी इतर मुलांपेक्षा वेगळा असल्याने मी खूप निराश व्हायचो; पण स्वप्न पाहणे मी कधी थांबवले नाही आणि अखेर हात...
  February 11, 10:43 AM
 • लंडन- ब्रिटनमधील एका महिलेने ३३ वर्षांपूर्वी १० पाऊंडमध्ये (९२५ रुपये) एक नकली हिऱ्याची अंगठी विकत घेतली होती. परंतु प्रत्यक्षात ही अंगठी खरोखरच्या हिऱ्याची असून याची किंमत ६ कोटींवर असल्याचा उलगडा झाला. ५५ वर्षांच्या डेब्रा गोडार्ड यांना हिऱ्याच्या अंगठीचा मोह असल्याने त्यांनी नकली हिऱ्याची अंगठी घेतली. पण डेब्रा ज्वेलर्सने त्यांना ही अंगठी खरी असल्याचे सांगितले. २६.२७ कॅरेटच्या हिऱ्याची ही अंगठी होती. त्यांचा विश्वास बसत नव्हता त्यामुळे त्या हिरे व्यापाऱ्याकडे गेल्या व त्याने...
  February 11, 10:39 AM
 • दुबई- अबुधाबी प्रशासनाने इंग्लिशनंतर हिंदीला न्यायालयाच्या तिसऱ्या अधिकृत भाषेचा दर्जा देऊन न्यायालयीन कामकाजात तिचा समावेश केला आहे. हिंदी भाषिक लोकांपर्यंत न्याय पोहोचवणे सुलभ व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. अबुधाबीच्या न्याय विभागाचे (एडीजेडी) सचिव युसूफ सईद अल अब्री याबद्दलची माहिती दिली. अरबी, इंग्लिश व हिंदी भाषेला न्यायदान प्रक्रियेतील भाषेच्या माध्यमांत स्थान दिले आहे. यांनी सांगितले की, न्यायदानाला अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न आहे.अबू धाबी संयुक्त...
  February 11, 10:29 AM
 • नामपेन्ह- कंबोडियामध्ये वार्षिक मासेमारीचा उत्सव साजरा केला जात आहे. कंबोडियाच्या टबोंग खमूम राज्यातील चोम क्रोव्हेन कम्युनमध्ये आयोजित मासेमारी उत्सवात नागरिकांची मासे पकडण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. पूर्व कंबोडियातील या चिखलयुक्त सरोवरात शेकडो लोक बांबूची बास्केट, जाळे घेऊन आले होते. मासेमारीच्या या उत्सवात केवळ पारंपरिक पद्धतीचाच वापर केला जातो. मासेमारीची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी कापणीच्या हंगामानंतर हा उत्सव साजरा केला जातो. नामपेन्हपासून २५० किमी अंतरावर चोम...
  February 11, 09:54 AM
 • एडन- यमनमध्ये एका चिमुरड्यावर अत्याचार करुन त्याची हत्या केल्याची घटना उघड आहे. या गुन्ह्याखाली दोन आरोपींना अटक झाली असून त्यांना सर्वांसमोर गोळी घालुन मारण्याची शिक्षा सुनवण्यात आली आहे. या प्रकरणात शरीया अदालतने एका महिलेलादेखील मृत्यूची शिक्षा सुनावली आहे. परंतू ती प्रग्नेंट असल्यामुळे तिची शिक्षा टाळण्यात आली आहे. वादाह रफत (वय 29) आणि मोहम्मद खालिद (वय 31) असे या आरोपींचे नाव असून त्यांनी एका 12 वर्षीय चिमुरड्यावर बलात्कार करुन हत्या केली होती. त्यानंतर मिलिट्रीच्या जवानांनी...
  February 10, 03:00 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात