जाहिरात
जाहिरात
Home >> International

International

 • इस्लामाबाद - एका अमेरिकी नागरिकाने पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी मारखोरला (जंगली प्रजातीचा बकरा) मारण्यासाठी रेकॉर्डब्रेक सर्वात जास्त किंमत माेजली अाहे. ब्रायन किन्सल हर्लान असे त्याचे नाव असून, शिकारीसाठी त्याने १ लाख १० हजार डॉलर्सचे (सुमारे ७८ लाख रुपये) परवाना शुल्क भरले. या प्राण्याचा पाकमध्ये सुरक्षित प्रजातींत समावेश केला गेला असून, त्याच्या शिकारीची परवानगी नाही. सरकार या प्राण्याच्या शिकारीसाठी केवळ ट्रॉफी हंटिंग कार्यक्रमांतच मंजुरी देते. ट्रॉफी हंटिंग सीझन २०१८-१९मध्ये...
  February 8, 10:01 AM
 • वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या धर्तीवर भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपतींना हवाई क्षेत्रात क्षेपणास्त्रसज्ज सुरक्षा मिळणार आहे. करारानुसार भारत अमेरिकेकडून दोन बोइंग खरेदी करणार आहे. अमेरिका व भारत यांच्यात यासंबंधीच्या एका करारास मान्यता मिळाली आहे. शत्रूच्या कोणत्याही हालचालींना टिपण्याची क्षमता या विमानातील अत्याधुनिक प्रणालीत आहे. त्यामुळे पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या सुरक्षा खऱ्या अर्थाने कडेकोट होणार आहे. अमेरिकेच्या प्रशासनाकडून या व्यवहारास हिरवा कंदील...
  February 8, 09:55 AM
 • वॉशिंग्टन - इस्लामिक स्टेटचे (आयएसआयएस) इराक व सिरियात आठवडाभरात समूळ उच्चाटन होईल, असा विश्वास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. आपल्या प्रशासनाने दहशतवादी संघटनेच्या क्रूर विचारसरणीचा सामना करावयाचे ठरवले आहे, याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी या वेळी केला. इराक व सिरियात इसिसच्या ताब्यात केवळ १ टक्का जमीन आहे, असा दावा करण्यात आला आहे. गेल्या वर्षी इसिसविरुद्ध लढा पुकारण्यासाठी जागतिक आघाडी उघडण्यात आली. असे असले तरी इसिसचे अफगाणिस्तान, लिबिया, सिनाई व...
  February 8, 09:29 AM
 • स्टॉकहोम - स्वीडनच्या शाही परिवाराचे मुकूट आणि तलवारींसह इतर दागिने नुकतेच एका डस्टबिनमध्ये सापडले आहेत. सहा महिन्यांपूर्वी हे सर्व साहित्य चोरीला गेले होते. डस्टबिनमध्ये एका बॉक्समध्ये हे दागिने ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्यावर बॉम्ब असे लिहिले होते. स्थानिकांनी बॉम्ब समजून वेळीच पोलिसांना फोन लावला आणि घटनास्थळी बॉम्बशोध पथकासह दाखल झालेल्या पोलिसांनी सत्य समोर आणले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही साहित्ये आणि दागिने किंग कार्ल्स-IX च्या काळातील आहेत. फ्यूनरल...
  February 8, 12:01 AM
 • न्यूयॉर्क - युनायटेड एअरलाइन्सची अटेंडंट सबरिना स्वॅनसनने काही दिवसापूर्वी विमानाच्या विंगवर हवेत चालून दाखवले आणि कसरती केल्या. ही माहिती तिने युनायटेड एअरलाइन्सच्या वेबसाइटवर लिहिलेल्या ब्लॉगवर दिली आहे. फ्रँकफर्टच्या सबरिनाने सांगितले, आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त चालण्याची कसरत केली. अाठ वर्षांपूर्वी लंडनमध्ये एअरक्राफ्टच्या बाहेर विंगवर काही वेळासाठी उभी होती. आता बोइंग स्टिअरमॅन बी प्लॅनच्या टॉपवर उभी राहिले होते. सबरिना म्हणते, हवाई कसरती करण्याचे प्रशिक्षण...
  February 7, 10:22 AM
 • बीजिंग | जगातील दुसऱ्या सर्वात माेठ्या चिनी नूतन चांद्रवर्ष सणाला प्रारंभ झाला अाहे. हा उत्सव १४ दिवस चालेल. यास (लुनर) स्प्रिंग फेस्टिव्हल नावाने अाेळखले जाते. चीनसह जगातील सुमारे ४० देशांतील जवळपास ३ अब्ज लोक हा सण साजरा करत अाहेत. या देशांत जगातील सुमारे ३० % लाेक राहतात. त्यापैकी १४० काेटी म्हणजे १९ % लोक चीनचे अाहेत. लुनर फेस्टिव्हलमध्ये १ अब्जहून जास्त नागरिक एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. त्यातील बहुतांश जण त्यांच्या होम टाऊनमध्ये जाणारे अाहेत. जगात एकाच वेळी इतक्या...
  February 7, 09:24 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - क्वालालंपूरच्या एका बाजारात पर्यटनासाठी आलेल्या कपलचे कृत्य पाहून सर्वांना धक्का बसला. टूरिस्ट प्लेसवर या कपलने अचानक एका तान्ह्या बाळाला त्याच्या पंजांपासून पकडले आणि जोर-जोरात हवेत फेकण्यास सुरुवात केली. 90 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी एकानंतर एक कधी पाय धरून तर कधी हात धरून त्या बाळाला अतिशय अमानुष पद्धतीने झटकले. याच शनिवारी हा व्हिडिओ Zayl Chia Abdulla नावाच्या व्यक्तीने आपल्या फेसबूक अकाउंटवरून शेअर केला आहे. सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्या कृत्यावर संताप उमटला....
  February 7, 12:06 AM
 • न्यूयॉर्क - अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना प्रांतात एक अजब घटना समोर आली आहे. ग्रीन्सबोरो शहरात एक तरुणी आपल्या अपार्टमेंटमध्ये घडणाऱ्या विचित्र घटनांमध्ये भयभीत होती. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे आपल्या घरात नक्कीच भूत असल्याचे तिला वाटत होते. काही दिवसांतच तिला आपल्या कपाटातून कपडे गायब होत असल्याचे दिसून आले. एक दिवस तर तिला आपल्या बाथरुममध्ये अनोळखी व्यक्तीच्या हातांचे ठसे सापडले. दिवसेंदिवस या घटना वाढत गेल्या आणि तिने वैतागून अखेर या कथित भूताशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला....
  February 7, 12:02 AM
 • वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन 27-28 फेब्रुवारी रोजी व्हिएतनाममध्ये भेटणार आहेत. 8 महिन्यांत किम आणि ट्रम्प यांची ही दुसरी भेट आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या स्टेट ऑफ द युनियन भाषणात यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. यापूर्वी जगातील सर्वात कट्टर शत्रू राष्ट्रांचे नेते 12 जून 2018 रोजी को सिंगापूरमध्ये एकमेकांना भेटले होते. दोन्ही नेत्यांमध्ये 90 मिनिटे चर्चा झाली, परंतु, काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे,...
  February 6, 11:35 AM
 • लंडन - ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा जन्म ज्या पॅलेसमध्ये झाला, तेथील सफर घडवण्यासाठी ५ फूट उंचीचा रोबोट बॅटी यास गाइड म्हणून नियुक्ती दिली आहे. चर्चिलचे जन्मस्थान ब्लेनहीम पॅलेसची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात निवड झालेली आहे. बॅटी लोकांना माहिती देण्याबरोबरच त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देतो. तो लोकांसोबत छायाचित्रे काढून त्यांना टिवटरवर हॅशटॅग बॅटी इन द प्लेससह पोस्टही करणार आहे. बॅटी १२ तास हिंडून लाेकांना हा पॅलेस दाखवतो. त्यानंतर चार्जिंगसाठी आपोआप बंद...
  February 6, 09:50 AM
 • वॉशिंग्टन - तुम्हाला यातलं काही कळतं नाही हो! असं जर कोणती महिला तिच्या पतीला म्हणत असेल तर ही नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण अमेरिकेतील एका संशोधनाने या बाबीवर शिक्कामोर्तब केले आहे. वय वाढल्यानंतर स्मरणशक्ती कमी होणे आणि विसरभोळेपणाचा आजार महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात असतो. शिवाय महिलांचा मेंदू जैविकदृष्ट्या समवयस्क पुरुषाच्या मेंदूच्या तुलनेत जवळपास ४ वर्षांनी अधिक तरुण असल्याचा निष्कर्ष संशोधनात काढण्यात आला. वॉशिंग्टन विद्यापीठातील स्कूल ऑफ मेडिसिनने...
  February 6, 09:21 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - ऑस्ट्रेलियात पुराच्या थैमानात हजारो लोकांना आपली घरे सोडून पळ काढावा लागला आहे. या पुरात 20 हजार घरे अजुनही धोक्याच्या निशाणावर आहेत. येथील रॉस रिव्हर डॅममधून प्रति सेकंद 1900 क्यूबिक मीटर पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी वाइट होणार आहे. पुराचे पाणी रस्त्यांवर आणि घरात घुसत आहे. अशात तलाव आणि नद्यांमध्ये असलेल्या मगरी सुद्धा चक्क रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे, प्रशासनाला सुद्धा हायअलर्ट जारी करावा...
  February 6, 12:04 AM
 • ओटावा - कॅनडाचा नागरिक असलेला एका युवा आंत्रोप्रन्योर गेराल्ड कॉटनचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला. गेराल्डच्या निधनाच्या काही दिवसांतच त्याच्या खात्यात अब्जावधींचे बिटकॉइन सापडले. या बिटकॉइनची किंमत तब्बल 18 कोटी कॅनेडियन डॉलर अर्थात जवळपास 1 हजार कोटी रुपये आहे. दुर्दैव म्हणजे, त्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी आपल्या बिटकॉइन खात्याचा पासवर्ड कुणालाही सांगितलेला नव्हता. त्याची विधवा झालेल्या जेनिफर रॉबिन्सनला सुद्धा याचा काहीच पत्ता नाही. त्यामुळे, हजारो कोटी रुपयांचे बिटकॉइन आता...
  February 6, 12:01 AM
 • इस्लामाबाद - पाकिस्तान सरकारने दरवर्षी हजसाठी नागरिकांना दिली जाणारी सवलत बंद करत असल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला. पाकचे आंतरधर्मीय सलोखा मंत्री नूरुल हक कादरी यांनी सांगितल्याप्रमाणे, या निर्णयातून पाकिस्तान सरकार आणि करदात्याचे 450 कोटी रुपये दरवर्षी वाचणार आहेत. विशेष म्हणजे, भारतात 2018 मध्ये हज यात्रींना दिली जाणारी सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतला. मुळात इस्लाममध्ये हज यात्रींना...
  February 5, 06:39 PM
 • लंडन - ब्रिटनने हजारो कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी फरार असलेल्या विजय माल्याच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली. ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जाविद यांनी माल्ल्या प्रत्यार्पणास सोमवारी मंजुरी देणाऱ्या कागदपत्रांवर औपचारिक स्वाक्षरी केली. लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने 10 डिसेंबर रोजी माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. तसेच न्यायालयाने हे प्रकरण ब्रिटन सरकारकडे पाठवले होते. यावर रात्री उशीरा ट्वीट करताना माल्ल्याने निर्णयाच्या विरोधात अपील करणार असे...
  February 5, 11:59 AM
 • अबु धाबी - संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) रविवारी एका भारतीयाने लॉटरीत एक कोटी दिरहमचा (सुमारे १९ कोटी रुपये) जॅकपॉट जिंकला आहे. वृत्तानुसार, प्रशांत पंडरथिल याने ४ जानेवारीस ऑनलाइन तिकीट विकत घेतले होते. विजेत्यांच्या नावाची नुकतीच घोषणा करण्यात आली. आणखी एक भारतीय कुलदीप कुमार याने १ लाख दिरहमची दुसरी लॉटरीही जिंकली. विजेत्यांच्या दहा प्रथम क्रमांकांच्या यादीत सहा भारतीयांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी अभिषेक काथेल या भारतीयाने दुबईतील ड्यूटी फ्री लॉटरीत दहा डॉलरची (७ कोटी ८...
  February 5, 10:41 AM
 • कैरो | इजिप्तची राजधानी कैरोच्या दक्षिणेस पुरातत्त्व शास्त्रज्ञांना टॉलेमिक युगातील (३०५-३० इसपूर्व) ५० ममी सापडल्या. एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, पुरातत्त्व विभागाच्या मंत्रालयाने म्हटले, यात एक ममी १२ वर्षांच्या मुलाची आहे. त्यांना तुना एल गेबलमध्ये ९ मीटर खोल चार चेंबर्समध्ये दफन करण्यात आले होेते. काही ममींना कपड्यात लपेटले आहे. इतरांना दगडाचे ताबूत व लाकडी बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते.
  February 5, 10:35 AM
 • रोम - इटलीतील आल्प्स पर्वतावर थंडीच्या दिवसांत लोकांना राहणे कठीण होते. अशा थंडीतही एक बँड आपले उत्कृष्ट सादरीकरण करतो आहे. शनिवारी येथे आइस म्युझिक फेस्टिव्हल पार पडला. यात कलावंतांनी ८५०० फूट उंचीवर उणे १२ डिग्री तापमानात आपले उत्कृष्ट सादरीकरण पार पाडले. कलावंतांनी व्हायोलिन, ड्रमसेट, झायलोफोन व मेंडाेलिन यासारखी बर्फाची वाद्ये तयार केली होती. बँडचे सादरीकरण एका इग्लूमध्ये (लहान घरे) करण्यात आले. बँडचे सदस्य व अमेरिकेत राहणारे टिम लिनहार्ट यांनी सांगितले, उंचीवर दाब कमी असतो. यामुळे...
  February 5, 10:31 AM
 • न्यूयॉर्क - ५६ वर्षीय किम हॅरिस डॅनिकोलासोबत तीन महिन्यापूर्वी जे घडले ते फक्त चित्रपटात पाहण्यास मिळते. परंतु तिच्याबाबतीत हा प्रसंग सत्यात उतरला आहे. चर्च पार्कमध्ये गेलेल्या किम अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या. त्या शुद्धीवर आल्या तेव्हा १७ वर्षे वयाच्या मुलीसारखे वागू लागल्या. त्यांना मुलांचे व पतीचे नावही आठवत नव्हते. हे १९८० वर्ष आहे. त्यांचे वय १७ आहे व त्या सीनियर सेकंडरीच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांच्या शाळेचा शेवटचा दिवस होता. शाळेची बस पकडण्याची घाई होती आणि अचानक बेशुद्ध...
  February 5, 10:17 AM
 • अॅम्सटर्डम - गेल्या ९ वर्षंापासून नेदरलँडमध्ये राहत असलेल्या अार्मेनियन लोकांना देशाबाहेर काढण्यापासून रोखण्यासाठी बीथल चर्चमध्ये सलग २३२७ तास प्रार्थना करण्यात आली. जनतेच्या रेट्यापुढे सरकारने शरणागती पत्करली. निर्वासितांच्या सर्व अर्जांवर पुनर्विचार करण्याची घोषणा सरकारने केली. अार्मेनियातील ५ सदस्य असलेल्या कुटुंबास २५ ऑक्टोबर रोजी देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु या परिवारास देश सोडून जाण्याची इच्छा नव्हती. २६ ऑक्टोबर रोजी हेग येथील बीथल चर्चमध्ये त्यांना...
  February 4, 11:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात