जाहिरात
जाहिरात
Home >> International

International

 • इस्लामाबाद -देशात अतिरेकी आहेत आणि दहशतवाद संपवण्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे, अशी कबुली पाकिस्तानी लष्कराने दिली आहे. पाकिस्तान जोपर्यंत आपल्या देशातील अतिरेक्यांविरुद्ध ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत त्या देशाशी चर्चा होऊ शकत नाही असे भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाक लष्कराचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे डीजी मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले,आम्ही हिंसक कट्टरवादी संघटना आणि जिहादी संघटनांवर बंदी घातली आहे...
  April 30, 11:23 AM
 • कोलंबो -श्रीलंकेत पुन्हा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. या वेळी आयएस किंवा नॅशनल तौहीद जमात संघटना बौद्ध स्तुपांना लक्ष्य करू शकतात. गुप्तचर संस्थांनी हा इशारा जारी केला आहे. संस्थांनी म्हटले की, या वेळी हल्लेखोर महिला असू शकतात. हल्ल्यासाठी आत्मघाती पद्धतीचा अवलंब होण्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाला सँटामारडूत एका घरातून अतिरेकी कारवाया सुरू असल्याची माहिती मिळाली होती. जवानांनी तेथे छापा टाकला. तेथे त्यांना पांढरे स्कर्ट-ब्लाऊज मिळाले आहेत. तपासणीत असे समजले की, गेल्या महिन्यात २९...
  April 30, 11:16 AM
 • चीनमधील कम्युनिस्ट नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी पंतप्रधान हाेणार आहेत. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ही घाेषणा केली. त्यांचे सरकार चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग व माेदी यांच्यातील अनाैपचारिक बैठकीची तयारी करत आहे. मागील वर्षी चीनच्या वुहान शहरात ही बैठक झाली हाेती. त्याच धर्तीवर पुन्हा बैठक आयाेजित केली आहे. या वर्षी ही बैठक भारताच्या एखाद्या शहरात हाेऊ शकते. परराष्ट्र धाेरणात निवडणुकीच्या पूर्वी तयारी करणे धाेकादायक समजले जाते. कारण...
  April 30, 10:53 AM
 • कोलंबो - श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटानंतर ठिक-ठिकाणी धाड टाकून अटकेची कारवाई सुरूच आहे. त्यातच सरकारने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. सरकारने सोमवारपासून देशभर नकाबबंदी लागू केली आहे. यापुढे कुणालाही आपला चेहरा झाकता येणार नाही. राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना यांनी हे आदेश जारी केले. 21 एप्रिल रोजी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत 253 जणांचा मृत्यू झाला. आणीबाणीत मुस्लिम समुदायात भीतीचे वातावरण राष्ट्रपती सिरिसेना यांनी यापूर्वीच देशात आणीबाणी...
  April 29, 02:59 PM
 • वॉशिंगटन - बाल्टीमोर येथे एका हल्लेखोराने रविवारी रस्त्यावर अचानक गोळीबार केला. या बेछूट गोळीबारात 7 जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. पोलिस अधिकारी मायकल हॅरिसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अश्वेत व्यक्तीने गर्दीत घुसून अचानक गोळीबार सुरू केला. हा हल्ला पूर्वनियोजित कट रचून करण्यात आला. परंतु, त्याचा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सोबतच, या हल्ल्यात तो एकटा नव्हता असे सांगितले जात आहे. यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहेत. पोलिसांनी...
  April 29, 12:28 PM
 • लॉस एंजलिस -अमेरिकेच्या सॅन दिएगोमध्ये ज्यू प्रार्थनास्थळ चाबाड कम्युनिटी सेंटरवर तरुणाने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना रविवारी घडली. त्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर तीन लोक जखमी झाले. अमेरिकेत गेल्या सहा महिन्यांत ज्यू प्रार्थनास्थळांवरील हा दुसरा हल्ला आहे. जखमींमध्ये एक महिला व दोन मुलांचाही समावेश आहे. ज्यूंच्या स्वातंत्र्यानिमित्त आयोजित पासोवार साजरा करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमले होते. तेव्हाच हल्लेखोराने हा हल्ला केला. आठवडाभर चालणाऱ्या या पर्वाचा...
  April 29, 11:04 AM
 • कोलंबो -ईस्टर संडेच्या दिवशी सकाळी ९ वाजण्यापूर्वी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील शांग्रीला हाॅटेलच्या टेबल वन रेस्टाॅरंटमध्ये डेन्मार्कचे एंडर्स होल्च पोवल्सन हे सर्वात श्रीमंत व्यक्ती कुटुंबासोबत नाश्ता करत होते. त्याच वेळी श्रीलंकेतील मोहम्मद इब्राहिम या श्रीमंत व्यावसायिकाचा मुलगा इलहाम लिफ्टमधून टेबल वनकडे जात होता. त्याने बेसबाॅल कॅप घातलेली होती आणि पाठीवर खूप मोठी बॅग होती. त्याच्यासोबत लिफ्टमध्ये असलेल्या मुलाचाही पेहराव असाच होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यानुसार,...
  April 29, 10:45 AM
 • राेम -जगातील एेतिहासिक शहर अशी राेमची ओळख. मात्र, येथील रस्ते, इमारती, रेल्वेस्थानक अादी सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने राेमच्या राेमाराेमात कचरा भरल्यागत स्थिती आहे. रविवारी ऑस्ट्रिया, ब्रिटन व काही अन्य देशांतून आलेल्या पर्यटकांनी हाॅटेल मालकास शहराच्या स्वच्छतेवरून धारेवर धरले. संतापलेले पर्यटक म्हणाले, तुम्ही पर्यटकाकडून कर वसूल करायला विसरत नाहीत. मात्र, शहरात पसरलेली दुर्गंधी काढण्याचीही जबाबदारी घ्या. हाॅटेल मालकाने तत्काळ शहराच्या महापाैर व्हर्जिनिया रेग्गी...
  April 29, 09:20 AM
 • साओ पाउलो- कॅटवॉक करताना रॅम्पवर पडल्याने एक ब्राझीलियन मॉडेल टेल्स सोअर्सचा मृत्यू झाला आहे. आयोजकांनी सांगितले की ही घटना साओ पाउलो फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी झाला. पण, तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाहीये. आयोजकांनी स्पष्ट केले की, साओ पाउलो फॅशन वीकमध्ये मॉडेल सोअर्सचा मृत्यू झाला आहे. स्थानीक मीडियानुसार, रॅम्पवर जेव्हा सोअर्स मागे जाण्यासाठी वळाली, ती खाली कोसळली. तेथे उपस्थित लोक हे पाहून घाबरून गेले. सोअर्सला तत्काळ हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी...
  April 28, 05:59 PM
 • हॉन्गकॉन्ग- येथे जमिनीचे भाव दिवसेंदिवस वाठतच आहेत. एखाद्याचा अंत्यविधी झाल्यानंतर त्याची राख गाडण्यासाठी तुम्हाला जमिनीचा तुकडा हवा असल्याच त्यासाठी तब्बल 1 लाख 80 पाउंड(1 कोटी 62 लाख रूपये) मोजावे लागली. या किमतीत पॉश एरियात एखादी जमीन मिळू शकते. जमिनींच्या वाढत्या किमतींमुळए 4 लाख अस्थिकलश जमिनीत गाडल्या जाण्याची वाट पाहात आहेत. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ हॉन्गकॉन्ग फ्यूनरल बिझनेस असोसिएशनचे चेयरमॅन क्वोक होई पोंग यांनी सांगितले की, मृत व्यक्तींच्या...
  April 28, 04:00 PM
 • लाहौर(पाकिस्तान)- इलेक्ट्रॉनिक मीडिया रेगुलेटरी बॉडीने शनिवारी एका खासगी न्यूज चॅनेलवर 10 लाख रूपयांचा दंढ ठोठावला आहे. चॅनलकडून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या वैवाहीक आयुष्यावर एक प्रोग्राम दाखवण्यात आला होता. यात इमरान खान आणि त्यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी यांच्यामध्ये वाद असल्याचे दाखवण्यात आले होते. अथॉरिटीने म्हणाली- ज्याप्रकारे आरोप लावले, त्याचप्रकारे माफी मागावी पाकिस्तानी इलेक्ट्रॉनिक मीडिया रेगुलेटरी अथॉरिटीने चॅनलला आदेश दिले आहे की, आपल्या प्राइम टाइम...
  April 28, 03:42 PM
 • बर्लिन -जर्मनीत जर्मन भाषेच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे सुमारे ३४ टक्के परदेशी पत्नी वा पतीस जोडीदारासोबत राहता येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. अशा लोकांना सरकार व्हिसा नाकारते. परदेशी जोडीदाराला डॉइच-१ ही परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. या परीक्षेत जर्मन भाषेतील मूलभूत माहिती विचारली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र सरकारकडे जमा करावे लागते. त्यानंतरच व्हिसाची प्रक्रिया पुढे सुरू राहते. हा नियम युरोपीय देशांतून येणाऱ्या लोकांसाठी मात्र लागू नाही....
  April 28, 11:35 AM
 • कोलंबो -पूर्व कोलंबोमध्ये शनिवारी पोलिसांनी छाप्याची कारवाई सुरू ठेवली. त्या वेळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी स्वत:ला पेटवून दिले. त्यात ६ मुले, ३ महिलांसह १५ जणांचा मृत्यू झाला. चर्चवरील हल्ल्यानंतर पाेलिसांनी सातत्याने संशयितांची शोध मोहीम सुरूच ठेवली आहे. चर्च व हॉटेलवरील हल्ल्यांमागे नॅशनल तोविथ जमात (एनजेटी) संघटनेच्या स्थानिक दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवले, असे तपास यंत्रणेला वाटते. विशेष पथक, लष्कर यांची संयुक्त तपास मोहीम सुरू आहे. कोलंबोपासून ३६०...
  April 28, 11:27 AM
 • कोलंबो - श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर संशयित आणि दहशतवाद्यांना पकडण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. अशाच स्वरुपातच्या एका धाडीत शनिवारी एका दहशतवाद्याने आत्मघातकी हल्ला घडवला. सुरुवातीला दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवले. ही घटना आयसिस समर्थक दहशतवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) च्या ठिकाणावर घडली. यामध्ये 15 जणांचा मत्यू झाला आहे. त्यात 6 चिमुकले आणि 3 महिलांचा समावेश होता. तत्पूर्वी 21 एप्रिल रोजी श्रीलंकेत 8 साखळी...
  April 27, 05:00 PM
 • टाेकियो -जपानमधील एका रेस्तराँने ग्राहकांना आरामदायी वाटावे म्हणून सोन्याचे बाथटब बनवले आहे. ते १३० सेंटीमीटर रुंद व ५५ सेंमी खोल आहे. त्यात एक-दोन वेळा स्नान करता येऊ शकते. ग्राहकांना हे टब १ ते १० तासांपर्यंत भाड्याने घेता येऊ शकते. त्यासाठी एक तासाचे तीन हजार रुपये मोजावे लागतील. हुईस टेन बॉच यांनी ते तयार केले आहे. १८ कॅरेटच्या सोन्यापासून हे बाथटब बनवण्यात आले आहे. गिनीज बुकमध्ये या बाथटबची नोंद झाली आहे. चीन व दक्षिण कोरियातील पर्यटकांसाठी ते तयार करण्यात आले आहे. कारण हे पर्यटक अशी...
  April 27, 08:52 AM
 • डेनेव्हर (कोलोराडो) -अमेरिकेतील कोलोराडोमध्ये ट्रकचा विचित्र अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या ट्रकला आग लागली होती. त्यानंतर अनेक वाहने येऊन त्यावर धडकली. त्यात किमान ४ जणांचा मृत्यू झाला. आगीने तीन ट्रक व १२ कार आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या. त्यानंतर मागून आलेल्या गाड्यांतही धडका झाल्या. घटनेत १२ लाेक जखमी झाले आहेत. त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. या अपघातात किमान २८ वाहनांचे नुकसान झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. आग व वेगवान स्फोटांमुळे कोलोराडो महामार्गाचेही...
  April 27, 08:45 AM
 • काेलंबाे -श्रीलंकेत ईस्टर संडेला झालेल्या साखळी बॉम्बस्फाेटाच्या चार दिवसांनंतर गुरुवारी पुन्हा राजधानी परिसर स्फाेटाने हादरला. काेलंबाेपासून ४० किमी अंतरावरील पुगाेडा शहरात स्फाेट झाला. सुदैवाने त्यात काहीही हानी झाली नाही. या हल्ल्यानंतर देशात अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान गुरुवारी श्रीलंका सरकारचे प्रवक्ते सुदर्शन गुणवर्धने म्हणाले, रविवारी पंचतारांकित सिनामाेन ग्रँड हाॅटेलमध्ये स्फाेट घडवणाऱ्या दाेन आत्मघाती हल्लेखाेर भावांपैकी एकास काही वेळापूर्वी...
  April 26, 11:34 AM
 • जेरुसलेम -इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे ज्यू नागरिकांचा सण पासओव्हरच्या सुट्या घालवण्यासाठी सध्या कुटुंबासाेबत गोलान भागात अाहेत. गोलानच्या डाेंगररांगेतील नव्या वसाहतीला अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे नाव देण्याची माझी इच्छा अाहे. कारण डाेनाल्ड ट्रम्प यांनी या डाेंगराळ भागावर इस्रायलच्या अधिकारास मान्यता दिली अाहे. याबद्दल अाभार मानण्यासाठी मी हे पाऊल उचलणार अाहे, असे नेतन्याहूंनी सांगितले. सुमारे १,२०० चाैरस मीटरमध्ये पसरलेला हा भाग सिरियाची राजधानी दमास्कसपासून...
  April 26, 11:24 AM
 • जकार्ता -भारतासाेबतच्या राजनयिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इंडोनेशियाने रामायणवर विशेष डाक तिकीट काढले आहे. त्याचे डिझाइन इंडोनेशियन शिल्पकार पद्मश्री बपक न्योमन नौरता यांनी बनवले आहे. याबाबत जकार्तातील भारतीय दूतावासाने सांगितले की, या तिकिटावर रामायणातील सीतेला वाचवण्यासाठी जटायू व रावणाचा युद्धप्रसंग दाखवला आहे. ही तिकिटे जकार्ताच्या फिलाटेली संग्रहालयात प्रदर्शनात ठेवली जातील. तिकीट प्रकाशनावेळी भारताचे राजदूत प्रदीपकुमार रावत व इंडोनेशियाचे...
  April 26, 11:18 AM
 • मॉस्को -उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन - व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीपूर्वी रशियाने आपली लष्करी बळात प्रचंड वाढ केली. रशियाने जगातील सर्वात मोठी पाणबुडी बेलगोरोडला आपल्या नौदलाच्या शस्त्रागारात सामील केले. ६०४ फूट लांबीच्या बेलगोरोडमध्ये६ अण्वस्त्रसज्ज टॉरपिडो आहेत. त्यावरून पाणबुडीच्या संहारक क्षमतेचा अंदाज येऊ शकेल. हे टॉरपिडो २ मेटाटन स्फोटके सोबत वाहून नेऊ शकतात. २ मेटाटन स्फोटकांची क्षमता जपानच्या हिरोशिमामध्ये झालेल्या स्फोटाच्या १३० पट जास्त असते. पाणबुडीने एक प्रहार...
  April 26, 11:13 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात