जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

  • बीजिंग - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत संसदेत वादग्रस्त कायदा मंजूर केला. या कायद्याने ते आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष पदी राहू शकतात. याचे पडसाद आता परदेशांत राहणाऱ्या चिनी लोकांमध्ये कॅम्पेनच्या स्वरुपात उमटले आहेत. पाश्चात्य देशांमध्ये शिकणाऱ्या चिनी विद्यार्थ्यांनी शी यांच्या विरोधात #NotMyPresident मोहिम सुरू केली आहे. यात विविध विद्यापीठ आणि इतर परिसरांमध्ये चिनी आणि इंग्रजी भाषेतील पोस्टर्स लावले जात आहेत. यासाठी ट्विटरवर एक पेज देखील तयार...
    March 12, 12:08 PM
  • बीजिंग- चीनने राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन कार्यकाळांच्या अनिवार्यतेचा नियम रद्द करून रविवारी त्यात संवैधानिक दुरुस्ती केली. त्यास दोन तृतीयांश सदस्यांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता शी जिनपिंग यांच्यासाठी चीनचे आजीवन राष्ट्राध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक बैठकीत नवीन संविधानात्मक दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली. सुमारे तीन हजार सदस्यांचा समावेश असलेल्या नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये संविधान दुरुस्ती प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या...
    March 11, 11:32 PM
  • बीजिंग- डोकलाममधील तणावानंतर भारत-चीन यांच्यात संशय निर्माण झाला होता. त्याची जागा विश्वासाने घ्यायला हवी. आगामी काळात राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती असल्यास द्विपक्षीय संबंध सकारात्मक होतील. चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्तीने परस्परांसोबत संघर्ष नव्हे तर नृत्य करायला हवे. दोन्ही देश एकत्र आल्यास एक अधिक एक अकरा होईल, असा विश्वास चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी व्यक्त केला. गत वर्षी डोकलामचा पेच ७३ दिवसांपर्यंत चालला होता. त्यामुळे उभय देशांत युद्धासारखी स्थिती निर्माण झाली होती....
    March 9, 03:45 AM
  • इंटरनॅशनल डेस्क - चीनचे चौथे सर्वात धनाढ्य व्यक्ती असलेले वांग जिआनलिन फोर्ब्सच्या टॉप 30 यादीत समाविष्ट आहेत. वांग डालियन वांडा ग्रुप कॉर्पोरेशन लिमिटेडचे संस्थापक आहेत. 2015 मध्ये ते आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योजक ठरले होते. त्यांनी चीनचे अलीबाबा फाउंडर जॅक मा आणि ली का शिंग यांनाही पिछाडीवर टाकले होते. पण, त्यांना ही संपत्ती आणि बिझनेस सांभाळण्यासाठी वारसदार सापडत नव्हता. त्यांच्या मुलाने अब्जावधींची संपत्ती नकारली होती. - वांग 1970 ते 1986 पर्यंत चिनी लष्करात होते. यानंतर एक छोटे...
    March 9, 12:02 AM
  • इंटरनॅशनल डेस्क- कधी काळी वाळवंटातील पडिक जमिन आणि गरीबीमुळे आपल्याच देशात बाजूला पडलेल्या चीनमधील कुबुकी डेजर्ट मागील काही दिवसापासून जगभरासाठी एक मिसाल बनून पुढे आले आहे. चीनच्या सरकारने अनेक वर्षे केलेल्या मेहनती आणि नियोजनामुळे आज दुर्लक्षित वाळवंट संपूर्ण बदलले आहे. कधी संपूर्ण चीनमध्ये सॅंडस्टार्मचे कारण बनलेले हे काबुकी वाळवंट आज आपल्या टूरिजम आणि इंडस्ट्रियल पॉवर साठी जगात ओळखले जाऊ लागले आहे. अशी बदलली स्थिती.... - मंगोलियाच्या आतील बाजूला असलेले काबुकी डेजर्ट चीनमधील 7...
    March 5, 10:20 AM
  • बीजिंग - चीनमध्ये एका शालेय विद्यार्थिनीने चक्क 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तिने हा टोकाचा निर्णय मानसिक तणावात येऊन घेतल्याचे तिच्या आईने सांगितले. विशेष म्हणजे, चक्क 15 व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतरही ती जिवंत आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे तिच्यावर इतका दबाव आला आणि ती कशी जिवंत वाचली याची माहिती चीनच्या माध्यमांनी दिली आहे. होम वर्क अपुरे असल्याचे टेन्शन इयत्ता 6 वीत शिकणारी चिमुकली शाळेतून परतली तेव्हापासूनच तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत...
    March 3, 10:13 AM
  • टोकियो- जपानची राजधानी टोकियोत असलेले फुरिन मोटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 18 वर्षापूर्वी या हॉटेलचे दरवाजे कायमचे बंद करण्यात आले होते. लोक या हॉटेलला भुताटकीची जागा समजू लागले होते. त्यामुळे लोक त्याच्या आसपासही फिरत नव्हते. मात्र, आता इतक्या वर्षानंतर फोटोग्राफर बॉब थिसेनने येथील फोटोज आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत. या थीमवर तयार केले होत्या रूम्स... - नेदरलंडचा राहणारा 32 वर्षाचा फोटोग्राफर बॉब थिसेनने जपानच्या या लव्ह हॉटेलचे फोटोज घेतले आहेत. - हॉटेलमध्ये एकाहून एक सरस असे दहा...
    March 2, 10:36 AM
  • बीजिंग - चीनमध्ये पारंपारिक औषधी आणि खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी जंगली बेडकांची निर्दयीपणे शिकार केली जाते. यात जिवंत बेडूकच्या शरीरात तार खुपसून टांगले जाते. ही छायाचित्रे त्याच बेडकांच्या समूहाची आहेत. चीनच्या जिलीन प्रांतातील किराणा दुकानांवर हे चित्र सामान्य आहे. यात बेडूक मरेपर्यंत टांगल्या जातो. यानंतर त्यातून निघणाऱ्या कोलेजन (शरीरातून निघणारे हाय प्रोटीनयुक्त चिवट पदार्थ) घेऊन त्यापासून हस्मा हे खास खाद्यपदार्थ बनवले जाते. याच पदार्थापासून चीनमध्ये अॅन्टी एजिंग क्रीम,...
    February 28, 04:10 PM
  • इंटरनॅशनल डेस्क- चीन जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा विकसनशील देश आहे. याच कारणामुळे तेथे सध्या वेगाने शहरीकरण होत आहे. चीन सरकारने सुद्धा काळाची गरज ओळखून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा तयार करण्यावर भर दिला. चीनसारख्या अवाढव्य देशात मागणी-पुरवठा याचा कधी कधी मेळ लागत नाही. याचा परिणाम असा झाला आहे की, चीनमध्ये आता अनेक शहरे ओसाड पडली आहेत. त्यामुळे त्यांना भूत शहर म्हटले जाते. यातीलच एक आहे कांगबाशी डिस्ट्रिक्टमधील आर्दोस सिटी. यामुळे ओसाड पडलेय शहर.... - शहर वसवल्यानंतरही हे खाली का...
    February 28, 10:11 AM
  • चीनच्या एका कंपनीने देशातील अशा लोकांवर फोकस केला आहे ज्यांच्या खिशात फार थोडे पैसे आहेत आणि ते आपल्या इच्छा पूर्ण करु शकत नाही. वास्तविक चीनच्या कंपनीने देशातील पुरुषांची सेक्स डिझायर पूर्ण करण्यासाठी एक सर्व्हिस सुरु केली आहे. काय आहे ही सर्व्हिस - चीनमधील टच नावाच्या एका प्रसिद्ध कंपनीने देशाची शेअरिंग इकॉनॉमी पुढे घेऊन जाण्यासाठी सेक्स डॉल्स किरायाने देणे सुरु केले आहे. कंपनीने पेइचिंग येथे शेअर्ड गर्लफ्रेंड नावाने ही सर्व्हिस सुरु केली आहे. पुढील स्लाइडमध्ये वाचा,काय आहे...
    February 23, 09:03 AM
  • चेंगडू - डोळे स्वच्छ करण्याच्या अनेक पद्धती पाहिल्या असतील. मात्र, ही चिनी पद्धत खरोखर डोळे उघडणारी आहे. एकच चूक, आणि डोळा गेल्याशिवाय राहणार नाही. चीनच्या शियांग नामक व्यक्ती धारदार रेझर ब्लेडने डोळे साफ करण्यासाठी प्रसिद्ध आहे. डोळे स्वच्छ करण्याची ही प्राचीन कला असल्याचे तो म्हणतो. शियांग ही घातक कलाकारी गेल्या 40 वर्षांपासून करत आहे. 40 वर्षांचा अनुभव - 62 वर्षीय शियांग चेंगडू शहकात गेल्या 40 वर्षांपासून छोट्याशा दुकानावरून आपली कलाकारी दाखवतोय. याच ठिकाणी तो लोकांचे डोळे पैसे घेऊन साफ...
    February 22, 10:47 AM
  • शिनजियांग - जगातील दुसरे सर्वात मोठे वाळवंट असलेल्या चीनच्या धसत्या वाळवंट भागात तेल कंपन्यांच्या कामगारांनी जीव ओतला आहे. स्मशान शांतता असलेल्या या वाळवंटाला मृत्यूचा महासागर म्हणूनही ओळखले जाते. आता तेल कंपन्यांनी या वाळवंटात 15 वर्षांत 436 किमी हायवे बनवला आहे. ठिक-ठिकाणी झाडे लावून परिसर हिरवळ केला आहे. हायवे प्रोजेक्टची सुरुवात 2002 मध्ये झाली होती. तकलामाकन वाळवंट चीनच्या उत्तर-पश्चिमेतील शिनजियांग प्रांतात आहे. 3 लाख 37 हजार चौरस फुटांपर्यंत पसरलेल्या या वाळवंटाचा 85 टक्के भाग...
    February 21, 10:23 AM
  • इंटरनॅशनल डेस्क - चीनची ओळख जगभरात एका सुंदर आणि झपाट्याने विकास करणारा देश म्हणून आहे. येथील आकाशाला भिडणाऱ्या इमारती, नैसर्गिक सौंदर्य मन मोहून टाकते. लाखो पर्यटक वर्षभर चीनला भेट देत असतात. पण या सुंदर देशाच्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ज्या केवळ येथेच घडतात. मात्र यांची कल्पना क्वचितच लोकांना असेल. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चीनशी संबंधित अशाच काही आश्चर्यकारक गोष्टींची माहीती देणार आहोत. पुढील स्लाइड्सवर पाहा, चीन संदर्भातील इतर धक्कादायक तथ्य...
    February 17, 11:20 AM
  • इंटरनॅशनल डेस्क - रशियाच्या सायबेरिया प्रांतात गेल्या अनेक दिवसांपासून लोक प्राचीन मॅमथचे अवशेष शोधून काढत आहेत. हजारो वर्षे जुने असलेले हे अवशेष शोधून आणि त्यांची तस्करी करून स्थानिक लाखो रुपयांची कमाई करत आहेत. यात सर्वात महाग या प्राचीन महाकाय हत्तींचे (मॅमथ) दात आहेत. काळ्या बाजारात या हस्तीदंतांना 30 ते 40 हजार डॉलर (जवळपास 22 लाख रुपये) मिळत आहेत. फोटोग्राफर एमॉस चॅपल यांना ही गोष्ट सायबेरियातील स्थानिकांकडून कळाली आहे. चॅपल यांनी त्याचेच काही फोटोज टिपले आहेत.हिमयुगात होते मॅमथ... -...
    February 16, 10:41 AM
  • बीजिंग - चीनमध्ये एका अवघ्या 7 वर्षीय मुलाचे काम करतानाचे फोटो व्हायरल झाले. तो लोकांच्या दारांवर जाऊन पार्सल डिलिव्हरी करतो. इतक्या लहान वयात काम करणारा हा मुलगा जगातील सर्वात छोटो डिलिव्हरी बॉय म्हटला आहे. शियाओ चांग जिआंग असे त्याचे नाव असून तो चीनच्या किंगदाओ शहरात एका कुरिअर कंपनीत काम करतो. वयाच्या 7 व्या वर्षी तो डिलिव्हरी बॉय कसा बनला याची कहाणी अतिशय भावूक आहे. पुढील स्लाइड्सवर वाचा, जगातील सर्वात छोट्या डिलिव्हरी बॉयची कहाणी...
    February 14, 10:26 AM
  • माले/कोलंबो/बीजिंग- चीनने मालदीवमध्ये भारतीय लष्कराच्या कुठल्याही संभाव्य कारवाईला विरोध केला आहे. मालदीवचे माजी अध्यक्ष मोहंमद नशीद यांनी भारताकडे लष्करी हस्तक्षेपाची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी चीनने म्हटले आहे की, त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडेल. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग म्हणाले की, आंतरराष्ट्रीय समुदायाने मालदीवच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करून रचनात्मक भूमिका बजवावी. तेथील परिस्थिती आणखी खराब होऊ नये, असे पाऊल कोणत्याही देशाने उचलू नये....
    February 8, 12:58 AM
  • इंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये सोशल मीडियावर एका आईचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक आई आपल्या बाळाला हातात धरून आहे. भर रस्त्यावर बाळ आणि पतीसह थांबलेली ही महिला आपल्याच छातीचे दूध विकत आहे. मन हेलावून सोडणारी ही घटना पाहून लोकांनी गर्दी केली. तेव्हा पतीनेच आपली पत्नी असे का करत आहे याचे कारण सांगितले. ती आपले दूध विकून आपल्या बाळाच्या हॉस्पिटलचे बिल फेडण्यासाठी निधी उभारत होती. - चीनचे प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सिना वीबोवर हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला....
    February 6, 10:10 AM
  • इंटरनॅशनल डेस्क - चीनच्या फांगदा स्पेशल स्टील टेक्नोलॉजीने आपल्या कर्मचाऱ्यांना 163 कोटी रुपयांचा रोकड बोनस म्हणून वाटला आहे. हा सगळाच निधी कर्मचाऱ्यांना नकदी स्वरुपात देण्यात आला. इतकी मोठी रक्कम कर्मचाऱ्यांचे हात आणि खिश्यांमध्ये मावत नव्हती. त्यामुळे, नोकरदार चक्क पोत्यांमध्ये भर-भरून पैसे आपल्या घरी नेताना दिसून आले. या कंपनीच्या स्टील युनिटमध्ये 5 हजार कर्मचारी आहेत. फांगदाची वार्षिक कमाई 82,000 कोटी रुपये आहे. - कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना 163 कोटी रुपये बोनस दिला. अर्थात...
    February 5, 02:49 PM
  • बीजिंग- चीनने आक्रमक धोरणा राबवताना श्रीलंकेसोबत जवळीक वाढवल्याची कबुली राष्ट्रप्रमुखांनी दिली आहे. चीन-श्रीलंका संबंध दृढ करण्यावर आम्ही सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे, असे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. श्रीलंकेसोबतचे सामरिक संबंध वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे सांगून जिनपिंग यांनी रविवारी श्रीलंकेला ७० व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिनपिंग व त्यांचे समकक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांच्यात या पार्श्वभूमीवर संभाषण झाले. ते पुढे म्हणाले, उभय नेत आणि...
    February 5, 06:24 AM
  • इंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये एक अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिचे वय फक्त 11 वर्षे असून ती 5 महिन्यांची गर्भवती आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या या अवस्थेसाठी जबाबदार असलेला नराधम तब्बल 50 वर्षांचा आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून तिचे पालक आता डॉक्टरांकडे गर्भपाताच्या याचना करत आहेत. शाळेतच तिच्यावर हा अत्याचार गेल्या 2 वर्षांपासून सुरू होता. तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार झाला, तेव्हा ती फक्त 9 वर्षांची होती. पुढील स्लाइड्सवर वाचा, कोण आहे तो नराधम आणि...
    January 30, 11:53 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात