जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

 • बीजिंग - चीनने बुधवारी दावा केली की, दहशतवादी मसूद अझहरवर बंदी लावण्यासाठी अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सने आम्हाला काेणताही अल्टिमेटम दिला नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी सांगितले की, हे प्रकरण समझाेत्याच्या प्रगतीसाठी वाटचाल करत आहे. मात्र, या प्रकरणातील अडथळे हटवण्यासाठी चीनला २३ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला असल्याचे प्रसारमाध्यमे कसे काय सांगत आहेत हे कळत नाही. त्यामुळे मीडियाने अशा प्रकारचे वृत्त देणाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले पाहिजे. संयुक्त...
  April 18, 12:47 PM
 • वॉशिंग्टन -दहशतवादी मसूद अझहरच्या मुद्द्यावर अमेरिकेने भारताचे समर्थन केले आहे. मुस्लिमांबद्दलच्या चीनच्या दुटप्पी धोरणावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिआे यांनी टीका केली. चीन देशांतर्गत पातळीवर अर्थात घरात लाखो मुस्लिमांचा छळ करतो. परंतु हिंसाचार घडवणाऱ्या दहशतवादी संघटनांना संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत निर्बंध लागू नयेत यासाठी त्यांचा बचाव करतो, असे पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. चीनने शिनजियांग प्रांतात २०१७ पासून आतापर्यंत १० लाखांहून जास्त उइगर, कजाख व इतर...
  March 29, 10:05 AM
 • बीजिंग - अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असे त्रिवार सांगणारे व तैवानला स्वतंत्र देश दर्शवणारे सुमारे ३० हजार नकाशे चीनने नष्ट केले आहेत. विशेष म्हणजे हे नकाशे चीनमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये मंगळवारी यासंबंधीचा दावा करण्यात आला आहे. या नकाशांना इतर देशांत पाठवले जाणार होते. ते नेमके कोणत्या देशात पाठवले जाणार होते, हे मात्र स्पष्ट नाही. नकाशे नष्ट करणे वैध आहे. चीनचे सार्वभौमत्व व क्षेत्रीय अखंडत्वासाठी हे महत्त्वाचे असल्याचा दावा चीन...
  March 27, 11:06 AM
 • बीजिंग - चीनमधील एका रासायनिक प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटात किमान ४७ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदतकार्याद्वारे पीडितांचा शोध घ्यावा आणि त्यांनी योग्य ती मदत देण्यात यावी, असे आदेश युरोप दौऱ्यावरील राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले आहेत. स्फोट व आगीनंतर ८८ लोकांना घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात यश मिळाले. स्फोट एवढा भयंकर होता की त्यात परिसरातील अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. स्फोटामुळे भूकंपासारखे हादरे जाणवले. त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक मृत्युमुखी...
  March 23, 10:43 AM
 • बीजिंग ।चीनने मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्राच्या माेहिमेवर व्हेटोचा वापर केला होता. त्यानंतर भारतात सोशल मीडियावर चिनी उत्पादनावर बहिष्कार मोहीम चालवण्यात आली. अनेक नेते आणि व्यापाऱ्यांनी बहिष्काराच्या बाजूने मत व्यक्त केले. यावर आता चीनची प्रतिक्रिया आली आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित एका लेखात म्हटले आहे की, भारताला आवडो अथवा न आवडो, चिनी वस्तूंची खरेदी करणे त्यांची मजबुरी आहे. भारताकडे दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. लेखामध्ये...
  March 20, 10:15 AM
 • बीजिंग ।चीनमध्ये एका डॉक्टरने 3 हजार किलोमीटर दूर बसून पार्किन्सनने ग्रस्त झालेल्या रुग्णाच्या मेंदूची शस्त्रक्रिया केली. रोबोटच्या मदतीने केलेल्या या सर्जरीत ५ जी मोबाइल नेटवर्कचा वापर करण्यात आला. जगात अशी पहिलीच शस्त्रक्रिया झाल्याचा दावा चिनी माध्यमांनी केला. रुग्ण बीजिंगच्या एका रुग्णालयात दाखल होता,तर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर लिंग झिपेई ३००० किमीवरील हेनान प्रांताच्या सान्या शहरात होते. डॉक्टर झिपेईंनी सान्या येथूनच रोबोट आणि मशीन नियंत्रित केल्या. एका मोबाइल...
  March 19, 01:58 PM
 • बीजिंग । चीनमध्ये एका व्यक्तीने पत्नीचे आपल्यावर किती प्रेम आहे, याची परीक्षा घेण्यासाठी कारसमोर उडी घेतली. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तो बोलतो आहे. त्याचे नाव पॅन असे आहे. तो बीजिंगमध्ये पत्नीसह राहतो. चौकशीत त्याने पोलिसांना सांगितले, आपल्या पत्नीचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर मला वाचविण्यासाठी ती पुढे येईल, असे मला वाटत होते. मी तिच्या प्रेमाची परीक्षा घेत होतो. पत्नी म्हणाली, त्याला अनेकदा मी अपघातापासून...
  March 18, 12:02 PM
 • हेनान- चीनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे सामाजिक व आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २०५० पर्यंत ३३ कोटी चिनी नागरिकांचे वय ६५ वर्षांहून जास्त होईल. जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेसाठी ही सुखावह बातमी नाही. हाँगकाँग येथील पेन्शन फंड स्टर्लिंग फायनान्स लि.चे चेअरमन स्टुअर्ट लॅकी म्हणाले, भविष्यात चीनसाठी ही सर्वात मोठी समस्या ठरेल. अशीच स्थिती राहिल्यास चीनची लोकसंख्या २०२९ मध्ये १ अब्ज ४४ कोटी पर्यंत पोहोचून घसरणीला...
  February 17, 09:29 AM
 • बीजिंग- चीनमधील लियाओनिंग प्रांतातील बोहाई समुद्राचे हे छायाचित्र आहे. एक आठवड्यापूर्वी २०० हून अधिक मच्छीमार नावातून मासे पकडण्याच्या मोहिमेवर निघाले होते. परंतु अचानक थंडी वाढली आणि तापमान उणे ४० डिग्री खाली गेले. तेव्हा मच्छीमार आपल्या नावासह बर्फ झालेल्या समुद्रात फसले. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वांना वाचवण्यात यश आले. दुसरीकडे बुधवारी जेव्हा हवामान स्वच्छ झाले आणि ऊन पडले. तेव्हा कुठे समुद्रातील बर्फ वितळला. काही नाविकांनी तेथून नावा सुरू केल्या आणि पुढील प्रवासास...
  February 16, 11:04 AM
 • बीजिंग- जम्मू-काश्मीरमधील पुलवामात दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४२ जवान शहीद झाले. या हल्ल्याबद्दल चीनने दु:ख व्यक्त केले; परंतु हल्ला घडवणारी संघटना जैश-ए-मोहंमद संघटनेचा संस्थापक मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. चीनचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले की, भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याचा आम्हाला मोेठा धक्का बसला. आम्ही कोणत्याही प्रकारचा दहशतवादाचा विरोध करतो. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा विषय आम्ही जबाबदारीने पाहू....
  February 16, 10:27 AM
 • बीजिंग- जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 42 जवान शहीद झाले. या हल्ल्याबद्दल चीनने दु:ख व्यक्त केले, परंतु हल्ला घडवणारी संघटना जैश-ए-मोहंमद संघटनेचा संस्थापक मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. चीनचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले की, भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याचा आम्हाला मोठा धक्का बसला. आम्ही कोणत्याही प्रकारचा दहशतवादाचा विरोध करतो. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा विषय आम्ही...
  February 15, 06:56 PM
 • बीजिंग- चीनमधील प्रदूषणाचा विळखा वाढत चालला असून त्यामुळे देशातील सरासरी आयुर्मान घटल्याचे दिसून आले. २०३० पर्यंत प्रदूषणामुळे लोकांचे सरासरी वय २.९ वर्षे कमी होण्याची शक्यता आहे, असा दावा अमेरिकी संशोधकांच्या पाहणीतून करण्यात आला आहे. चीनने जागतिक बँकेच्या मापदंडानुसार प्रदूषण कमी करण्यात यश मिळवल्यास सरासरी वयोमान ७६.३ टक्क्यांहून ७९ वर्षांपर्यंत पोहोचू शकेल, असे अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट विभागाने म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांत चीनने...
  February 10, 09:45 AM
 • बीजिंग- भारतात चीनच्या तुलनेने जास्त थिंक टँक आहेत. चायना डेली ने अमेरिकेच्या ग्लोबल गो टू थिंक टँक अहवाल-२०१८ च्या हवाल्याने हा दावा केला आहे.अहवालानुसार अमेरिकेत सर्वात जास्त १८७१ एवढे थिंक टँक आहेत. त्यामुळे अमेरिका अव्वल स्थानी आहे. त्यानंतर भारत-५०९, चीन-५०७ थिंक टँक आहेत. २०१७ च्या तुलनेत अमेरिकेत २०१८ मध्ये एक थिंक टँक कमी झाला आहे. अमेरिकेत २०१८ मध्ये १८७२ थिंक टँक होते. अमेरिकेत २०१७ मध्ये सर्वात जास्त थिंक टँक होते.धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतात २१६ थिंक टँक केवळ एकाच वर्षात...
  February 2, 12:12 PM
 • बीजिंग- चीनमध्ये नवे वर्ष ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. याची तयारी जोरात आहे. पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी झेजियांग प्रांताच्या एका हॉटेलात गरम पाण्याने आंघोळ करण्याबरोबरच आवडीची फळे व भाज्यां खाऊ शकता. याला ह्यूमन हॉट पॉट असे नाव देण्यात आले आहे. हा हॉटपॉट नऊ विभागात समान विभागण्यात आला आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये पाण्यासोबत खाण्याचे साहित्य आहे. यात संत्री, सफरचंद, लिंबू, केळी, मका, टोमॅटो, मिरची व मशरूम आदी वस्तू आहेत. नवे वर्ष व स्प्रिंग फेस्टिव्हलदरम्यान हेल्दी लाइफस्टाईलला...
  February 2, 09:52 AM
 • बीजिंग- अण्वस्त्र पुरवठादार गटात भारताच्या सदस्यत्वाला विरोध दर्शवणाऱ्या चीनने भारताला सबुरीने घ्या असा सल्ला दिला आहे. अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या देशांना सामावून घेण्यावर राजनयिक पातळीवर विचार-विनिमय करण्याचे आश्वासनही चीनने देऊन टाकले आहे. खरे तर चीनने या संघटनेत भारताच्या सदस्यत्वालाच सुरुवातीला तीव्र विरोध केला होता. मात्र, आता चीनच्या तोंडी सबुरीची भाषा आल्याचे दिसून येते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शाँग म्हणाले, तूर्त अण्वस्त्र...
  February 1, 09:26 AM
 • शांघाय | चीनने जगातील सर्वात मोठ्या तारांगणाचे काम पूर्ण केले आहे. शांघायच्या लिनगँक अॅव्हेन्यूमध्ये बनवण्यात आलेले हे तारांगण ५८,६०० चौरस फुटांमध्ये विस्तारलेले आहे. यावर ७.८ कोटी डॉलर (सुमारे ५५० कोटी रुपये) खर्च झाले आहेत. २०२० मध्ये हे सामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. चीनने लोकांमध्ये अंतराळाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हे उभारले आहे. तारांगणाची तीन भागांत विभागणी तारांगणाच्या मुख्य प्रदर्शनाचा भाग तीन भागांत होम, युनिव्हर्स आणि निर्मितीचा प्रवास यात विभागलेला आहे. यातील...
  January 30, 09:22 AM
 • व्हिडिओ डेस्क : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन मेकॅनिक जगातील सर्वीत महागड्या गाड्यांमधील एक रॉल्स रॉयस घोस्टची सफाई आणि मेटेंन्स करताना दिसत आहेत. सफाई आणि मेटेंन्स करण्यासाठी कारला 8 फूट उंचावर लटकविले होते. पण काम करताना अचानक गाडीचा तोल जातो. कोणाला काहीच न कळता कार वेगाने खाली येते आणि एक मेकॅनिक त्या कारच्या खाली सापडतो. हा व्हिडिओ चीन येथील असल्याचे सांगितले जात आहे.
  January 27, 12:52 PM
 • बीजिंग - कुठल्याही कर्मचाऱ्याला बोनसची फार उत्सुकता असते. काही कंपन्या आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निर्धारित वार्षिक बोनस देत असतात. तर काही कंपन्या टार्गेट पूर्ण केल्यानंतर वर्षाच्या शेवटी किंवा एखाद्या उत्सवाला बोनस देऊन कर्मचाऱ्यांना खुश करतात. पण, गोष्ट चीनची असेल तर न्यारीच... येथील एका कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसचा ढीग लावून अक्षरशः डोंगर केला. त्या बोनसचे काही फोटो सध्या जगभरात व्हायरल होत आहेत. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सुमारे 315 कोटी रुपये...
  January 24, 12:02 AM
 • नवी दिल्ली-पंजाबमध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय विज्ञान परिषदेत कौरवांना टेस्ट ट्यूब बेबी संबोधल्याने निर्माण झालेला गोंधळ अद्याप शमला नाही, तोच विज्ञानमंत्र्यांनी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे नाव बदलून भारत माता मंत्रालय ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला. यानंतर लगेच नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. या दोन वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर दिव्य मराठीने देशातील वैज्ञानिक स्थितीचा आढावा घेतला. पडताळणीने खूप चकित होणारी तथ्ये आढळली. सुमारे दोन दशकांपूर्वी भारत व चीन याबाबतीत बरोबर होते. आता चीन...
  January 20, 07:30 AM
 • बीजिंग- जीवांचा शोध घेताना चीनने चंद्रावर कापसाचे झाड लावण्याचा प्रयत्न केला. त्यात यशही मिळाले होते. परंतु ते झाड नष्ट झाले. अहवालानुसार, हे झाड ऊन मिळाल्याने जिवंत होते. परंतु रात्र होताच पारा घसरून ते उणे १७० डिग्रीवर पोहचले. झाडाला इतके थंड तापमान सहन झाले नाहीे. चंद्रावर एक रात्र दोन आठवड्याची असते. यादरम्यान तापमान घसरते. दिवसा येथे १२० डिग्री तापमान जाते. चीनने ३ जानेवारीला रोव्हर Change 4सोबत कापूस, बटाटे व सरसोचे बी, माशीचे अंडे पाठवले होते. परंतु यात फक्त कापसाचे झाड वाढले. इतर...
  January 19, 10:47 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात