जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

 • बीजिंग- चीनमध्ये एक अजब अपघाताचे प्रकरण गाजत आहे. येथे एका सायकल व कारच्या धडकेत सायकलचे नुकसान झाले नाही. उलट कारच्या बोनटचे खूप नुकसान झाले. या अपघाताचे छायाचित्र प्रसिद्ध होताच काही लोकांनी याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. आता नोकिया मोबाइल कंपनीने सायकल निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे का? मोबाइलप्रमाणेच त्यांची सायकल मजबूत बनवलीय का? असा सवालही मिश्कीलपणे विचारण्यात आला आहे, तर काही लोकांनी ही छायाचित्रे व व्हिडिओज बनावट असल्याचे म्हटले आहे. मात्र, शेनजान शहर पोलिसांनी...
  January 6, 12:05 PM
 • बीजिंग - दिवसेंदिवस संरक्षण खर्च वाढवून अमेरिकेला आव्हान देणाऱ्या चीनने मदर ऑफ ऑल बॉम्ब तयरा केला आहे. चीनने या बॉम्बची चाचणी सुद्धा घेतली असून त्याच्या ताकदीचा नमूना संरक्षण मंत्रालयाने दाखवला. चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार, हा बॉम्ब आतापर्यंतचा सर्वात शक्तीशाली आणि विध्वंसक बॉम्ब आहे. उल्लेखनीय बाब अमेरिकेकडे सुद्धा मदर ऑफ ऑल बॉम्ब (MOB) आहे. परंतु, चीन अमेरिकेच्या एक पाऊल पुढे निघाला. अमेरिकेचा मॉब नेण्यासाठी मोठे विमान लागते. परंतु, चिनी मॉब हलक्या लढाऊ विमानांनी सुद्धा कुठेही...
  January 5, 04:22 PM
 • बीजिंग/नवी दिल्ली- रेडमी सिरीजचे यश पाहता चिनी मोबाइल फोन कंपनी श्याओमीने यावर्षी या नावाचा स्वतंत्र ब्रँड बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रेडमी सिरीजला श्याओमीने जुलै २०१३ मध्ये स्वस्त स्मार्टफोन म्हणून बाजारात आणले होते. भारतीय बाजारात या सिरीजची मोबाइल फोन विक्री चांगलीच यशस्वी ठरली आहे. चीनमध्ये १० जानेवारी रोजी ४८ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर असलेला फोन लाँच होणार असून त्याचबरोबर रेडमीला स्वतंत्र ब्रँड म्हणून उतरवण्यात येणार आहे. श्याओमीचे स्वस्तातील रेडमी आणि रेडमी नोट सिरीजचे...
  January 5, 08:43 AM
 • बीजिंग- आइस सिटी म्हणून ओळख असलेल्या चीनमधील हार्बिन शहरात पर्यटकांनी नवीन वर्षाचे स्वागत बर्फाचे २०१९ पुतळे (स्नाेमॅन) तयार करून केले. हे पुतळे कलाकार नाही, तर सामान्य व्यक्ती करतात, तेही उणे १५ डिग्री तापमानात. हार्बिनमध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्यात तापमानात माेठी घसरण हाेते. यामुळे बर्फाचे पुतळे बनवण्यासाठी लाेक येतात. येथील आइस अँड स्नाे फेस्टिव्हल पाहण्यासाठी माेठ्या संख्येने पर्यटक येतात. विमानतळावर दरवर्षी २ काेटी पर्यटकांनी नाेंद हाेते. पर्यटकांसाठी हार्बिनमध्ये तयार...
  January 4, 09:50 AM
 • बीजिंग - पूर्व चीनच्या किन्हुईमध्ये एक भीषण अपघातात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघातात 10 लोक गंभीर जखमी झाले आहेत. जियांग्सू प्रांताच्या वाक्सी शहरातील नानक्वान्यू गावांत सोमवारी(ता.22) झालेल्या दुर्घटनेप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. 150 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणा-या बीएमडब्ल्यू कारने समोरुन आलेल्या दुस-या माजदा कारला धडक दिली, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. तत्पूर्वी वेगाने येणारी ती कार मोटारसायकल आणि गाड्यांना टक्कर दिल्या. बीएमडब्ल्यूचा चालक एका गाडीला धडकल्यानंतर...
  January 3, 07:19 PM
 • बीजिंग - चंद्राच्या डार्क साइडला उतरणारा चीन जगातील पहिला देश बनला आहे. चीनचे चांग-ई-4 अंतराळयान गुरुवारी रात्री यशस्वीरित्या उतरले आहे. चीनच्या स्थानिक वेळेनुसार, सकाळी 10 वाजून 26 मिनिटाला हे यान चंद्रावर उतरले आहे अशी माहिती चीनच्या सरकारी माध्यमांनी जारी केली. या अंतराळयानमध्ये चंद्राच्या त्या भागाला असलेल्या खगोलीय बाबींचा अभ्यास करणारी अत्याधुनिक उपकरणे आहेत. त्या ठिकाणी याच उपकरणांच्या माध्यमातून बायोलॉजिकल प्रयोग सुद्धा केले जाणार आहेत. अंतराळ संशोधनात मैलाचा दगड चीनने...
  January 3, 01:22 PM
 • बीजिंग - चीनमध्ये प्री-स्कूलला जाणाऱ्या 7 सीटर कारचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ग्वांगक्षी प्रांतातील एका शहरात ट्रॅफिक पोलिसांनी क्षमतेपेक्षा जास्त चिमुकल्यांना घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरला अडवून त्यांची चौकशी केली. सुरुवातीला ड्रायव्हरने पोलिसांची माफी मागून सोडून देण्याची मागणी केली. परंतु, फाईन फाडण्यावर ठाम असलेल्या पोलिसांनी शेवटी त्या ड्रायव्हरला खाली उतरवले आणि एक-एक करून त्यातून उतरणाऱ्या चिमुकल्यांची मोजणी सुरू केली. फक्त 7 जणांना घेऊन जाण्यास सक्षम...
  January 2, 11:49 AM
 • बीजिंग - नवीन वर्षात चीनने कर बुडव्यांवर लगाम लावण्यासाठी कठोर नियम लागू केला आहे. चीनच्या कर वसूली प्राधिकरणाने आणलेल्या नियमानुसार, कर नाही भरल्यास कुणालाही देश सोडता येणार नाही. हा नियम उद्योजकांसाठीच नव्हे, तर सामान्य नागरिकांना सुद्धा लागू झाला आहे. या नियमात सुरुवातीला असे उद्योजक येतील ज्यांच्यावर 1 लाख युआन (10.26 लाख भारतीय रुपये) एवढे कर बाकी आहे. अशा लोकांचा संपूर्ण तपशील जसे की आयडी कार्ड, बँक अकाउंट नंबर आणि पासपोर्ट डिटेल्स कर प्राधिकरणाच्या डेटाबेसमध्ये असतील आणि त्यांना...
  January 1, 12:49 PM
 • ताईयुआन- चीनमध्ये ताईयुआन शहराजवळ तीन मजली महामार्ग पूल उभारण्यात आला आहे. हा उत्तर-पश्चिम चीनच्या शान्क्सी राज्यातील १,३७० मीटर उंच तियानलोंग पर्वतरांगेत आहे. पुलाची उंची ३५० मीटर आहे. गोलाकार असलेल्या या पुलाची एकूण लांबी ३० किलोमीटर आहे. बॉक्स गर्डरच्या या महामार्ग पुलासाठी ७,००० टन स्टील लागले. याचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच हा महामार्ग खुला केला जाईल. या पुलाच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून हा पूल स्थानिकांसाठी नवा हॉट स्पॉट बनला आहे. लोक येथे येऊन सेल्फी घेताना दिसत...
  December 30, 09:10 AM
 • बेइजिंग- विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने चक्क चिप असणारा स्मार्ट युनिफॉर्म तयार केला आहे. 1500 रुपये किंमत असलेल्या या युनिफॉर्मच्या खांद्याच्या भागावर एक विशिष्ट प्रकारची चिप बसवण्यात आली आहे. या चिपमुळे विद्यार्थ्यांच्या सर्व हालचाली शाळेच्या गेटवर बसवलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टिममध्ये रेकॉर्ड होणार आहे. चीनने तयार केली जगातील सर्वात मोठी लक्ष ठेवणारी सिस्टिम चीनने याआधीही अशाप्रकारची सिस्टिम तयार केली होती. त्याअंतर्गत स्काय नेट नावाच्या...
  December 28, 02:22 PM
 • बीजिंग- चीनचे गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख तथा उप संरक्षण मंत्री मा जियान यांना लाचखोरी व देशाची गुपिते शत्रूला दिल्याच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात ईशान्येकडील एका न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. लाच स्वीकारणे तसेच देशाची गुपिते इतरांना विकण्याच्या कामासाठी सहकाऱ्यांना भरीस पाडण्याचे काम करणे आदी आरोप जियान यांच्यावर होते. हे आरोप सिद्ध झाले असून ते दोषी आढळून आल्याचे लिआेनिंग येथील डालियन इंटरमिडिएट कोर्टाने जाहीर केले. न्यायालयाने दोषी...
  December 28, 08:56 AM
 • बीजिंग- चिनी रेल्वेने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान आणि उपकरणांपासून तयार फॉक्सिंग बुलेट ट्रेनचे स्वतंत्र प्रदर्शन भरवले आहे. १७ बोग्यांच्या रेल्वेची कमाल गती ३५० किलोमीटर प्रतितास, ८ बोग्यांच्या रेल्वे गाडीची गती २५० किलोमीटर आणि आणखी एका मॉडेलची गती १६० किलोमीटर प्रतितास आहे. चिनी रेल्वे हाय स्पीड रेल्वेचे उत्पादन २०१५ पासून करत आहे. हा प्रकल्प २०१२ मध्ये सुरू झाला होता.
  December 27, 08:43 AM
 • चीन- चीनमध्ये एका तरुणाच्या किळसवाण्या सवयीमुळे त्याच्या फुफ्फुसांत इंफेक्शन झाल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. चीनमधील झेंगझाउ शहरातील रहिवासी पेंग (वय 37) असे या तरुणाचे नाव असून अनेक दिवसांपासून त्याच्या छातीत वेदना होत होत्या. त्यानंतर अचानक त्याला श्वास घेणे कठीण झाल्याने आयसीयुमध्ये भरती करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढला तेव्हा ही बाब समोर आली. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, पेंगवर उपचार सुरू असताना त्याच्या फुफ्फुसांत इंफेक्शन झाले होते. अनेक...
  December 26, 02:07 PM
 • बीजिंग- चीनच्या हार्बिन शहरात बर्फापासून साकारलेल्या या चमचमत्या कलाकृतींचे विश्व मंगळवारपासून सर्वांसाठी खुले झाले आहे. स्नो फेस्टिव्हलच्या निमित्ताने त्याची सुरुवात झाली. या महोत्सवाला ४ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून तो फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत चालणार आहे. ईशान्येकडील हेइलाँगजियांगमध्ये दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. केवळ चीनचेच नव्हे, तर जगभरातील पर्यटक या महोत्सवाला हजेरी लावतात. पर्यटकांना या फ्रोझन सिटीचे आकर्षण असते. एखाद्या परिकथेत शोभावे असे...
  December 26, 09:54 AM
 • बीजिंग- अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प यांनी गत अाठवड्यात अफगाणिस्तानसह युद्धग्रस्त तालिबान्यांच्या प्रदेशातून सैन्यसंख्या कमी करण्याची घाेषणा केली. त्यांच्या या निर्णयावर अमेरिकेसह इतर देशांकडून टीका हाेत अाहे, तर काही देशांनी यास याेग्य पाऊल असल्याचे ठरवले अाहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान व चीनमध्ये नुकतीच चर्चा झाली. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महेमूद कुरेशी यांनी मंगळवारी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेऊन अफगाणसह तालिबानमधील सद्य:स्थितीवर चर्चा केली....
  December 26, 09:44 AM
 • वूशी : चीनमध्ये एका ब्यूटी सलूनमधील कर्मचाऱ्यांनी त्यांचे सेल्स टारगेट पूर्ण न केल्यामुळे मालकाने त्यांना अजब शिक्षा केली. सध्या या शिक्षेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी आपल्या बॉससमोर 100 वेळा स्वतःच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, बॉसने आदेश दिला आहे की, स्वतःला जोरात थापड न मारल्यास त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येईल. आपले सेल्स टारगेट पूर्ण न केल्यामुळे बॉसने शिक्षा केल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितले. काय आहे...
  December 26, 12:07 AM
 • बीजिंग - चीनमध्ये एका सावत्र आईला आपल्याच मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तिच्यावर आपल्या मुलाचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे आरोप लागले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सावत्र आई आपल्या 7 वर्षांच्या मुलावर अमानवीय अत्याचार करत होती. शिक्षिकेचे लक्ष मुलाच्या भाजलेल्या हातावर गेले नसते तर हा अत्याचाराचे सत्य लवकर समोर आलेच नसते. सुरुवातीला फक्त मुलाच्या हातावरच भाजल्याच्या खुणा दिसल्या. परंतु, रुगणालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा त्याची चाचणी केली तेव्हा...
  December 21, 12:00 AM
 • बीजिंग- चीनच्या आर्थिक विकासाचा मार्ग सुरूच राहणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून देशाची त्या मार्गावरून वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच त्यावर कोणालाही आपली हुकूमत दाखवता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे नाव न घेता इशारा दिला. ग्रँडीओस ग्रेट हॉलमध्ये मंगळवारी आयोजित चीन फेररचनेच्या ४० व्या वर्धापनदिन समारंभात जिनपिंग बोलत होते.त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. देशात एक छत्री व्यवस्था आहे. त्यात बदल करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु...
  December 19, 09:29 AM
 • बीजिंग- साधारण एक फूट उंच ज्यूस नावाच्या श्वानाने चीनमधील डझनभर चित्रपट व टीव्ही कार्यक्रमात भूमिका बजावून ग्लॅमर प्राप्त केले आहे. मात्र, हा ज्यूस सध्या नव्या कारणाने चर्चेत आला आहे. ज्यूस वार्धक्याकडे झुकला असल्याने त्याचे ग्लॅमर असेच अबाधित राहावे, अशी त्याच्या मालकाची इच्छा होती. ज्यूसची प्रजनन क्षमता अकाली संपुष्टात आल्याने त्याला पिलंही नव्हती. यावर उपाय म्हणून मालक हे जूनने अन्य पर्यायाचा शोध सुरू केला. याच गरजेतून जूनने ज्यूससारखाच हुबेहूब ज्यूस निर्माण करण्याचा ध्यास...
  December 18, 09:25 AM
 • बीजिंग- चीनमधील युन्नान राज्य राज्यात नुजियांग नदीवर रेल्वेचा जगातील सर्वात मोठा आर्क ब्रिज तयार होत आहे. आर्क याच आठवड्यात तयार झाले आहे. याच्या वरती रुळ टाकले जातील. पूर्ण पूल १,०२४ मीटर लांब आणि २५ मीटर रुंद असेल. यावर चार रेल्वेगाड्या एकाच वेळी उभ्या राहू शकतात. २३०मीटर आहे नदीपेक्षा उंच ८ लाख बोल्ट यात लावले ९२२ खांबांचा वापर झाला हे आर्क बनवण्यात
  December 16, 09:08 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात