Home >> International >> China

China News

 • शुझोऊ - व्हर्च्युअल रिअॅलिटीचा अनुभव घेतानाचे हे छायाचित्र चीनमधील शुझोऊ येथील आहे. येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅप्लिकेशन प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांच्या या प्रदर्शनात १० देशांतील २०० पेक्षा जास्त प्रदर्शक आले आहेत. त्यांनी एक हजारपेक्षा जास्त एआय उत्पादने आणि कल्पना सादर केल्या आहेत. या प्रदर्शनात लोकांना रोबोट्स आणि विअरेबल डिव्हाइसचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे. २२ % एआय पेटंट चीनचेे : चीनच्या उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात...
  May 13, 02:23 AM
 • बीजिंग - चीनमध्ये नुकतेच उघडलेले एक हॉटेल आपल्या ग्राहकांना मोफत बिअर आणि पोटभर जेवण देत आहे. झाओ लांग यांनी चीनच्या जिनान शहरात हे हॉटेल उघडले. तसेच प्रसिद्धीसाठी त्यांनी ही शक्कल लढवली. पण, येथे मोफत बिअर आणि जेवण मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. आपल्या हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ त्याने एक गेट लावला आहे. साखळ्यांना बांधलेल्या या गेटमध्ये छोटे-छोटे गॅप ठेवण्यात आले आहे. या सर्व साखळ्यांच्या मधून जो ग्राहक प्रवेश करू शकेल त्यालाच ही ऑफर दिली जाणार आहे....
  May 12, 05:15 PM
 • नवी दिल्ली - अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर आल्याने चालू वर्षात भारताचा आर्थिक विकास दर चीनला मागे टाकत पुन्हा अव्वलस्थानी जाणार आहे. पुढील वर्षी तर या दोन्ही देशांच्या विकास दरातील अंतर एक टक्क्यापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ताज्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फाॅर एशिया अँड द पॅसिफिक (ईएससीएपी) २०१८ च्या आज जारी झालेल्या अहवालानुसार वर्ष २०१८ मध्ये भारताचा विकास दर ७.२ टक्के...
  May 9, 05:56 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - हल्लीच्या लहान मुलांना सांभाळणे एक आव्हान झाले आहे. त्यात अशा मुलांना रागावल्यास कोण-कोणते महाप्रताप करू बसतात याचेच एक उदाहरण चीनमध्ये सापडले आहे. या मुलाच्या पप्पांनी त्याला घरात किती झोपणार असे म्हणत रागावले. त्याचा या मुलाला इतका संताप झाला की त्याने काय केले हे पाहा. तो चक्क पाचव्या मजल्यावर असलेल्या आपल्या घराच्या खिडकीवर आला. त्याच खिडकीच्या छतावर बसून धिंगणा घातला. चीनच्या या 12 वर्षीय मुलाचा व्हिडिओ Pear Video ने आपल्या फेसबूक पेजवर शेअर केला. यानंतर तो व्हिडिओ...
  May 7, 05:20 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एकटे राहणे काय असते याचा अंदाज या 85 वर्षीय वृद्धाला पाहून नक्कीच येईल. चीनच्या बस आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांनी जाहिरात चिटकवल्या आहेत. यामध्ये त्यांनी आपल्याला एकटे मरण्याची भिती वाटते. त्यामुळे, कुणी तरी दत्तक घ्यावे अशी विनंती केली आहे. या वृद्धावर ही वेळ कशी आली यासंदर्भातील स्टोरी सध्या व्हायरल होत आहे. एका माध्यमाला त्यांच्या कथित मित्राने सांगितल्याप्रमाणे, मार्चमध्ये त्याचा मृत्यू झाला. व्हायरल होतेय कहाणी... - या वृद्ध व्यक्तीचे...
  May 7, 10:25 AM
 • बीजिंग - चीनमध्ये चक्क अणु प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी सुद्धा जनावरांचे बळी दिले जातात. अशाच एका प्रकरणामुळे चीनच्या नावाजलेल्या सायन्स इंस्टिट्युटला जाहीर माफी मागावी लागली आहे. पायाभूत विकास आणि माहिती-तंत्रज्ञानात अमेरिकेसह कुठल्याही देशाला मागे टाकण्यासाठी धावपळ करणाऱ्या चीनमध्ये मोठ-मोठे वैज्ञानिक सुद्धा अंधश्रद्धा पाळत असल्याचे या घटनेवरून समोर आले. चायना सायन्स इंस्टिट्युटने नुकतेच एका अणु संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्या इमारतीच्या उद्घाटनासाठी चक्क बोकडाचा बळी...
  May 4, 04:57 PM
 • बीजिंग - चीनमध्ये टिपलेल्या या व्हिडिओवरून जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. बसमध्ये घडलेल्या या प्रकारात एक व्यक्ती लहान मुलाच्या मस्ती करण्यावर इतका चिडला की त्याने क्रौर्याची मर्यादा ओलांडली. त्याने केवळ त्या मुलाला मारलेच नाही तर आपल्या खांद्यापर्यंत उचलून आपटले. यानंतरही त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर लाथा मारल्या. हा व्हिडिओ इतका भयंकर आहे, की पाहून अंगावर काटा येतो. काय आहे या व्हिडिओमध्ये... - चीनचे स्थानिक ऑनलाइन मीडिया...
  May 2, 10:24 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - आपल्या कार्यालयातील अतिरिक्त काम पसंत नसेल तर एकदा चीनचे वर्क कल्चर आवश्य पाहावे. चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगारांचे आयुष्य अतिशय धक्कादायक आहे. अनेक स्टार्ट-अप कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना डेडलाइन देते. ही डेडलाइन शब्दशः त्यांच्यासाठी डेडलाईन ठरते. टारगेट पूर्ण करण्यासाठी त्यांना कार्यालयातच बसून जेवणे, झोपणे आणि सकाळी उठून ऑफिसमध्येच फ्रेश होऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या खुर्चीवर बसावे लागते. तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या कार्यालयात...
  May 2, 10:24 AM
 • बीजिंग - चीनच्या सिचुआन प्रांतातील विमानतळावर एक अजब घटना घडली आहे. विमान उड्डान घेणारच तेवढ्यात एका व्यक्तीने विमानाचे एमरजेंसी गेट उघडले. चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्याचे नाव चेन असे आहे. हैराण झालेल्या विमानातील स्टाफने त्याला प्रश्न विचारला तेव्हा त्याचे उत्तर आणखी चकित करणारे होते. आपल्याला गर्मी होत असल्याने ताजे वारे हवे होते असे तो म्हणाला. त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मला वाटले खिडकी आहे - प्रवासी वृत्तसंस्थेने चायना मॉर्निंग हेराल्डचा दाखला...
  May 1, 11:46 AM
 • वुहान (चीन)- पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यातील अनौपचारिक शिखर बैठक शनिवारी पार पडली. भविष्यात डोकलाम वादासारखी परिस्थिती उद््भवू नये म्हणून उभय देशांनी आपापल्या लष्करांना रणनीतिक निर्देश देण्याचा निर्णय घेतला. उभयतांत विश्वास वृद्धिंगत व्हावा म्हणून संचार व्यवस्था मजबूत केली जाईल. मोदी म्हणाले की, त्यांची चर्चा मुख्यत्वाने भारत आणि चीनदरम्यान व्यापक सहकार्यावर केंद्रित होती. बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले की, दोन्ही...
  April 29, 02:44 AM
 • बीजिंग - नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर होते. यावेळी वुहान येथे झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात बॉलिवूड गाण्याची धून वाजवण्यात आली. चिनी कलाकारांनी तू तू है वही, दिल ने जिसे अपना कहा हे गाण्याची धुन वाजवली. यावेळी शी जिनपिंग आणि मोदी दोघांनीही त्याचा आनंद घेतला. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी नौकाविहार केला. शुक्रवारी मोदी आणि जिनपिंग यांच्या तीन भेटी झाल्या. या तिन्ही भेटी वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या. मोदींनी दिले जिनपिंग यांना भारत भेटीचे निमंत्रण - दोन्ही देशांच्या शिष्टमंडळ...
  April 28, 05:18 PM
 • स्पेशल डेस्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दोन दिवसांच्या अनौपचारिक दौऱ्या आहेत. या समिटवरून उभय देशांचे संबंध मजबूत होण्याची आणि सर्व प्रश्नांची उकल होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांच्या या मधुर संबंधांसोबतच इतिहासातील एक किस्साही आठवू लागतो. जेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीत एक समिट आयोजित केली होती. त्या वेळी चीनकडे आपल्या पंतप्रधानांसाठी एकही एअरक्राफ्ट नव्हते, मग नेहरूंनी त्यांना विमान पाठवून आमंत्रित केले होते. त्या दौऱ्याने कधी आले माधुर्य,...
  April 28, 03:11 PM
 • बीजिंग - चीनच्या ग्वांगदोंग प्रांतातील किंग्युआन शहरातील एका काराओके बारमध्ये आग लागून 18 जणांचा मृत्यू झाला आहे, दुसरीकडे 5 गंभीररीत्या जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात सोमवारी आणि मंगळवारदरम्यान रात्री झाला. पोलिस आणि फायरब्रिगेडने घटनेची माहिती मिळाल्यावर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांना संशय आहे की, जाणूनबुजून कुणीतरी हे अग्निकांड घडवले आहे. पोलिसांनी सुरू केली घटनेची चौकशी - किंग्युआन सुरक्षा विभागाच्या प्राथमिक तपासात अपघातामागे आग...
  April 24, 10:15 AM
 • बीजिंग - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. त्याआधी त्या म्हणाल्या की भारत आणि चीनच्या नागरिकांना एकमेकांच्या भाषेचे ज्ञान असले पाहिजे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 आणि 28 एप्रिल रोजी चीनच्या वुहान शहरात एका अनौपचारिक परिषदेत जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. चीन परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते लू काँग म्हणाले, की दोन्ही नेते सध्याच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. भारत-चीनने एकमेकांची भाषा अवगत करावी - सुषमा स्वराज -...
  April 23, 06:24 PM
 • प्योंगयंग - उत्तर कोरियात झालेल्या भीषण बस अपघातात किमान 36 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी तब्बल 32 जण हे चिनी नागरिक होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू काँग यांनी सांगितल्याप्रमाणे, उत्तर कोरियाच्या ह्वांगे प्रांतात रविवारी रात्री उशीरा हा अपघात घडला. खराब हवामान आणि रस्त्यांचे बांधकाम ही अपघाताची प्रमुख कारणे असू शकतात असा अंदाज स्थानिक माध्यमांनी लावला आहे. - चीनच्या परराष्ट्र मंत्रलयाच्या प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे, अपघाताच्या कारणाचा अजुनही पत्ता...
  April 23, 05:45 PM
 • बीजिंग- पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ आणि २८ एप्रिलला चीनच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जातील. मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत वुहान शहरात अनौपचारिक बैठक करतील. त्यात दोन्ही नेते द्विपक्षीय, आंतरराष्ट्रीय मुद्दे आणि परस्पर सहकार्य वाढवण्यावर चर्चा करतील. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी रविवारी बीजिंगमध्ये भेट घेतल्यानंतर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ही माहिती दिली. यी म्हणाले की, जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून मोदी वुहानच्या दौऱ्यावर येणार आहेत. दोन्ही नेते...
  April 23, 05:56 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - नागरिक जेव्हा सरकारचे भक्त होतात, तेव्हा त्यांना चांगले किंवा वाइट यातील काहीच फरक कळत नाही. काहीही करून आपला नेता किंवा सरकारला खुश कसे करता येईल याकडेच ते लक्ष देतात. चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सत्तेवर विराजमान आहे. कम्युनिस्ट लीडर माओ त्से तुंग याचे संस्थापक सदस्य होते. माओचा सत्ताकाळ संवेदनाहीन अत्याचारांनी भरलेला होता. चीनचे सुप्रीम लीडर असताना माओ यांनी काही वादग्रस्त धोरणे लादली होती. त्याच धोरणांनी चीनच्या 4 ते 7 कोटी जनतेचा जीव घेतला. त्यांच्या...
  April 21, 04:43 PM
 • बीजिंग-चीनने नेपाळला नैसर्गिकदृष्ट्या भारताशी सहकार्य जुळवणारे क्षेत्र असल्याचे सांगून भारत-नेपाळ-चीन आर्थिक प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वाँग यी यांनी नेपाळ-चीन आर्थिक प्रकल्पात भारताने सहभागी व्हावे यासाठी आमंत्रण दिले. नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ग्यावाली यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर यी यांनी हा प्रस्ताव मांडला. उभय देशांच्या परराष्ट्र मंत्रिस्तरीय बैठकीनंतर यी म्हणाले, चीन व नेपाळने हिमालयावर नेटवर्क उभे करण्यावर सहमती व्यक्त केली आहे....
  April 19, 03:23 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - चीनची एक महिला आपल्या यंग आणि ग्लॅमरस लुकमुळे सोशल मीडियावर स्टार बनली आहे. पहिल्या नजरेत ती वीशीतली तरुणी वाटत असली तरीही तिने वयाची पन्नाशी गाठली आहे. लियू येलिन इतकी तरुण दिसते की तिचा मुलगा आणि मुलगी सुद्धा एकसारख्याच वयाचे वाटतात. कित्येक वेळा तिने आपल्या मुलासोबत फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पण, त्या मुलाला ती तुझी गर्लफ्रेंड आहे का अशी विचारणा झाली आहे. इंस्टाग्रामवर स्टार बनलेली येलिन जगभरात चर्चेत आहे. - लियू हिचे क्वीनयेलिन या नावाने सोशल मीडिया अकाउंट आहे....
  April 19, 12:06 AM
 • स्पेशल डेस्क - आई वडिलांचा मृत्यू होतो आणि त्यांच्या निधनानंतर चक्क त्यांच्या बाळाचा जन्म होतो. ऐकूण विश्वास बसत नसला तरीही हे वृत्त खरे आहे. ही घटना चीनमध्ये घडली आहे. 2013 मध्ये झालेल्या रस्ते अपघातात एका कपलचा मृत्यू झाला. त्याच कपलच्या बाळाने आता जन्म घेतला आहे. निधनापूर्वी या कपलने आपले भ्रूण सुरक्षित ठेवले होते. आपले बाळ आयव्हीएफ अर्थात सरोगसीच्या माध्यमातून जन्माला यावे अशी त्यांची इच्छा होती. कपलच्या मृत्यूनंतर आल्या या अडचणी - दांपत्याचा मृत्यू त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप...
  April 15, 02:50 PM
 
जाहिरात

RECOMMENDED