जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

 • बीजिंग । पाकिस्तान व्याप्त काश्मीर भागातील सीमेवर चिनी सैन्य तैनात असल्यावरून भारताने चीनकडे आपली चिंता मांडली आहे. परराष्ट्र मंत्र्यांच्या द्विपक्षीय बैठकीत भारताकडून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. बुधवारी दोन्ही देशांत झालेल्या चर्चेदरम्यान परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांनी भारताला वाटत असलेल्या काळजीबद्दल चीनला अवगत करून दिले. या चर्चेत चीनचे परराष्ट्र मंत्री यांग जिएची हे सहभागी झाले होते. जम्मू-काश्मीर हा भारताचा प्रदेश आहे. त्यावर पाकिस्तानने बेकायदा कब्जा केला...
  February 9, 11:46 PM
 • बीजिंग- दलाई लामा व तिबेटचे निर्वासित प्रधानमंत्री लॅपसोंग सेंजी चीनविरोधी कारवायात गुंतले असल्याने भारताने त्यांच्या सक्रियतेला लगाम घालावा, अशी मागणी चीनचे परराष्ट्रमंत्री यांग जिएची यांनी भारताकडे केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा हे सध्या चीनच्या दौरयावर आहेत. त्यावेळी कृष्णा यांनी तिबेटच्या बाबतीत मत व्यक्त करताना तिबेट हा चीनचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले होते. तसेच चीनला वाटत असेल तर हा प्रश्न सोडविण्यासाठी भारत त्यांना मदत करु शकते, असे म्हटले होते....
  February 9, 01:39 PM
 • सध्या भारतात सर्वत्र थंडीची प्रचंड लाट पसरली आहे. सात-आठ डिग्री तापमानालाही भारतातील लोक गारठले आहेत. तर परदेशात उणे 12,13 डिग्री तापमानात तेथील नागरिक कसे जगत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. अशा थंडीतही चीनच्या एका जोडप्याने आपल्या चार वर्षीय चिमुकल्याला उघडया अंगाने उणे 13 डिग्री तापमानात फिरवले. त्याला थंडीचा त्रास होत असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष केले. थंडीच्या असाह्य हुडहुडीने तो जीवाचा आकांत करत होता. परंतु, त्याचे जन्मदाते आई-वडीलच त्याला रस्त्यावर साचलेल्या बर्फावर इकडून-तिकडे...
  February 9, 09:51 AM
 • बिजींग - वादग्रस्त स्वायत्त तिबेटचा भाग हा चीनचाच असल्याचा निर्वाळा भारताचे परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांनी दिला.तिबेट प्रश्नी भारत ढवळाढवळ करणार नाही.तो चीनचा अंतर्गत मामला आहे.असेही कृष्णा यांनी स्पष्ट केल्यामुळे चीनी सरकार खुश झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून स्वतंत्र तिबेट मुक्तीसाठी लढणा-या 16 नागरिकांनी आत्मदहन केलेआहे.या प्रकरणी आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनविरोधात प्रचंड काहूर उठले असताना कृष्णा यांनी तिबेट प्रश्नी मदतीचे आश्वासन दिल्यामुळे चीनने त्या भूमिकेचे स्वागत...
  February 9, 01:02 AM
 • सीमा प्रश्नावर भारत-चीन यांच्यातील मतभेद आणखीनच वाढले आहेत. याच मुद्दय़ावर दोन्ही देशांमध्ये नुकतीच चर्चेची 15 वी फेरी झाली. या वेळी चीनने भारतावर प्रचंड दबाव टाकला, त्यामुळे चर्चा फिसकटण्याचीही वेळ आली होती. या चर्चेशी संबंधित सूत्रांनुसार आणि प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, चीनने सीमा प्रश्नावर अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. जाणून घेऊया दोन्ही देशांमध्ये झालेली चर्चा आणि सीमा प्रश्नाबाबत..राजधानी दिल्ली येथे भारत-चीनच्या विशेष प्रतिनिधींमध्ये चर्चेची 15 वी फेरी झाली. या वेळी...
  February 3, 11:45 AM
 • बीजिंग - चिनी बाजारपेठेतील हिस्सा घसरताच सरकारने लादलेल्या सर्व अटी-शर्ती मान्य करून गुगलने सपशेल लोटांगण घातले आहे. त्यामुळे भारताचा अरुणाचल प्रदेश गुगलच्या नकाशामध्ये चीनचा भाग म्हणून दाखवणेही गुगल कंपनीला मान्य करावे लागणार आहे.गेल्या वर्षीपासून गुगलच्या ऑनलाइन मॅपिंगची बाजारपेठ 10 टक्क्यांनी घसरली आहे. गुगलला स्थानिक प्रतिस्पर्धी बैदू इन्कॉर्पोरेशनने चांगलेच जेरीस आणले आहे. बैदूचा बाजारपेठेतील हिस्सा 61 टक्के एवढा आहे, असे अधिका-यांनी सांगितले. अगोदर जे गुगल मॅप आघाडीवर होते....
  February 2, 11:47 PM
 • लॉस एंजिल्स - पॉप स्टार मायकेल जॅक्सनचे हात आणि पायाच्या मुद्रा असलेले शिल्प हॉॅलीवूडमध्ये स्थापित करण्यात आले आहे. चायनीज थिएटरच्या आवारात या पॉप आयकॉनला अशा प्रकारे रुपेरी जगताकडून अमरत्व प्रदान करण्यात आले आहे. जॅक्सनच्या प्रिन्स (14), पॅरिस (13), ब्लँकेट (9) या मुलांनी वडिलांच्या हँडग्लोव्हवरून छापे तयार करण्यास मदत केली. जॅक्सनच्या ऐतिहासिक डान्सिंग शूजवरून पायाचे ठसे तयार करण्यात आले आहेत. या शिल्प उभारणीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात किशोरवयीन कलाकार जस्टिन बायबरने जॅक्सनचे...
  January 30, 12:51 AM
 • वॉशिंग्टन - ट्विटरने मजकुराबाबत स्वत:वर सेन्सॉरशिप लागू करण्याचा निर्णय हा चीनला डोळ्यासमोर ठेवून घेतल्याचे स्पष्ट होत आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून चीनमध्ये या मायक्रोब्लॉगिंगवर बंदी आहे. स्वत:वर आचारसंहिता घालून ट्विटरने चीनमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे.ट्विटरवर 2009 पासून बंदी घालण्यात आली आहे. चीन ही मोठी बाजारपेठ आहे. काही वर्षांपासून येथील काम बंद असल्याने ट्विटरने सेन्सॉरशीप लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये ट्विटर युजर्सची संख्या जगाच्या तुलनेत...
  January 29, 02:08 AM
 • नवी दिल्ली- भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चालला असून, दोन्ही देशातील संबंध बिघडत चालल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात भारत-चीन यांच्यात चर्चेची १५ वी फेरी पार पडली. पण यात दोन्ही देशात एवढा वाद झाला की ही चर्चाच थांबविण्याची स्थितीत आली. दरम्यान, दोन्ही देशांनी ही बातचीत चांगली झाली असे वरवर सांगितले असले तरी माध्यमांनी दिलेल्या वृत्ताच्या सूत्रानुसार, चीनने सीमाप्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे.चीनकडून या चर्चेत सहभागी झालेले डाई बिंग यांनी भारताचे माजी राष्ट्रीय सुरक्षा...
  January 28, 12:23 PM
 • जगातील महासत्ता अशी बिरुदावली मिरवणारया अमेरिकेला चीनने धोबीपछा़ड दिली आहे. अमेरिका आजही बहुतेक क्षेत्रात नंबर एकवर आहे. पण चीनने अलीकडच्या काळात आपला ठसा उमठवायला सुरवात केली असून, चीनने अमेरिकेचा ताज हिसकावून घेण्याचा प्रत्न चालविला आहे. पहा चीन अमेरिकेपेक्षा कोणत्या-कोणत्या क्षेत्रात पुढे गेलेला आहे. स्टील- सन २०१० मध्ये चीनमध्ये ६२७ मिलिटन मेट्रीक टन स्टीलचे उत्पादन केले. अमेरिकेने ८० मिलिटन मेट्रीक टन स्टील बनवित तिसरा क्रमांक मिळविला. दुसरया क्रमांकावर जपान असून जपानने ११०...
  January 26, 03:47 PM
 • नवी दिल्ली- तिबेटी नागरिकांवर चीनचा अत्याचार सुरूच असून चिनी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तिबेटमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिमाचल प्रदेश येथील धर्मशाला येथून प्रसिद्ध होणा-या तिबेटी वृत्तपत्रानुसार, चीनच्या सिंचुआन प्रांतातील ड्रैंग-गो भागात आंदोलने करणा-या तिबेटींवर पोलिसांनी अंधाधुंद गोळीबार केला. त्यात सहा जण ठार झाले असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. या भागात मोठया प्रमाणात तिबेटी लोक राहतात. चिनी पोलिसांनी तिबेटी लोकांना...
  January 24, 04:40 PM
 • बीजिंग - चीनचे नवीन चांद्र वर्ष मुहूर्तानुसार सोमवारपासून सुरू होणार आहे, परंतु रविवारपासूनच या स्वागत उत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने आता आठवडाभर जल्लोषाचा महोल राहणार असल्याने सरकारी कामकाज व इतर व्यवहार शटडाऊन झाले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस वाहतूकही ठप्प राहते. चिनी नववर्ष चीनसह इंडोनेशिया, फिलिपाइन्स, हाँगकाँग, सिंगापूर, मकाऊ, थायलंड आदी ठिकाणी साजरी केली जाते. वसंतोत्सवापासून येथे ड्रॅगन इयरला सुरुवात होणार असल्याचे चीनच्या राशिचक्राचे म्हणणे आहे. दरवर्षी एक...
  January 22, 11:47 PM
 • चिनी परंपरेनुसार नवीन वर्षाची सुरुवात येत्या 23 जानेवारी रोजी होत आहे.नववर्षोत्सव हा चीनमध्ये आपल्या दिवाळीसारखा साजरा केला जातो.रंगीबेरंगी आकाशकंदिलांची रोषणाई,नवीन कपडे,लज्जतदार पदार्थ अणि विशेष म्हणजे आपल्या आप्तस्वकीयांसह हा सण साजरा केला जातो.सध्या बीजिंग,नानजिंग या शहरांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक दुकानांमध्ये डिस्काउंटच्या आॅफर्स देण्यात येत आहेत. रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी दुकाने सजली आहेत. नानजिंग येथे रस्त्यामध्ये ड्रॅगनच्या आकाराचा भलामोठा...
  January 19, 12:35 AM
 • बीजिंग- चीन यंदा अवकाशात अनेक रॉकेट आणि सॅटेलाइट सोडणार आहे. स्थानिक माध्यमांनी चीनच्या एयरोस्पेस सायन्स एंड टेक्नोलॉजी कॉर्पोरेशनच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.चीनच्या अवकाश कार्यक्रमाचे आयोजन करणारया प्रमुख संस्थेने आपल्या वार्षिक बैठकीत याबाबत घोषणा केली. संस्थेने म्हटले आहे की, चीन २०१२मध्ये २१ रॉकेट आणि ३० सॅटेलाइट सोडेल.
  January 18, 06:52 PM
 • नवी दिल्ली- भारताशी संबंधित गुप्तचर संघटनाकडून मिळालेल्या सूचना व माहिती गोळा करण्यासाठी चीन आणि पाकिस्तान यांच्यात समझोता (?) झाला आहे.भारतीय गुप्तचर संघटनाच्या हाती असे काही सबळ पुरावे सापडले आहेत ज्यातून दिसते की, चीनच्या गृहमंत्रालयाने ( एमएसएस) पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयकडून भारतासह तिबेटमधील माहिती व घटनाक्रमाचा आढावा घेतला आहे. याबाबत सांगितले जात आहे की, आयएसआयचे भारतीय उपखंडात चांगले बस्तान असल्याने चीनने त्यांची मदत घेतली आहे. सरकारी संबंधित सूत्रांनी दिलेल्या...
  January 18, 02:57 PM
 • बीजिंग- चीनमधील माध्यमांच्या माहितीनुसार, तेथे महिला बॉडीगार्डची मागणी वाढली आहे. एका सुरक्षा फर्मने महिला बॉडीगार्डच्या भरतीसाठी एक पात्रता परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. त्यात उत्तीर्ण झालेल्या व फीट महिला, मुलींना प्रशिक्षणासाठी इस्त्राइल येथे पाठविण्यात येणार आहे. ब्रिटनमधील वृत्तपत्र डेली मेल आणि सिंगापूरमधील एशियावन यांच्या माहितीनुसार, या महिलांना १० महिने प्रशिक्षण देण्यात येईल. त्यात दहशतवादविरोधी, मार्शल ऑर्टस, व्यापारातील आदिरातिथ्य, स्वागत याबाबत प्रशिक्षण...
  January 16, 01:05 PM
 • नवी दिल्ली- भारत आणि चीन यांच्यातील सीमा वाद सोडविण्यासाठी आज नवी दिल्लीत पुन्हा एकदा बैठक होत आहे. या बैठकीच्या आधी माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार चीन भारताबरोबर संबंध सुधारु पाहत आहे. तसेच एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे संकेत देत आहे. सीमा वाद मिटविण्यासाठी बैठकीची ही १५ वी फेरी आहे. या बैठकीत दोन्ही देशातील पंतप्रधान यांचे खास प्रतिनिधी भाग घेतील.ही बैठक आज आणि उद्या चालेल. भारतातील चीनचे राजदूत चांग यान यांनी म्हटले आहे की, हे वर्ष दोन्ही देशांसाठी खुषखबरीचे असेल. ते म्हणाले, हे...
  January 16, 10:57 AM
 • काठमांडू: चीनचे पंतप्रधान वेन जिआबाओ आज अचानक नेपाळ दौर्यावर रवाना झाले. वेन आणि नेपाळचे पंतप्रधान बाबूराम भट्टाराय यांच्यात गुंतवणुकीसह विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. या दौर्यासाठी काठमांडूत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. उभय देशांमध्ये एकूण आठ करार झाले. मात्र, या चर्चेवेळी मीडियाला आसपासही फिरकू देण्यात आले नाही.भट्टाराय यांच्या भेटीनंतर त्यांनी राष्ट्रपती रामबरन यादव, माओवादी नेते प्रचंड, नेपाळ काँग्रेसप्रमुख सुशील कोईराला यांचीही भेट घेतली या दौर्यात ते...
  January 15, 06:02 AM
 • बीजिंग: स्टीव्ह जॉब यांच्या कल्पनेतून साकारलेल्या आयफोन फोर एसच्या खरेदीसाठी चीनमध्ये आज अक्षरश: हाणामारी झाली. कडाक्याच्या थंडीत लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खरेदीसाठी एवढी चढाओढ सुरू झाली की, काही लोकांनी सुरक्षारक्षकांवरच हल्ला केला. हिरमोड झालेल्या ग्राहकांनी कंपनीच्या शोरूम्सवर अंडी फे कली. अखेर आयफोनची विक्रीच तात्पुरती बंद करण्याचा निर्णय अॅपल कंपनीस घ्यावा लागला.बीजिंगमध्ये गुरुवारी रात्रीपासूनच लोक रांगा लावून उभे होते. त्यांना शोरूममध्ये प्रवेश करण्यास...
  January 14, 07:04 AM
 • नवी दिल्ली - जगातील आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत असलेल्या भारत आणि चीन या दोन्ही देशांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एकत्र येऊन काम करण्याची तयारी दाखवली आहे. सीमावादावरून सुरु असलेला संघर्ष बाजूला ठेवून दोन्ही देशांनी हातमिळवणी केल्याने एका नव्या अध्यायाची सुरुवात होत असल्याचे मानले जात आहे. या दशकात तयार करण्यात येत असलेल्या हवाई दुर्बिणीच्या निर्मितीत हे दोन्ही देश मिळून योगदान देतील. ही जगातील सर्वात मोठी दुर्बीण असेल. ३० मीटर लांबी असणा-या या आधुनिक दुर्बिणीसाठी लागणारा...
  January 13, 07:46 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात