Home >> International >> China

China News

 • बीजिंग । वेगवान हल्ला चढवण्याची क्षमता असलेली युद्धनौका चीन पाकिस्तानसाठी तयार करीत आहे. पाकचे नौदलप्रमुख अॅडमिरल नोमान बशीर यांनी तिची पायाभरणी केली. आधुनिक युद्धप्रणालीने सज्ज ही नौका येत्या एप्रिलपर्यंत पाकच्या ताब्यात येईल.
  September 21, 05:40 AM
 • नवी दिल्ली/बीजिंग- चीनच्या दक्षिणेकडील समुद्रात भारतीय तेल कंपन्यांकडून होणा-या तेल शोध मोहिमेबद्दल चीनच्या इशा-याला धुडकावून लावत, माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सणसणीत प्रत्युत्तर भारताने दिले आहे.काही दिवसांपूर्वी चीनने भारताला दक्षिणेकडील समुद्रापासून लांब राहण्याचा इशारा देत असे करणे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. भारतीय तेल कंपनी ओएनजीसी विदेशने दक्षिण चीन सागरातील व्हिएतनामच्या तेल आणि नैसर्गिक वायूने समृद्ध असलेल्या ब्लॉकमध्ये तेल...
  September 21, 02:28 AM
 • बीजिंग। दक्षिण-पश्चिम चीनमधील सिचून प्रांताला पावसाने झोडपले असून आतापर्यंत 13 बळी गेले आहेत. देशाच्या अनेक भागांना काही दिवसांपासून पावसाचा तडाखा बसला असून सोमवारी बेझोंग शहरातील विविध घटनांत 13 जणांचा मृत्यू झाला. नानजिआंग भागात सहा लोकांचा मृत्यू झाला. टॉंगजिआंगमध्ये पाच मृत्यू झाले. या घटना दरड कोसळून झाल्या असल्याचे सुत्रांनी सांगितले. या भागातील नद्यांना पुर आल्यामुळे दहा लोक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.
  September 20, 12:46 AM
 • बीजिंग - विज्ञान युगात शुभ-अशुभाला थारा नाही; परंतु चीनमधील एका डॉक्टर महाशयांनी एका महिलेची प्रसूती चक्क अशुभ दिवसामुळे लांबवली. परिणामी मूल बेशुद्ध अवस्थेत जन्मले. या बेजबाबदार डॉक्टरांकडून चिनी कुटुंबाने मोठ्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. डॉक्टरांच्या वागण्यामुळेच आमचे मूल गेल्याचा आरोप ली शिऑजिन (32) या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. हा गुंता सोडविण्यासाठी आता आरोग्य अधिकारी प्रयत्न करीत आहेत. झेंग योना असे या डॉक्टरांचे नाव आहे. 12 ऑगस्ट रोजी ही महिला प्रसूतीसाठी गॉंगडॉंग...
  September 17, 11:57 PM
 • बिजिंग- मुसळधार पावसाने गेल्या 24 तासांमध्ये 9 जणांचा बळी घेतला आहे. उत्तरेकडील शांक्झी प्रांतामध्ये गेल्या दोन आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे 50 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. दोन आठव्ड्यांपासून संततधार पाऊस सुरु आहे. सुमारे 60 जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसला आहे. पाऊस थांबलाच नसल्यामुळे या परिसरात आता दरड कोसळण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 5 हजार घरे कोसळल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे....
  September 17, 03:14 PM
 • बीजिंग - येथील उत्तर भागातील कोळसा खाणीत काम करणारे दहा मजूर पुरामुळे अडकले आहेत. शांघी प्रांतात ही घटना घडल्याचे स्थानिक अधिका-यांनी सांगितले. शुक्रवारी हे मजूर खाणीत असताना अचानक पुराचे पाणी आत शिरले. त्यामुळे मध्ये काम करणारे मजूर अडकले असून त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. आज दुपारी हा पूर आल्याने शानयिन भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, खाणीत अडकलेल्यांना काढण्यासाठी मदत कार्य सुरू झाले आहे.
  September 16, 11:14 PM
 • बीजिंग - चीनच्या उत्तर-पश्चिम भागातील शिनियाँग युगूर भागाला काल रात्री भूकंपाचा मोठा धक्का बसला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.5 नोंदवण्यात आली. याचे केंद्र उत्तर अक्षांशावर भूगर्भात सहा किलोमीटर खोल असल्याचे सांगण्यात आले. ते शिनाऊपासून 82 अंशात उत्तर रेखांशावर होते. दरम्यान, या घटनेनंतर कोणत्याही हानीचे वृत्त नाही. तत्पूर्वी भौगोलिक पाहणीत याची तीव्रता 5.1 एवढी नोंद करण्यात आली होती
  September 16, 11:02 PM
 • नवी दिल्ली- व्हिएतनाममधून भारतीय कंपन्यांनी तेल काढू नये म्हणून चीनने नोंदविलेल्या राजनैतिक निषेध व्यक्त केल्यानंतर भारतानेही आज कडक पावले उचलले. जर आम्हाला तेथे विरोध करणार असाल तर, पाकव्याप्त काश्मीरप्रश्नी चीनने नाक खुपसू नये व त्यापासून त्यांनी दूर रहावे, असा सज्जड दमच भरला आहे.चीनने भारताला बुधवारी झटका दिला होता. दक्षिण चीन समुद्रातून भारतास तेल काढण्यास चीनने मनाई केली आहे. इंडियन ऑईल विदेश लिमिटेड दक्षिण चीन समुद्रातून व्हिएतनाम ब्लॉक्समधून तेल आणि गॅस काढत आहे. यालाच चीनने...
  September 16, 12:11 PM
 • जम्मू- चीनने पुन्हा एकदा भारतीय सीमेमध्ये घुसखोरी केली आहे. गेल्या महिन्यात चीनच्या दोन हेलिकॉप्टरने जम्मू काश्मीरच्या लडाख भागात नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय सैन्याचे बंकर नष्ट केले होते. सुदैवाने त्या बंकरमध्ये एकही भारतीय सैनिक नव्हता त्यामुळे कोणतेही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समजते. २५ ऑगस्ट रोजी चुमूर भागात घुसखोरी केलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये सात ते आठ चीनी सैनिक होते. बंकर नष्ट केल्यानंतर हे हेलिकॉप्टर परत गेले. सैन्यदलाने अद्यापपर्यंत अशी घटना घडली नसल्याचे...
  September 14, 10:15 AM
 • पॅरिस - दक्षिण फ्रान्समधील मारकोल अणुभट्टीत सोमवारी अचानक झालेल्या स्फोट झाला. या स्फोटात नेमकी किती हानी झाली याची तत्काळ माहिती मिळू शकली नाही; परंतु एक व्यक्ती ठार, तर अनेक जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनेनंतर देशात खळबळ उडाली आहे.मारकोल अणुभट्टीच्या संरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या संस्थेचे इव्हांजेलिया पेटीट यांनी या स्फोटाच्या घटनेला दुजोरा दिला. परंतु अधिक तपशील देण्यास इन्कार केला. या अणुभट्टीमध्ये एकूण चार संयंत्रे आहेत. या अणुभट्टीचे स्वरूप अणुकचरा व्यवस्थापन असे आहे....
  September 13, 12:05 AM
 • बीजिंग- एखादे नाते संपविणे, ही गोष्ट तशी वेदनादायी असते. परंतु त्यावरही आता फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणे संपुष्टात आणण्यासाठी चक्क आऊटसोर्सिंग म्हणून मध्यस्थाचा चीनमध्ये सर्रास वापर करण्याची पद्धत रुळू लागली आहे. प्रेम सुरुवातीला हळुवार वगैरे असते, नंतर त्याकडे झेंगट म्हणून पाहिले जाते. अशावेळी नाते संपविण्याकडे कल असतो. दोघांपैकी एकाला हे नको असेल तर दुसयाला नात्याचे संपणे वेदना देणारे ठरू शकते. म्हणून मध्यस्थाचा जन्म झाला असावा. हे मध्यस्थ दोन जोडप्यांना आपल्या...
  September 9, 07:58 AM
 • बिजिंग - अनवधानाने शाळेच्या बसमध्ये राहिलेल्या दोन शालेय मुलांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना चीनमध्ये घडली. अवघ्या तीन वर्षांची ही मुले कित्येक तास त्या बसमध्येच अडकली होती. हैनन प्रांतातील सान्या शहरातील बालविहारमध्ये ही घटना 29 आॅगस्ट रोजी घडली. सर्व बाजूंनी बंद बसमध्ये सुमारे सात तास हा मुलगा होता. दरवाजा बंद करण्यापूर्वी दोनवेळा खात्री करून घेण्यात शिक्षकांकडून दुर्लक्ष झाल्याने या चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. या घटनेच्या तीन दिवसांनंतर पाच वर्षीय मुलगी एका...
  September 7, 05:02 AM
 • बीजिंग- चीनच्या एका निवृत्त जनरल याने खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, चीन अमेरिकेवर गुपचुप क्षेपणास्त्र हल्ला करण्याच्या तयारीत आहे. जनरल जू गुयांग्यू असे त्यांचे नाव असून विकिलिक्सने चीन-अमेरिकेबाबतचे केबल्स उघड केल्यानंतर जनरल जू यांनी हा खुलासा केला आहे विशेष. या खुलाशापूर्वी विकिलिक्सने फोडलेल्या केबल्समध्ये म्हटले होते की, अमेरिकेने गेल्या वर्षी आपल्या मित्रराष्ट्रांना चीनकडून क्षेपणास्त्र इंटरसेप्टरच्या परीक्षणांबाबत माहिती घ्या, अन्यथा परिणामांना...
  September 5, 04:24 PM
 • बीजिंग- चीनमधील माध्यमे आता भारताबाबतचे वार्तांकन करण्याबाबत फारसा संकोचपणा ठेवणार नाहीत, असेच दिसते. कारण चीनमधील अनेक पत्रकारांनी नुकताच भारताचा दौरा केला. त्यात भारत त्यांना अतिशय आवडला असून आता ते भारताचे गोडवे गात आहेत. एक युवा पत्रकार म्हणाला भारतीय चीन लोकांकडे अपेक्षेने पाहतात व त्याच्याबाबत चांगले मत व्यक्त करतात.भारतीय लोक चीनच्या लोकांपेक्षा कमी तक्रार करतात. त्याचबरोबर चीनची बरोबरी करण्यासाठी भारताला काही ठरवून काम करावे लागेल. जानेवारीत सुमारे ४० पत्रकारांनी भारतीय...
  September 3, 04:20 PM
 • पेचिंग: तुमची बायको पळून गेलीय? टेन्शन नका घेऊ... तुम्हाला अगदी तशीच बायको देता येत नसली तरी तिच्या बदल्यात तुम्हाला एक अविवाहित तरुणी नक्कीच मिळेल. पण थांबा.... बातमी वाचून लगेच हर्षभरित होऊ नका... कारण या अफलातून आॅफरचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला भारत सोडून चीनमध्ये राहायला जावे लागेल आणि व्हिएतनामच्या मुलीशी लग्न करावे लागेल. चीनमध्ये मॅरेज ब्युरो कार्यालयांनी तरुणांना आकर्षित करण्यासाठी अशाच अफलातून ऑफर देणा-या जाहिराती प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. शांघाय डेलीने या...
  September 3, 04:58 AM
 • बीजिंग- पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे चीनप्रेम उघड होत चालले आहे. झरदारी सध्या चीनच्या दौऱयावर असून, त्यांनी पाकिस्तान व चीन यांच्यादरम्यान अधिक मैत्री दृढ व्हावी असे म्हटले आहे. तसेच, या दोन्ही देशाच्या सीमा एकमेंकासाठी मुक्त असाव्यात, असेही म्हटले आहे.हे वक्तव्य त्यांनी चीनच्या राष्ट्रीय दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.ते म्हणाले, मी एक स्वप्न पाहिले आहे की, चायनीज लोक पाकिस्तानमध्ये व पाकिस्तान लोक चीनमध्ये कोणत्याही पारपत्राशिवाय (पासपोर्ट)...
  September 2, 04:59 PM
 • बीजिंग - चीनमधील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार एका भारतीयाला प्रथमच मिळाला आहे. बी. आर. दीपक या भारतीय प्राध्यापकाचे नाव असून ते दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधील चीन व दक्षिण आशिया अभ्यास केंद्राचे संलग्न प्राध्यापक आहेत. प्रा. दीपक यांना सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे सांगण्यात आलेप्रा. दीपक यांनी ८८ चिनी भाषेतील कवितांचा हिंदीमध्ये अनुवाद केला आहे. तसेच चिनी भाषेचा अभ्यास, भाषांतर, चिनी पुस्तकांचे भारतीय भाषांत प्रकाशन आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण...
  September 2, 04:03 PM
 • बीजिंग: एक उंच लाट आली आणि नदीकिनारा तुटला. आसपास उभे असलेले लोक पाण्याच्या लाटेत वाहत गेले. हे दृश्य सुनामीचे नव्हे तर चीनच्या झेजियांग प्रांतातील क्वियानतांग नदीत उठलेल्या लाटेमुळे निर्माण झाले. शांघायपासून दोन तासांच्या अंतरावर या ठिकाणी दरवर्षी याचा आनंद लुटण्याची येथील लोकांची परंपरा आहे. दरवर्षी १० ते १४ सप्टेंबरदरम्यान नदीमध्ये मोठ्या लाटा निर्माण होतात. ते पाहण्यासाठी आलेले लोक लाटेच्या फटका-यासरशी किना-यावर फेकले जातात. यावर्षी हे दृष्य लवकर पाहावयास मिळाले. बुधवारी...
  September 2, 02:54 AM
 • व्हिएतनामच्या सागरी क्षेत्राजवळ आयएनएस ऐरावत या युद्धनौकेची वाट चिनी नौदलाने रोखल्याच्या वृत्ताचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट शब्दांत इन्कार करण्यात आला आहे. ऐरावत विनाअडथळा मार्गस्थ झाली. तिच्या मार्गावर युद्धानौका तसेच कोणतेही विमानदेखील नव्हते, असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.भारतीय ऐरावत ही युद्धनौका चीनच्या सागरी क्षेत्रात आल्याने शेजारी देशाचे नौदल व ऐरावत यांच्यात धुमश्चक्री उडाली, असे वृत्त ब्रिटनमधील वर्तमानपत्राने दिली होती. ही घटना २३...
  September 2, 02:05 AM
 • नवी दिल्ली- चीनच्या भारत विरोधी कारवाया थांबण्याची नावे घेत नाहीत, असेच सध्या दिसून येत आहे. एका ताज्या खुलाशानुसार, मागील दोन महिन्यापूर्वी म्हणजेच जुलै महिन्यात भारतीय नौदलच्या आयएनआस या जहाजाला चीनने रोखले होते. आलेल्या बातम्यानुसार, चीनच्या नौदलाच्या एका मोठ्या जहाजाने भारताच्या आयएनएस या जहाजाला दक्षिण चीनच्या समुद्रात जबरदस्तीने थांबवून जहाजावरील सर्वांची माहिती घेतली होती. तसेच हे जहाज दक्षिण चीनच्या समुद्रात आणण्याचे कारण काय याबाबत चौकसी केली होती.दुसरीकडे मात्र, चीनचे...
  September 1, 02:13 PM
 
जाहिरात

RECOMMENDED