जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

 • बिजिंगः अतिवेगवान रेल्वेगाड्यांच्या प्रकल्पात चीनने एक मैलाचा दगड रोवला आहे. चीनने तब्बल ताशी 500 किलोमीटर वेगाने धावणा-या रेल्वेची यशस्वी चाचणी घेतली आहे. चीनमध्ये ताशी 300 किलोमीटर वेगाने धावणा-या बुलेट ट्रेन रेल्वे चालविण्यात येत आहे. या गाड्यांचा वेग आणखी वाढविण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. काही महिन्यांपुर्वी चीनमध्ये बुलेट ट्रेनचा अपघात झाला होता. वीज कोसळून सिग्नल यंत्रणा कोलमडल्यामुळे हा अपघात झाला होता. त्यानंतर बुलेट ट्रेनचा वेग कमी करण्यात आला होता. तसेच वीज पुरवठा खंडित...
  December 27, 03:12 PM
 • बीजिंग - चीनने पहिली सुपरस्पीड टेस्ट रेल्वे सुरू केली आहे. ताशी 500 कि.मी. वेगाने ती धावते. सध्या ताशी 300 कि.मी.पर्यंत जाऊ शकते. हायस्पीड ट्रेनच्या क्षेत्रात हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. सहा डब्यांच्या या रेल्वेचा समोरचा भाग सीएचआर सीरीजमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानानेयुक्त आहे. रेल्वेला किमान 22,800 किलोवॅट शक्तीची गरज भासेल. सध्याच्या सर्वात वेगवान गाडीला 9,600 किलोवॅटची गरज भासते. ताशी 300 कि.मी. वेगाने ही गाडी शांघाय ते बीजिंगदरम्यान धावते. करड्या रंगाच्या या गाडीत डाटा प्रोसेसिंग सुविधा उपलब्ध...
  December 27, 04:00 AM
 • बिजींग- चीनमधील ज्येष्ठ मानवी हक्क कार्यकर्ते व लेखक शेन वि यांना नऊ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सरकारविरोधी विध्वंसक मजकूर प्रकाशित केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.शेन हे लोकशाहीवादी नेते असून त्यांना फेब्रुवारीमध्ये सरकारविरोधी मजकुराबद्दल अटक करण्यात आली होती. त्यांच्यासमवेत डझनभर कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सुइनींग शहर न्यायालयाने 42 वर्षीय शेन यांना दोषी ठरवले. सरकारच्या विरोधात वापरलेली भाषा ही विध्वंसक स्वरूपाची आहे,...
  December 24, 12:01 AM
 • बिजींग- दक्षिण चीनमधील गाँगडाँगमधील हेमेन शहरातील प्रस्तावित कोळसा ऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांनी कडवा विरोध दर्शवला. मंगळवारी सरकारी कार्यालयांवर चालून येणा-या आंदोलकांना चिनी पोलिसांनी झोडपले. गोळीबारही केला. त्यात एका पंधरावर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. परंतु त्याला दुजोरा मिळू शकला नाही. या वेळी पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. त्याचबरोबर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या घटनेत 100 जण जखमी झाले.हेमेन शहरात होऊ घातलेल्या कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पाला स्थानिक...
  December 20, 11:59 PM
 • चीनच्या अर्थव्यवस्थेलाही घसरण लागली असून, ती कोसळण्याच्या अवस्थेत आहे, असे मत प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ पॉल क्रुगमॅन यांनी व्यक्त केले आहे. अमेरिकी वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहलेल्या एका विशेष लेखात पॉल यांनी चीनच्या चालू अर्थव्यवस्थेबाबत भाष्य केले आहे.पॉल यांच्या म्हणण्यानुसार, रियल इस्टेटमधील वाढत्या किमतीतील नफ्यामुळे उत्पादन निर्माण क्षेत्रात आलेल्या बूममुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे विकासदरातही वाढ झाली आहे. मात्र हे पारंपरिक बॅंकिग...
  December 19, 05:16 PM
 • बिजींग- भारताला महासत्ता होण्याची आकांक्षा आहे. 5 हजार किलोमीटर पर्यंतचा वेध घेऊ शकणारे अत्याधुनिक अग्नी-5 क्षेपणास्त्राची निर्मीती हा त्याचाच एक भाग आहे. या किलर क्षेपणास्त्राच्या टप्यात चीनची अनेक शहरे असून सरहद्दीवर एक लाख सैनिक तैनात करण्याचा भारताचा इरादा हा सुध्दा एक संवेदनशील डाव असल्याचा कांगावा चीनने केला आहे.सत्ताधारी चीनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र पीपल डेली मध्ये भारतीय लष्कर व दक्षिण आशियातील सत्ता समतोलाबाबत एक लेख आला आहे. 5 हजार किलोमीटर पर्यंतचा अचूक वेध घेणा-या...
  December 18, 11:58 PM
 • बीजिंग- हिंदी महासागरातील सेशेल्स बेटावर आपले पहिले लष्करी तळ उभारण्याचे सोमवारी चीनने जाहीर केले. याद्वारे नौदलास आवश्यक सुविधा पुरवण्यास हे तळ उपयोगी ठरेल, असे चीनचे म्हणणे असले तरी यामुळे भारताची चिंता मात्र वाढणार आहे.हा चीनचा परदेशातील पहिलाच लष्करी अड्डा असेल. या तळाचा फायदा सेशेल्ससह इतर देशांना मदत करण्यासाठी होऊ शकतो, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या तळाच्या माध्यमातून चीनने हिंदी महासागरात आपले पहिले पाऊल ठेवले आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सिबेड...
  December 13, 04:02 AM
 • बिजिंगः हिंदी महासागरामध्ये वर्चस्व वाढविण्याच्या दिशेने पावले उचलल्यानंतर आता चीनने लष्करी तळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या दृष्टीने ही धोकादायक बाब आहे. चीनने सेशल्स बेटावर हा तळ उभारण्याची घोषणा केली आहे. नौदलाच्या गरजा भागविण्यासाठी चीनने हा तळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सेशल्स तसेच इतरही काही देशांमधुन नौदलाला रसद पुरविण्यात येईल. भारत आणि चीनमध्ये दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये उत्खननावरुन तणाव निर्माण झाला होता. याठिकाणी कोणाचेही अस्तित्व खपविले जाणार नाही, असे...
  December 12, 02:59 PM
 • बीजिंग- चीनमध्ये इंटरनेट नियंत्रण प्राधिकरण यंत्रणेने देशातील सोशल नेटवर्किंग साइटवरील निर्बंधात वाढ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अधिक सक्षम व प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामुळे याचा फटका सुमारे 20 कोटी बलाढ्य मायक्रोब्लॉगर्सला बसणार आहे. ऑनलाइन संस्कृतीची बांधणी आणि व्यवस्थापन याविषयी सरकारने कठोरपणे कारवाई केली पाहिजे. ऑनलाइन पर्यावरण हे विधायक व सामाजिकदृष्ट्या आरोग्यदायी राहिले पाहिजे. त्यासाठी हे करणे गरजेचे आहे, असे चीनच्या इंटरनेट...
  December 12, 12:45 AM
 • बीजिंग - आग्नेय चीनमधील चोंगकिंग शहरामध्ये वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालवणार्या महिलेला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आला आहे. 2010 मध्ये शेकडो महिलांची फसवणूक करून वेश्याव्यवसायात ओढल्याच्या आरोपाखाली वांग जिकी ही महिला दोषी आढळली आहे. जिकी व तिची बहीण संबंधित महिलांचे ओळखपत्र ताब्यात घेऊन त्यांची बदनामी करत होत्या. जिकीला गुन्हेगारी संघटन चालवल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
  December 11, 12:44 PM
 • बीजिंग - चीन एका बाजूने समुद्रात आपली ताकद वाढवत आहे आणि दुसरीकडे मात्र स्वतःच्या देशात काय चालले आहे, याकडे दुर्लक्ष करत आहे. चीनमध्ये काही दिवसापूर्वी मुलांच्या तस्करीचे एक मोठे सत्य जगासमोर आले आहे. चीनी पोलिसांनी मुलांची तस्करी करणाऱ्या दोन टोळ्यांना अटक करून १७८ मुलांची सुटका केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ६०८ संशयिताना अटक केली आहे. वृत्तसंस्थेनुसार चीनमधील लोक सुरक्षा मंत्रालयाने सांगितले की ३० नोव्हेंबरपासून पोलिसांनी मुलांची तस्करी करणाऱ्या सर्व टोळ्यांना पकडण्यासाठी...
  December 11, 12:27 PM
 • बीजिंग । मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक बिल गेट्स हे एका आण्विक प्रकल्पासाठी चीनला मदत करणार आहेत. चीनच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने ही माहिती दिली. तसेच यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे बिल गेट्स यांनी स्पष्ट केले आहे. हा आण्विक प्रकल्प बराच स्वस्त आणि अधिक सुरक्षित असेल. त्यातून निघणारे प्रदूषण इतर प्रकल्पांच्या तुलनेत खूपच कमी असेल, असेही गेट्स यांनी स्पष्ट केले. गेट्स यांनी टेरा पॉवरचे समर्थन केले आहे. युरेनियमवरील या प्रकल्पाची वॉशिंग्टन येथे सध्या...
  December 11, 04:39 AM
 • बीजिंग- भारतातील कोलकाता शहरात शुक्रवारी एका खासगी रुग्णालयाला आग लागली. त्यात किमान ९० जण ठार झाले आहेत. तर, दुसरीकडे त्याचदिवशी चीनमध्ये २२ मजली रुग्णालयाला मोठा आग लागली. मात्र, या मोठ्या आगीत काहीही जीवितहानी झाली नाही. ही घटना चीनमधील हुनान प्रांतातील चांगशा शहरात घडली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही पण भारतातील पाच-सहा मजली रुग्णालयाच्या आगीत ९० जण जळून व गुदमरुन ठार होतात. तर, चीनमधल्या २२ मजली रुग्णालयाला लाग लागून काहीही जीवितहानी झाली नाही. यात फरक आहे सोयीसुविधांचा व...
  December 10, 02:45 PM
 • बीजिंग- इंटरनेटच्या माध्यमातून अश्लीलतेचा प्रसार करणा-या वेबसाइट्सना चीन सरकारने झटका दिला आहे. त्यानुसार 206 वेबसाइट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनमधील सर्वात मोठ्या चार संकेतस्थळांना बंद करण्याची कारवाई झाल्याने इंटरनेट विश्वात खळबळ उडाली आहे. सिना डॉट कॉम सीएन, सोहू डॉट कॉम, 163 डॉट कॉम, क्यूक्यू डॉट कॉम या संकेतस्थळांना बंद करण्यात आले आहे. सिनामधील 130 अकाऊंट बंद करण्यात आले आहेत. इंटरनेट इन्फर्मेशन ऑफिस (एसआयआयओ) या चीनच्या यंत्रणेनेही कारवाई केली असून या वेबसाइटची नोंदणी...
  December 10, 03:48 AM
 • बीजिंग- चीनचे राष्टाध्यक्ष यांनी आपल्या नौदलाला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. याचा मोठा परिणाम शेजारील देशांवर पडू शकतो. दक्षिण चीन समुद्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वादावरुन चीनचा भासतासह शेजारील राष्ट्राशी वाद सुरु आहे. तसेच अमेरिकेने या प्रकरणात लक्ष घातल्याने ड्रॅगन चांगलाच फडकला असून, त्यांनी युद्धअभ्यास सुरु केला आहे. चीनच्या नौदलाची ताकद पाहायची आहे मग हा व्हिडिओ जरुर पाहा...
  December 7, 05:34 PM
 • बीजिंग- दक्षिण चीन समुद्रातील वर्चस्वावरुन चीनचे सध्या आशियाई देशाबरोबर वाद सुरु असून, चीनचे राष्ट्रपती हू जिंतोओ यांनी आपल्या नौदलाला युध्दाची तयारी करण्याचा आदेश दिला आहे. जिंताओ यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालय पेंटागनने म्हटले आहे की, चीनला आपली सुरक्षा करण्याचा हक्क आहे.बीजिंगमध्ये बुधवारी अमेरिका व चीन यांच्यातील वरिष्ठ सैनिक अधिकाऱयांची वार्षिक बैठक होत आहे. मात्र या बैठकीचा उद्देश आधी निश्चित करावा लागतो. तसेच दोन्ही देशांदरम्यान कोणतेही गैरसमज नाहीत....
  December 7, 12:22 PM
 • बीजिंग - चीनमध्ये बेरोजगारीवरुन आता विरोध-प्रदर्शन सुरु झाल्यामुळे सरकारला मोटे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनच्या सुरक्षा प्रमुखांनी याबाबत इशारा देताना म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेची स्थिती नाजूक झाल्याने लोकांचा राग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले तर आगीत तेल टाकल्यासारखेच होईल. हे सांगतानाच त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, सामाजिक मुद्यांवर होत असलेला हा विरोध लवकरात लवकर पावले उचला नाहीतर स्थिती बिघडू शकते.पॉलिट ब्युरोचे सदस्य झोउ योंग कांग यांचा इशारा...
  December 5, 03:29 PM
 • बीजिंग - अजस्र भिंतीआड सुखनैव वाटचाल करणा-या चीनकडे आता मंदीबाईचा फेरा वळला आहे. गेल्या तीन वर्षांत प्रथमच नोव्हेंबरमध्ये चीनच्या उत्पादन क्षेत्रात घसरण दिसून आली आहे. आगामी काळातही या प्रगतीच्या आलेखाला टाच लागण्याची शक्यता आहे. चीनचा खरेदी व्यवस्थापन निर्देशांक (पर्चेस मॅनेजमेंट इंडेक्स-पीएमआय) 50.4 टक्क्यांवरून 49 टक्क्यांपर्यंत आला आहे. आॅक्टोबरमधील पीएमआय 49 टक्क्यांवर आल्याने चीनच्या आर्थिक क्षितिजावर मंदीचे मळभ दाटल्याचे मानण्यात येत आहे. पीएमआय 50 टक्क्यांच्या खाली येणे, हे...
  December 3, 03:21 AM
 • बीजिंग- चीनमधील एका प्रमुख सरकारी वृत्तपत्राने भारत-चीन यांच्या संबंधाबाबत एक लेख लिहिला असून चीनने भारताला गंभीरतेने घ्यायला हवे, असे मत व्यक्त केले आहे. तसेच चीन-अमेरिकेच्या वादात भारत स्वत:चा फायदा पाहत असून, या गोष्टीचा फायदा जास्तीत जास्त घेण्याचा भारत प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.कम्यूनिस्ट पार्टीचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने आपल्या लेखात म्हटले आहे की, भारत आणि चीन यांच्यादरम्यान सीमेच्या वादाबाबत होणाऱया चर्चेत चीनने अधिक रस दाखवला पाहिजे व ती झाली पाहिजे. ही चर्चा झाली तरी...
  November 30, 11:04 AM
 • बीजिंग/नवी दिल्ली - नवी दिल्ली येथे चार दिवसाचे आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलन रविवारी सुरु झाले आहे. चीनने आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलनाला याआधीच नापसंती दर्शवली आहे. सोमवारी चीनने सांगितले की 'चीन विरोधी' दलाई लामा यांना एक स्वतंत्र मंच उपलब्ध करून देणाऱ्या सर्व देशांचा आम्ही विरोध करतो.दिल्लीतील तिबेटी दुतावासाने हे जाहीर केले आहे की, भारताकडे असे अधिकार आहेत की त्यांनी दिल्ली येथे चालू असलेल्या बौद्ध संमेलनात दलाई लामा यांना आपले विचार मांडण्याची परवानगी द्यावी. चीनने या संमेलनाला...
  November 29, 12:04 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात