जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

 • बीजिंग - ऐतिहासिक परंपरा असलेल्या भारतीय चहाने चीनच्या बाजारपेठेत प्रवेश केला. भारतीय राजदूताच्या वतीने आयोजित एका समारंभात भारतीय चहाच्या अनेक वाणांचा स्वाद चीनमधील चहाशौकिनांनी घेतला. दरम्यान, या कार्यक्रमातून भारतीय चहाचा चिनी बाजारपेठेत चंचूप्रवेश झाल्याचे मानले जात आहे. येथे असलेल्या भारतीय राजदूत कार्यालयाच्या सांस्कृतिक केंद्रामध्ये शुक्रवारी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अनोख्या कार्यक्रमात चीनच्या चहा उद्योगातील बडी मंडळी भारतीय चहाचा स्वाद...
  October 29, 10:55 PM
 • बीजिंग - महासत्ता म्हणून उदयास येऊ पाहत असलेल्या चीनसमोर सध्या वेगळीच समस्या उभी ठाकली आहे. या देशाला अकाली वृद्धत्वाचा प्रश्न सतावतो आहे. एक कुटुंब, एक मूल हे धोरण चीनने स्वीकारले. त्याचे दुष्परिणाम आता समोर येत असून देशात युवकांच्या तुलनेत वृद्धांची संख्या वेगाने वाढत आहे.वेगाने विकसित होणारा चीन 2050 मध्ये हा जगातील सर्वाधिक वृद्ध असणारा देश म्हणून ओळखला जाईल, असा इशारा अर्थतज्ज्ञ व सामाजिक विश्लेषकांनी दिला आहे.पीपल्स डेली ऑनलाइनने कमिशन फॉर पॉप्युलेशन अँड फॅमिली अहवालाच्या आधारे...
  October 27, 03:51 AM
 • बीजिंग - चीनचे शेनझोऊ-8 हे मानवरहित अंतराळ यान पुढील महिन्यात अंतराळात झेपावणार आहे. वायव्य प्रांतातील जिक्वान उपग्रह उड्डाण केंद्रावरून हे अंतराळात झेपावणार आहे. याच केंद्रावरून गेल्या महिन्यात हेवनली पॅलेस वन हे यान अंतराळात पाठवण्यात आले होते. शेनझोऊ -8 हे अंतराळ यान आणि त्याला घेऊन जाणारा मार्च-2 एफ हे प्रक्षेपक उड्डाणस्थळावर तैनात करण्यात आले असून उड्डाणासाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे, असे वृत्त सरकारी वृत्तसंस्था झिनुहाने दिले आहे.
  October 27, 03:33 AM
 • बीजिंग- चीन आणि पाकिस्तानच्या अधिका-यांनी पाक व्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये चीनी सैनिकांच्या उपस्थितीचा इन्कार केला आहे. भारतीय लष्कर प्रमुखांनी गैरसमजुतीमुळे चुकीचा दावा केला असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयातील अधिका-यांनी म्हटले आहे.नुकतेच भूदल प्रमुख जनरल व्ही.के सिंह यांनी पीओकेमध्ये चीनचे सैनिक उपस्थित असल्याचे म्हटले होते. लष्कर प्रमुखांच्या विधानास संरक्षण मंत्री ए.के अँटोनी यांनीही दुजोरा दिला होता. चीन सैन्याची उपस्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले होते. काही...
  October 16, 01:51 PM
 • बीजिंग- भारताच्या प्रखर विरोधासमोर चीनला शेवटी झुकावे लागले आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह बदलणार नसल्याची माहिती चीनचे जल संसाधन मंत्री जियाओ वांग यांनी दिली. एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा अशी चीनच्या लोकांची इच्छा आहे. पंरतु, तांत्रिक कारणामुळे तसेच पर्यावरणावर पडणारा प्रभाव आणि शेजारील देशांबरोबरील संबंधामुळे ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्याची कुठलीही योजना नाही.ब्रह्मपुत्रा नदीवरून भारताच्या संबंधावर परिणाम होऊ...
  October 14, 11:47 AM
 • हुआक्सी हे गाव चीनच्या आर्थिक सुधारणांचे उत्तम उदाहरण आहे. समाजवाद व भांडवलवादाच्या एकत्रित धोरणातून हा प्रकल्प आकाराला आला. विशेष म्हणजे हॉटेलच्या उभारणीला गावकयांनीच अर्थसाहाय्य केले. हॉटेलसाठी 200 घरांतून 10 दशलक्ष युआन रक्कम जमा झाली. हे गाव छोटे असले तरी येथे उद्योगांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हे हॉटेलचांगला व्यवसाय करेल, असा विश्वास व्यवस्थापनाला वाटतोय. उपलब्ध सुविधा- रुपटॉप स्वीमिंग पूल, रिवॉल्व्हिंग रेस्टॉरंट, हॉटेलच्या 60 व्या मजल्यावर सोन्याचा एक टन वजनाचा एक गोल बसवण्यात...
  October 13, 03:15 AM
 • भारताचा शेजारी देश चीन आपले पहिले अंतराळ यान तयार करत असून गेल्या आठवड्यात रॉकेट प्रक्षेपित करून चीनने त्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. गोबीच्या (चीन) वाळवंटात या आठवड्याच्या अखेरपर्यंत रॉकेटच्या साह्याने अंतराळ केंद्रावरून टिंगगोंग -1 (टिंगगोंग म्हणजे अवकाश महाल) गुरुवारी प्रक्षेपित करण्यात आले. त्याबरोबरच चीनच्या अंतराळ केंद्र निर्मितीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. या अंतराळ केंद्राला दोन लॅबोरेटरीज मॉड्यूल व एक हवाई यान संलग्न असणार आहे.या योजनेमुळे चीनसाठी आंतरिक्ष संशोधन...
  October 4, 03:05 AM
 • नवी दिल्ली - भारतीय सीमेवर चिनी सैन्य मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत आहे, या घुसखोरीला आळा घालण्यासाठी भारताने काही ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय वायूसेनेने चीनजवळील आपल्या सीमेवर काही ठोस उपाययोजना करण्याचे घोषित केले आहे.वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ब्राउन यांनी सोमवारी घोषणा केली की २०१६ पर्यंत भारत चीनला लागून असलेल्या आपल्या तीन हजार किलोमीटरच्या भारतीय सीमेवर रडार यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण करेल. ल़डाखमधील न्योमा एअरबेसची लांबी १२ हजार फूट केली जाणार आहे....
  October 3, 04:51 PM
 • बीजिंग- चीनच्या सेनेने भारताला नाव न घेता असा इशारा दिला आहे की, दक्षिण चीन समुद्रातून तेल काढण्यासाठी बाहेरील ताकदीचा वापर केल्यास हा प्रश्न अधिक चिघळेल. संरक्षण विभागाचे प्रवक्ते गेंग येनशेंग यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, दक्षिण चीन समुद्राचा प्रश्न जर आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा कोणताही प्रयत्न केला. तर, तो अधिक क्लिष्ट होईल.गेंग यांनी याबाबत चीनचे 'स्पष्ट' धोरण सांगितल्याचे बोलले जात आहे. तसेच दक्षिण चीन समुद्रावर आपलाच हक्क असल्याचे अधोरेखित केले आहे. चीन, व्हिएतनाम,...
  September 29, 02:17 PM
 • बीजिंग. तिबेटमधून उगम पावणा-या ब्रह्मपुत्रा, सतलज या हिमालयीन नद्यांविषयी चीनने तपशीलवार माहिती द्यावी, अशी मागणी सोमवारी भारताच्या वतीने करण्यात आली. या नद्या भारतातील मोठ्या प्रमाणावरील सिंचनाचा स्त्रोत आहेत. त्यामुळे भारताला नद्यांची स्थिती जाणून घेणे नियोजनासाठी आवश्यक आहे, असे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी म्हटले आहे. या मुद्यावर चीनने सहकार्य वाढविले पाहिजे. ते व्दिपक्षीय बैठकीदरम्यान बोलत होते. उभय देशांतील आर्थिक सहकार्यविषयक चर्चेला...
  September 27, 12:58 AM
 • बीजिंग- प्रशासनातील संवाद कौशल्यात आंतरराष्ट्रीय दर्जा मिळविण्यासाठी चीनतर्फे आता वरिष्ठ अधिका-यांना शाळेत पाठविले जाणार आहे. अर्थात इंग्रजीचे धडे गिरवायला लावले जाणार आहेत. चीन सरकारने हे आदेश बजावल्यानंतर शांघायमधील काही अधिका-यांनी इंग्रजी भाषेच्या सरकारी वर्गाला हजेरी लावायला सुरुवातदेखील केली आहे. यात जिल्हा पातळीवरील अधिकारी आहेत. याच आठवड्यात प्रशासनात हा बदल झाल्याचे दिसून आले आहे. या विषयीचा कार्यक्रम शांघाय महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. एक प्रशिक्षण झाले...
  September 25, 12:18 AM
 • खरं तर आजच्या स्थितीत सर्वच बाबतीत चीन भारतापेक्षा आघाडीवर आहे. मात्र काही ठिकाणी भारत चीनला मात देत असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनपेक्षा भारताची प्रतिमा चांगली आहे. याचे कारण जाते आपल्या राजकीय व्यवस्थेला. भारताने लोकशाही स्वीकारली आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असा सन्मान मिळविला. आता ताज्या घटनेकडे पहा. जी-८ देशांतील लोकांच्या पाहणीत भारताच्या प्रतिमेबाबतची ही घटना आहे. जी-८ देशांतील लोकांनी याबाबत चीनपेक्षा भारताला मोठी पसंती दिली आहे. जी-८ ने जगातील ५० देशांतील प्रतिष्ठा...
  September 24, 04:03 PM
 • दक्षिण-पश्चिम चीनमधील चॉन्गिग शहरात बुधवारी एक ह्दय हेलावून टाकणारी घटना घडली. एक रेस्टोरेंट बोटला एक नौका धडकल्यानंतर ती पाण्यात बुडू लागली होती. त्यामुळे नौकेची एक बाजू पाण्यात हळू-हळू बुडत होती. त्यामुळे नौकेत असलेली मंडळी वाचवा... वाचवा... अशी एकच बोंब मारत होती. सगळीकडून तोच आवाज येत होता. यात काही महिला, पुरुष आणि बहुतांश लहान मुलांचा समावेश होता. सगळेजण जीवाच्या आकांताने ओरडत होते. अखेर सुरक्षा रक्षकांनी त्यांना मदत केली. मात्र, या घटनेतून वाचल्यानंतर या लोकांच्या चेहऱयावरील आनंद जग...
  September 24, 12:02 PM
 • बीजिंग- चीनच्या दक्षिणेकडील समुद्रात भारत आणि व्हिएतनाम यांच्या संयुक्त तेल-वायू शोध मोहिमेमुळे पुन्हा एकदा चीनचा जळफळाट झाला आहे. हा प्रकल्प आमच्या क्षेत्रीय स्वायत्ततेवरील अतिक्रमण असल्याचे सांगत चीनने भारताला पुन्हा एकदा दरडावले आहे. सोबतच उभय देशांच्या द्विपक्षीय संबंधांवरही परिणाम होण्याचा इशारा चीनने दिला आहे. चीन सरकारचे मुखपत्र पीपल्स डेलीमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार वादग्रस्त स्प्रटली बेटाच्या पश्चिमेला भारत आणि व्हिएतनामच्या सरकारी कंपन्यांनी संयुक्तपणे...
  September 23, 05:33 AM
 • बीजिंग । वेगवान हल्ला चढवण्याची क्षमता असलेली युद्धनौका चीन पाकिस्तानसाठी तयार करीत आहे. पाकचे नौदलप्रमुख अॅडमिरल नोमान बशीर यांनी तिची पायाभरणी केली. आधुनिक युद्धप्रणालीने सज्ज ही नौका येत्या एप्रिलपर्यंत पाकच्या ताब्यात येईल.
  September 21, 05:40 AM
 • नवी दिल्ली/बीजिंग- चीनच्या दक्षिणेकडील समुद्रात भारतीय तेल कंपन्यांकडून होणा-या तेल शोध मोहिमेबद्दल चीनच्या इशा-याला धुडकावून लावत, माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सणसणीत प्रत्युत्तर भारताने दिले आहे.काही दिवसांपूर्वी चीनने भारताला दक्षिणेकडील समुद्रापासून लांब राहण्याचा इशारा देत असे करणे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. भारतीय तेल कंपनी ओएनजीसी विदेशने दक्षिण चीन सागरातील व्हिएतनामच्या तेल आणि नैसर्गिक वायूने समृद्ध असलेल्या ब्लॉकमध्ये तेल...
  September 21, 02:28 AM
 • बीजिंग। दक्षिण-पश्चिम चीनमधील सिचून प्रांताला पावसाने झोडपले असून आतापर्यंत 13 बळी गेले आहेत. देशाच्या अनेक भागांना काही दिवसांपासून पावसाचा तडाखा बसला असून सोमवारी बेझोंग शहरातील विविध घटनांत 13 जणांचा मृत्यू झाला. नानजिआंग भागात सहा लोकांचा मृत्यू झाला. टॉंगजिआंगमध्ये पाच मृत्यू झाले. या घटना दरड कोसळून झाल्या असल्याचे सुत्रांनी सांगितले. या भागातील नद्यांना पुर आल्यामुळे दहा लोक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.
  September 20, 12:46 AM
 • बीजिंग - विज्ञान युगात शुभ-अशुभाला थारा नाही; परंतु चीनमधील एका डॉक्टर महाशयांनी एका महिलेची प्रसूती चक्क अशुभ दिवसामुळे लांबवली. परिणामी मूल बेशुद्ध अवस्थेत जन्मले. या बेजबाबदार डॉक्टरांकडून चिनी कुटुंबाने मोठ्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. डॉक्टरांच्या वागण्यामुळेच आमचे मूल गेल्याचा आरोप ली शिऑजिन (32) या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. हा गुंता सोडविण्यासाठी आता आरोग्य अधिकारी प्रयत्न करीत आहेत. झेंग योना असे या डॉक्टरांचे नाव आहे. 12 ऑगस्ट रोजी ही महिला प्रसूतीसाठी गॉंगडॉंग...
  September 17, 11:57 PM
 • बिजिंग- मुसळधार पावसाने गेल्या 24 तासांमध्ये 9 जणांचा बळी घेतला आहे. उत्तरेकडील शांक्झी प्रांतामध्ये गेल्या दोन आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे 50 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. दोन आठव्ड्यांपासून संततधार पाऊस सुरु आहे. सुमारे 60 जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसला आहे. पाऊस थांबलाच नसल्यामुळे या परिसरात आता दरड कोसळण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 5 हजार घरे कोसळल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे....
  September 17, 03:14 PM
 • बीजिंग - येथील उत्तर भागातील कोळसा खाणीत काम करणारे दहा मजूर पुरामुळे अडकले आहेत. शांघी प्रांतात ही घटना घडल्याचे स्थानिक अधिका-यांनी सांगितले. शुक्रवारी हे मजूर खाणीत असताना अचानक पुराचे पाणी आत शिरले. त्यामुळे मध्ये काम करणारे मजूर अडकले असून त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. आज दुपारी हा पूर आल्याने शानयिन भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, खाणीत अडकलेल्यांना काढण्यासाठी मदत कार्य सुरू झाले आहे.
  September 16, 11:14 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात