Home >> International >> China

China News

 • शांघाय. यजमान चीन संघाने जलतरणच्या विविध प्रकारांत शानदार कामगिरी करत ८ सुवर्णपदकांचा बहुमान पटकावला. फिना वर्ल्ड जलतरण चॅम्पियन्सशिप स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवत चीनने चमकदार कामगिरी केली. चीनच्या चोंगने पुरुष गटात ३ स्प्रिंगबोर्डमध्ये सुवर्णपदकाची कामगिरी केली. या कामगिरीला उजाळा देत चीनच्या महिला संघानेही सुवर्णपदकाचा बहुमान मिळवला.
  July 24, 03:25 AM
 • बिजिंग - चीनमध्ये लक्षाधीशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी त्यांचे आयुष्यमान मात्र कमालीचे घटत चालले आहे. गेल्या आठ वर्षांत ७२ लक्षाधीश व्यक्तींचा मृत्य ऐन तारुण्यात झाला आहे. श्रीमंतांवरील हे गंडांतर चीनमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. या मृत्यूमागे नैसर्गिक कारणे नाहीत. खून, अपघात, फाशी वगैरे कारणामुळे अशा लक्षाधीशांना ऐश्वर्य अर्ध्यावर सोडून द्यावे लागले आहे. या श्रीमंतांमध्ये अनेक व्यक्तींच्या नावावर वैयक्तिक १५.५१ दशलक्ष अमेरिक डॉलर्स एवढी संपत्ती असल्याचे आढळून...
  July 24, 02:20 AM
 • बीजिंग- चीनमधील दोन उपमहापौरांना भ्रष्ट्राचार केल्याप्रकरणी नुकतीच फाशीची शिक्षा दिली. त्यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. चीनमधील सुप्रीम कोर्टने ( एसपीसी) सांगितले की, दोघांच्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची चौकशी केल्यानंतर त्यांना फाशी देण्यास मंजूरी देण्यात आली होती.सरकारी वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार, झेंगियांग प्रांतातील हांगझोऊ शहराचे माजी उपमहापौर शू मेइयोंग यांच्यावर लाच स्वीकारणे, मालमत्तेची अफरातफर करणे व पदाचा...
  July 23, 04:34 PM
 • चीनमध्ये महागाईने तेथील जनता आधीच त्रस्त आहे. त्यातच आता चीन सरकारने महागाई कमी करण्यासाठी केलेल्या उपायामुळे तेथील नागरिक व लघुउद्योग आता चांगलेच अडचणीत आले आहेत. महागाई आटोक्यात आणण्यासाठी चीनच्या केंद्रीय बॅंकने कडक पावले उचलली असून त्यामुळे तेथील लघु व मध्यम लघुउद्योजकांना कर्ज मिळणे आता अवघड झाले आहे.विशेष म्हणजे चीनच्या बाजारपेठेत व निर्यातीत लघु व मध्यम उद्योगांचा मोठा हातभार लागत आहे. मात्र, कर्ज देण्याच्या किचकट बाबींमुळे अशा उद्योगांचा नफा कमी झाला, काही डबघाईला येऊ...
  July 23, 12:32 PM
 • बीजिंग- बनावट वस्तू बनविण्यात व विकण्यात जगभर हातखंडा असलेल्या चीनने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. जगातील कोणत्याही कंपनीचा प्रॉडक्ट, वस्तू जशीची तशी बनवून त्यांनी तंत्रज्ञानाच्या जोरावर जगावर हुकमत गाजवली आहेत. आता तर, त्यांनी संगणक क्षेत्रातील नंबर एक कंपनी 'अॅपल' या कंपनीचे एक बनावट केंद्रच सुरु केले आहे. या केंद्रात काम करणाऱया कर्मचाऱयांना आपण खऱया अॅपल कंपनीत काम करत असल्याचे वाटले होते. अॅपल अमेरिकेन कंपनी असून, चीनमध्ये हळू-हळू पाय पसरायला लागल्याने चीनने कंपनीचे बनावट...
  July 21, 01:14 PM
 • बीजिंग. भ्रष्टाचार प्रकरणात दोष सिद्ध झालेल्या चीन दोन माजी उपमहापौरांना येथील लोकन्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. दोन्ही प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला. शिक्षा झालेल्यांमध्ये शु मायोंग व जिआंग रेनजी यांचा समावेश आहे. मायोंग हे झेजिंआंग या प्रांताचे उपमहापौर होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात पदाचा दुरुपयोग केला. भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप असून तो सिद्ध झाला. दुसरीकडे रेनजी हे जिआंग्सूचे उपमहापौर होते. त्यांच्यावर...
  July 20, 04:00 AM
 • बिजींग. फुटीरतावादी गटाने सोमवारी दक्षिण चीनच्या शिअँग प्रांतातील एका पोलिस ठाण्यावर जोरदार हल्लाबोल केला. शेकडोंच्या संख्येने लोक या ठाण्यावर चालून गेले. याला विरोध करणा-या चार पोलिसांचा मृत्यू झाला. या फुटीरतावादी गटाने सरकारच्या अनेक संस्थांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही अल-कायदा व आशियाईतील इतर दहशतवादी संघटनांसोबत काम करीत असल्याचा इशाराही या संघटनेने दिला आहे.
  July 19, 03:03 AM
 • बिजिंग- तिबेटच्या मुद्यावर धर्मगुरू दलाई लामा व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यातील चर्चेनंतर भडकलेल्या चीनने अमेरिकन राजदूताला बोलावून संताप व्यक्त केला. ही चर्चा म्हणजे देशांतर्गत कारभारात हस्तक्षेप आहे. झाले ते योग्य नाही. यामुळे द्विपक्षीय संबंध आता बिघडले असल्याचे संकेतही चीनने दिले. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर चीनने तातडीने अमेरिकेचे राजदूत रॉबर्ट एस. वांग यांना बोलवणे पाठविले. त्यात अमेरिकेच्या या कृतीचा जोरदार निषेध करण्यात आला. व्हाईट हाऊसच्या मॅप...
  July 18, 04:12 AM
 • बिजिंग- चीनमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दरड कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरच दरड कोसळल्यामुळे शेकडो जण अडकले आहेत. दोन ठिकाणी या घटना घडल्या आहेत. गान्सू प्रांतामध्ये क्विनान जिल्ह्यात एका महामार्गावर दरड कोसळली. त्यात एक मिनीबस आणि एका ट्रकला अपघात झाला. या घटनेत 5 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 11 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन जणांचा रुग्णालयात नेतांना मृत्यू झाला, तर आणखी 6 जणांचा रुग्णालययात मृत्यू झाला. याशिवाय दक्षिण चीन भागातील...
  July 16, 06:00 PM
 • बीजिंग: आशियासह संपूर्ण जगातील शक्ती सामर्थ्य संतुलित करण्यासाठी चीन विमानवाहू नौकेची चाचणी करण्याच्या तयारीत आहे. याबरोबर सागरी आणि हवाई सीमेवर प्रभाव टाकण्यासाठी चीन अत्याधुनिक क्षेपणास्त्रही विकसित करत आहे. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून चीन अमेरिकेचे तैवानमधील शक्तिप्रदर्शन रोखण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून चीन लष्करी ताकद वाढवत आहे. यादरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे लढाऊ विमाने तसेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तयार केली असून...
  July 14, 05:33 AM
 • बिजींग: दहाव्या मजल्यावरून खाली पडूनही आश्चर्यकारकरीत्या बचावलेली २ वर्षांची चिमुकली तब्बल दहा दिवसानंतर कोमातून बाहेर आली.२ जुलै रोजी चीनच्या झेजियांग प्रांतातील ही चिमुकली दहाव्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये खेळता खेळता अचानक तोल जाऊन खाली पडली. मात्र, खाली रस्त्यावर जाणाया वु जुपिंग या शेजायाने तिला अलगद झेलण्याचा प्रयत्न केला होता तरीही ती जमिनीवर पडली. या प्रयत्नात जुपिंगच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले होेते. निउ निउ असे या मुलीचे नाव असून गेल्या दहा दिवसांपासून ती कोमात...
  July 13, 06:07 AM
 • बीजिंग. अमेरिकेला धाक बसविण्यासाठी आणि शक्ती संतुलन साधण्यासाठी चीन एका खास उपग्रहाची निर्मिती करीत आहे. या उपग्रहामुळे चीनचा प्रभाव समुद्री सीमांच्या कक्षेबाहेरही वाढणार आहे. तैवानमधील अमेरिकेच्या वाढत्या हवाई शक्तीला लगाम घालणे चीनला शक्य होणार आहे. लंग्लंडमधील संरक्षणविषयक जर्नल ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजने हा खुलासा केला आहे. चीन सदैव अवकाशातील सैनिकी सामर्थ्य वाढविण्याला विरोध करीत आला आहे, हे विशेष. आता चीनचा उपग्रह कार्यक्रम चव्हाट्यावर आल्याने चीनचे खरे स्वरूप उघड झाले आहे....
  July 12, 12:52 PM
 • बीजिंग - मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या बुलेट ट्रेनने मिळवलेला लौकिक चीनला पंधरा दिवसही मिरवता आला नाही. नुकतीच सुरू झालेली ही ट्रेन रविवारी तब्बल ९० मिनिटे ठप्प झाली होती. नियोजित ठिकाणी पोहोचायला तिला किती विलंब झाला असेल हे वेगळे सांगायला नकोच. मात्र, यामुळे बुलेट ट्रेनकडून मोठी अपेक्षा ठेवून बसलेल्या प्रवाशांचे पुरते हाल झाले. कित्येक तास एसीशिवाय आणि गुदमरलेल्या स्थितीत राहावे लागलेल्या प्रवाशांनी आपला प्रशासनावरील संताप ब्लॉगवरून जगजाहीरदेखील करून टाकला....
  July 12, 02:57 AM
 • बीजिंग- चीनमध्ये मागील आठवड्यात सुरु करण्यात आलेली बीजिंग- शांघाय हायस्पीड रेल्वेसेवा चीनमध्ये पडत असलेल्या धुव्वाधार पावसामुळे व हिमवादळामुळे विस्कळीत झाली आहे. बीजिंग-शांघाय प्रवासादरम्यान हिमवादळामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे ही हायस्पीड रेल्वेसेवा सुमारे ९० मिनिटे खोळंबली होती.बीजिंग ते शांघाय हे अंतर १३१८ किलोमीटर असून ही हायस्पीड रेल्वे पाच तासात हे अंतर कापते. दरम्यान रेल्वेत असताना वीज पुरवठा न झाल्याने तसेच ही रेल्वे उशीरा पोचल्यानेप्रवाशांनी मोठ्या...
  July 11, 03:26 PM
 • वॉशिंग्टन- चीनमधील एका अधिकारी असलेली एक महिला पाकिस्तानातील अणुप्रकल्पासाठी तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे. तिच्यावर हजारो गैलन पेंट चोरुन पाकिस्तानात पाठविले असल्याचा आरोप आहे. शांघाई स्थित पीपीजी पेंटस ट्रेडिंग कंपनीची माजी कार्यकारी संचालक असलेल्या या महिलेचे जुन वांग असे नाव आहे. तिला या आरोपाखाली १६ जूनला कोअटलांटा येथे अटक केली आहे.या महिलेने ज्या अणुप्रकल्पाला चोरुन साहित्य पुरवले आहे. त्या अणुप्रकल्पाचे काम पाकिस्तान चीनच्या सहकार्यानेच करत आहे. मात्र ५१ वर्षीय वांग...
  July 10, 06:54 PM
 • वाशिंग्टन. हिंदी महासागरामध्ये चीनच्या कारवाया दिवसेंदिवस वाढतच आहेत. चीन आपली शक्ती वाढवीत आहे. अमेरिकेच्या संसदेतील एका अहवालामध्ये ही बाब नोंदविण्यात आली आहे. २००५ सालापासून चीन श्रीलंकेशी जवळीक वाढवीत आहे. हिंदी महासागरातील उत्तर भागात बंदर विकसित करण्याच्या नावाखाली नौसेनेच्या रणनीती अंतर्गत चीन श्रीलंकेवर पकड जमवीत असल्याचे अहवालात म्हटले आहे. चीनच्या या वाढत्या कारवायांमुळे भारतीय संरक्षण तज्ज्ञ चिंतीत आहेत. श्रीलंकेच्या हम्बनतोता या स्थानी चीन बंदराचे बांधकाम करीत...
  July 9, 06:15 PM
 • हाँगकाँग- जगातील सर्वाधिक लांबीच्या पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतिशय घाईत या पुलाचे काम करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा कठडे अत्यंत ढिले असल्याचे आढळले; तर काही ठिकाणी सुरक्षा कठड्यांना भेगा पडल्याचेही दिसत आहे. किंवगदाओ शहर आणि हुआंगदाओ बेट यांना जोडणारा हा 42.5 किलोमीटरचा पूल जगातील सर्वात मोठा पूल नुकताच वाहतुकीस खुला झाला. अवघ्या साडेचार वर्षांत तयार झालेल्या या अवाढव्य पुलाचे चीनच्या अभियांत्रिकी कौेशल्याचे जगभर कौतुक होत...
  July 6, 04:15 AM
 • जगातील सर्वात लांब समुद्रसेतुच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली जात आहे. चीनच्या पूर्व भागातील किंगदाओ ला हुंअंगदाओ बेटाने जोडणारा जगातील सर्वात लांब समुद्रसेतु असल्याचे म्हटले जाते. या सेतुचे अनेक नट-बोल्ट व्यवस्थित लावले न गेल्याने या सेतुच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ३० जून रोजी होणा-या उद्घाटनासाठी या पुलाचे काम लवकर उरकण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणचे नट-बोल्ट मोकळे राहिले आहेत. चीनी वृत्तपत्र शांघाय डेली ने दिलेल्या बातमीनूसार ४२.५ कि.मी. लांबीच्या या सेतुचे अनेक...
  July 5, 05:27 PM
 • बीजिंग. चीनची 8 हजार 700 किलोमीटर लांबीची नैसर्गिक वायूची पाईपलाईन नुकतीच सुरू झाली. ही जगातील सर्वाधिक लांबीची नैसर्गिक वायूची पाईपलाईन ठरली आहे. तुर्कमेनिस्तानपासून दक्षिण चीनपर्यंत ही पाईपलाईन आहे.या पाईपलाईनमुळे चीनमधील शांघाई, ग्वांगाओ आणि हॉंगकॉंग आदी औद्योगिक क्षेत्रांना नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जाणार आहे. या पाईपलाईनच्या 8 शाखा आहेत, त्यापैकी 3 शाखांचे काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी अन्य 5 शाखांचे काम पूर्ण होतील.दरवर्षी 30 हजार कोटी घनमीटर नैसर्गिक वायू वाहून आणण्याची या...
  July 4, 06:20 PM
 • बीजिंग । चीनच्या हँगझू शहरात एक दोन वर्षाचे बाळ चक्क दहाव्या मजल्यावरुन पडूनही आश्चर्यकारकरित्या बचावले. दहा मजली अपार्टमेंटमध्ये आजीसोबत खेळत असताना हे निऊनिऊ बाळ अचानक खिडकीजवळ आले आणि त्याचा तोल गेला. मात्र, खाली रस्त्यावरुन जात असताना एका वाटसरुने त्याला अलगद पकडले. या बाळाला झेलताना त्या वाटसरुचा हात मोडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  July 4, 01:07 AM
 
जाहिरात

RECOMMENDED