जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

 • बीजिंग । चीनने ऐतिहासिक भिंतीची दुरुस्ती सुरू केली आहे. उत्तर चीनमधील हुराऊ जिल्ह्यात या भिंतीचा मोठा हिस्सा दुरुस्त करावा लागणार असून या कामासाठी सरकार ६५ लाख डॉलर्सचा निधी देणार आहे. यातून भिंतीच्या ३५५३ मीटर भागाची व २५ टेहळणी टॉवर्सची दुरुस्ती होणार आहे. या भिंतीचा मोठा भाग कमकुवत झाला असून तो ढासळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे त्याची डागडुजी करून पडलेला भाग सावरण्यात येणार आहे. जागतिक वारसा स्थळांच्या युनेस्कोच्या यादीत चीनच्या या भिंतीचा समावेश असून चंद्रावरूनही ती...
  August 20, 12:53 AM
 • बीजिंग। लिबियातील बंडाळीच्या परिस्थितीत तेथील नागरिकांना मदतीचा पहिला टप्पा चीनकडून गुरुवारी रवाना करण्यात आला. तियानजिन विमानतळावरून सकाळी ही मदत पाठवण्यात आली आहे. तांदूळ, खाद्यतेल, औषधींसह सुमारे ९० टन सामग्री लिबियाला पाठवण्यात आली आहे. चीनच्या रेडक्रॉस सोसायटीने ही मदत पाठवली आहे. रमजान महिन्यात मदतीच्या दोन खेपा करण्यात येणार आहेत. चीन एकूण पाच कोटी डॉलरची मदत पाठवणार आहे.
  August 19, 03:43 AM
 • नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेशातील राजधानी तवांगजवळील भारतीय हद्दीतील एक वादग्रस्त भिंत चीनच्या सैनिकांनी पाडली आहे. भारत-चीन सीमेबाबत कायमच वाद राहिले आहेत. त्यात चीन घुसखोरी करण्यावर आघाडीवर असून भारतीय सरकारने कडक भूमिका घेत नसल्याने चीनचे कायमच फावत चालले आहे. सूत्राच्या माहितीनुसार, भारतीय सैनिकांनी ही भिंत पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न केले.मात्र चीनच्या सैनिकांनी याला विरोध केला असून गेल्या एक महिन्यापासून यावर कोणताही निर्णय झाला नाही. चीनच्या वाढत्याघुसखोरीमुळे देशात...
  August 18, 12:11 PM
 • बीजिंग. तिबेटमध्ये जलप्रकल्प उभारण्याची घोषणा मंगळवारी चीन सरकारने केली. ब्रह्मपुत्रा नदीवर हा जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येणार असून त्यासाठी १.८ अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे. तिबेटवर लक्ष केंद्रित करताना चीनने तेथील सिंचनाच्या मुद्द्याला हात घातला आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यासाठी ब्रह्मपुत्रा नदीवर हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा...
  August 17, 02:23 AM
 • बीजिंग। जुलैमधील रेल्वे दुर्घटनेनंतर चीनच्या बुलेट ट्रेनवर प्रचंड प्रमाणात टीका झाली. आता या गाड्यांचा वेग कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो आता ताशी तीनशे किलोमीटर असा असेल. पूर्वी तो साडेतीनशे एवढा होता. २५० वेगाची क्षमता असलेल्या गाड्यांचा वेग लवकरच २०० एवढा होणार आहे. जुलैमध्ये बुलेट ट्रेनला भीषण अपघात झाला होता. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडला होता. त्यात शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सरकारवर याप्रकरणामुळे प्रचंड टिकेला तोंड द्यावे लागले होते.
  August 12, 11:37 PM
 • बीजिंग - पाकिस्तान अमेरिकेकडून आर्थिक मदत घेतो. तर चीनकडून लष्करी मदत घेत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. मात्र, शुक्रवारी पाकिस्तानने चीनच्या सहकार्याने पाकसॅट-१ आर हा दळणवळण उपग्रहचे प्रक्षेपण करण्यात आले. चीनमधील सिचुआन प्रांतातील झीचँग येथून उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.या उपग्रहामुळे दक्षिण व पश्चिम आशिया, युरोप तसेच आफ्रिकेतील काही देशांमध्ये इंटरनेट, दूरसंचार सेवा देण्याची पाकिस्तानची योजना आहे. पाकिस्तानचा पाकसॅट-१ या हा उपग्रहाचे आयुष्य संपल्याने हा उपग्रह सोडण्यात...
  August 12, 03:55 PM
 • बीजिंग - चोराच्या उलट्या बोंबा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ज्या चीनच्या हॅकर्सनी आतापर्यंत अमेरिका, भारतासारख्या देशातील गोपनीय व महत्त्वाची माहिती चोरली आहे. त्याच चीनने सायबर हल्ल्याला भारत जबाबदार असल्याचे म्टले आहे.चीनने याचे खापर फक्त भारतावरच फोडले नाही तर अमेरिकाही यात दोषी आहे, असे चीनने बुधवारी स्पष्ट केले.याबाबत अधिक माहिती देताना चीन सरकार म्हणते, गेल्या काही महिन्यांत सरकारी संस्था व इतर खासगी संस्थांवर पाच लाखापेक्षा जास्त सायबर हल्ले झाले आहेत. यामधील निम्मे हल्ले...
  August 10, 03:05 PM
 • नवी दिल्ली- चीनमधील हॅकर्सनी आता भारतातील न्यायपालिकेकडे मोर्चा वळविला आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, चीनच्या हॅकर्सनी देशातील १९ उच्च न्यायालयाच्या डुप्लीकेट वेबसाइट तयार केल्या आहेत. देशभरातील संगणक पध्दतीमध्ये वायरस सोडण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे.एक माजी नौदल अधिकारी मुकेश सैनी यांनी नुकताच सीबीआयसमोर हा दावा केला आहे. सायबर सुरक्षा विशेषज्ञ असलेल्या सैनी यांनी तपास यंत्रणेला सायबर गुन्हेगारी शाखेपुढे हा दावा केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, डुप्लीकेट वेबसाइट...
  August 7, 12:23 PM
 • शांघाई- मुइफा नावाचे सर्वात मोठे वादळ चीनमध्ये हाहाकार माजवत आहे. सध्या हे वादळ चीनच्या पूर्व प्रांतात झेजियांगच्या बाजूने पुढे सरकत आहे. चीन सरकारने आपली आपत्तकालीन व्यवस्था तयारीत ठेवली आहे. २०० विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दोन लाख लोकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आले आहे. सीमावर्ती भागात वादळाबरोबर मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा चीनच्या हवामान खात्याने दिला आहे.दहा मीटर उंचीपर्यंत समुद्राच्या लाटा येण्याची शक्यता असल्याचा धोक्याचा इशारा सागर पर्यावरण...
  August 7, 11:54 AM
 • मुलांशी क्रूरतेने वागणे हे चीनसाठी नवीन नाही. अलीकडे चीनमध्ये मुलांविषयीच्या वेगवेगळ्या बातम्यांची चर्चा असते. परंतु यावेळी एका मुलाला अमानुष पद्धतीने वागविले जात असल्याचे समोर आले आहे. तुम्ही ही बातमी ऐकाल तर हळहळत राहाल. दि डेली मेल या इंग्रजी वेबसाईटच्या अहवालात अशाच एका मुलाविषयीची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या मुलाचा काकाच याला साखळीने दिवसभर बांधून ठेवतो. 12 वर्षी की चांगकुइंग नावाच्या या मुलाला दिवसभर साखळीने बांधलेल्या अवस्थेतच राहावे लागते. मुलाच्या काकाचे म्हणणे आहे की हा...
  August 6, 08:01 PM
 • वॉशिंग्टन - लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करीत आहे. ही गोष्ट अमेरिकेला अस्वस्थ करणारी ठरली आहे. आमच्या संरक्षणासाठी ही वाढ केली जात असल्याचे गुळगुळीत उत्तर चीनकडून ऐकवले जाते; परंतु लष्करी विकासाचा हेतू काही शुद्ध वाटत नाही, असे अमेरिकेचे अॅडमिरल माइक मुलेन यांनी म्हटले आहे. मुलेन यांनी नुकताच चीन दौरा केला. दक्षिण कोरिया व चीन हे दोन्ही देश आमच्यासाठी निश्चितपणे चिंतेचा विषय आहेत. चीनने सातत्याने लष्करी विकासाची अशीच गती ठेवल्यामुळे उपखंडातील शांततेवर त्याचा...
  August 6, 12:58 AM
 • बीजिंग. चीनने गुरुवारी जपानच्या संरक्षण विषयक भूमिकेला कडाडून विरोध केला. चीनच्या वाढत्या सैन्यशक्तीबद्दल जपानच्या संरक्षणविषयक श्वेतपत्रात चिंता व्यक्त करण्यात आली होती. टोकिओने बेजबाबदारपणे भूमिका मांडली असून यामागे जपानचे काही वेगळे उद्देश असू शकतात, असे चीनने म्हटले आहे.चीनच्या संरक्षण मंत्रालयाने जपानच्या श्वेतपत्राचा हवाला देवून म्हटले आहे की, चीन शांततापूर्वक विकासमार्गावर दृढ आहे. शेजारील देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचे चीनचे धोरण आहे आणि आपली राष्ट्रीय संरक्षण...
  August 5, 05:26 PM
 • बीजिंग - चीनच्या जियांगमेन या शहरात सार्वजनिक ठिकाणी यापुढे कुत्रे आणले गेले तर त्यांना पकडण्यात येणार आहे अथवा ठार करण्यात येईल, असा इशारा सरकारने दिला आहे. २६ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नियमामुळे हे शहर सभ्य होईल. या नियमाच्या काटेकोर पालनासाठी नागरिक सहकार्य करतील, अशी आशा एका अधिका-याने व्यक्त केली आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे कुत्री आहेत. त्यांनी ती ग्रामीण भागात सोडून द्यावीत, असा सल्लाही सरकारने दिला आहे. दुसरीकडे कुत्रे पाळण्याचा परवाना दिल्याशिवाय...
  August 5, 01:26 AM
 • चीनने हिंदी महासागरातील भारतीय समुद्री क्षेत्राला लागून असलेल्या भागावर ताबा मिळविला आहे. हिंदी महासागरातील 10 हजार चौरस किलोमीटर भागातील पॉलीमेटलिक सल्फाईड खनिज भांडारावर चीनने अधिकार प्राप्त केला आहे. दि चायना ओशियन मिनरल रिसोर्सेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट असोशिएशने मंगळवारी रात्री जारी केलेल्या वक्तव्यात ही माहिती दिली आहे. हिंदी महासागरातील या क्षेत्रात उत्खनन करण्यासाठी चीनने इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटीकडे आवेदन दिले होत आणि त्यास मंजूरी मिळाली आहे.चीनसोबत असोशिएशन या वर्षी...
  August 4, 06:29 PM
 • बोस्टन - इंटरनेट सुरक्षातज्ज्ञांनी आजपर्यंच्या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्याचा शोध लावला आहे. भारत, संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या संरक्षण कंपन्यांसह जगभरातील अनेक ठिकाणांवर झालेल्या आजपर्यंतच्या सगळ्यात मोठ्या सायबर हल्ल्यात चीनचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंटरनेट सुरक्षा आणि अँटिव्हायरस तयार करणा-या मॅकफी कंपनीने या सायबर घुसखोरीचा पर्दाफाश केला आहे. कंपनीच्या मते, या सायबर हल्ल्यामागे एक सरकारी घटकही आहे. मात्र, त्याच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. वॉशिंग्टन पोस्ट या...
  August 4, 12:38 AM
 • बीजिंग - पाकिस्तानचा जवळचा मित्र चीनने त्या देशावर दहशतवादाचा ठपका ठेवला आहे. शिनिजियांग प्रांतात निष्पाप लोकांवर होणा-या हल्ल्यांसाठी चीनने पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या अतिरेक्यांना जबाबदार धरले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रक्तपातात 20 लोक ठार झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल शुजा पाशा यांना चीनच्या गोपनीय दौ-यावर पाठविले आहे. पाकव्याप्त काश्मीरलगतच्या शिनजियांग प्रांतातील काशगर शहरात घातपाती कारवाया सुरू आहेत. या हल्ल्यात शनिवारी 9 जण ठार...
  August 2, 04:21 AM
 • बीजिंग- जुलैमध्ये चीनला वादळी तडाखा बसला. त्यातील मृतांचा आकडा ९७ पर्यंत गेला आहे. या वादळामुळे चीनमधील सुमारे २०.१६ दशलक्ष लोक आपद्गस्त आहेत. या नैसर्गिक संकटामुळे काही भागातील आर्थिक हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. हा आकडा १३.२८ अब्ज यॉन (२.४ अब्ज डॉलर्स) एवढा असल्याचे सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात येते. जिआंगसू, हुबेई, शांक्सी, गांसू यासारख्या प्रांतांचे वादळामुळे नुकसान झाले आहे.
  August 2, 12:53 AM
 • नवी दिल्ली. भारतीय सीमेत चीनने घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. जम्मू काश्मीर राज्यातील लडाख क्षेत्रात चीनी सैनिक बॅनर्ससह दिसताहेत. त्यात त्यांनी दावा केला आहे की, ही जमीन चीनच्या मालकीची आहे. टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. लेहच्या सीमावर्ती भागातील सरपंचाने घुसखोरीची छायाचित्रे टाईम्स नाऊकडे दिल्याचे वृत्तात म्हटले आहे. भारतीय यात्री शेडजवळ चीनचे सैनिक छायाचित्रात दिसताहेत. दोन्ही देशांतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनी सैनिक आपल्या निर्माण कार्यात व्यस्त आहेत आणि...
  August 1, 06:35 PM
 • बिजिंग- चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये झालेल्या हिंसाचारासाठी चीनने पाकिस्तानवर दोषारोपण केले आहे. पाकिस्तानात प्रशिक्षित दहशतवाद्यांनी हे हल्ले घडविल्याचे चीनने म्हटले आहे. शिनजियांग प्रांतामध्ये काल रात्री काशगर भागात पुन्हा एकदा हल्ला झाला. त्यात 5 हल्लेखोरांसह 14 जण ठार झाले. तर दोन दिवसांपुर्वीही असाच हल्ला झाला होता. त्यात 11 जण ठार झाले होते. या हल्ल्याच्या तारा पाकिस्तानमध्ये जुळल्या असल्याचे काशगरच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हल्लेखोरांनी पाकिस्तानाहील कॅम्पमध्ये बॉम्ब...
  August 1, 12:55 PM
 • वृत्तसंस्था. चीनमधील संवेदनशील प्रांत असलेल्या झिजियांगमध्ये इस्लामी दहशतवाद्यांनी घडवलेल्या हिंसाचाराच्या घटनांत चीनी पोलिस अधिका-यांसमवेत 15 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. पाकव्याप्त काश्मिरला लागून असलेल्या काश्घर येथे काल रात्री दोन अतिरेक्यांनी एका ट्रकचे अपहरण केले आणि गर्दीत बेफाम घुसविले. यात 8 जण जागीच ठार झाले आणि रविवारी सकाळी झालेल्या बॉम्ब स्फोटात आणि हिंसाचारात आणखी सात जण ठार झाले. रविवारी सकाळी दोन ठिकाणी स्फोट झाल्याचेही वृत्त आहे.पोलिसांनी रविवारी चार संशयीतांना...
  July 31, 07:26 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात