जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

 • वाशिंग्टन. हिंदी महासागरामध्ये चीनच्या कारवाया दिवसेंदिवस वाढतच आहेत. चीन आपली शक्ती वाढवीत आहे. अमेरिकेच्या संसदेतील एका अहवालामध्ये ही बाब नोंदविण्यात आली आहे. २००५ सालापासून चीन श्रीलंकेशी जवळीक वाढवीत आहे. हिंदी महासागरातील उत्तर भागात बंदर विकसित करण्याच्या नावाखाली नौसेनेच्या रणनीती अंतर्गत चीन श्रीलंकेवर पकड जमवीत असल्याचे अहवालात म्हटले आहे. चीनच्या या वाढत्या कारवायांमुळे भारतीय संरक्षण तज्ज्ञ चिंतीत आहेत. श्रीलंकेच्या हम्बनतोता या स्थानी चीन बंदराचे बांधकाम करीत...
  July 9, 06:15 PM
 • हाँगकाँग- जगातील सर्वाधिक लांबीच्या पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतिशय घाईत या पुलाचे काम करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा कठडे अत्यंत ढिले असल्याचे आढळले; तर काही ठिकाणी सुरक्षा कठड्यांना भेगा पडल्याचेही दिसत आहे. किंवगदाओ शहर आणि हुआंगदाओ बेट यांना जोडणारा हा 42.5 किलोमीटरचा पूल जगातील सर्वात मोठा पूल नुकताच वाहतुकीस खुला झाला. अवघ्या साडेचार वर्षांत तयार झालेल्या या अवाढव्य पुलाचे चीनच्या अभियांत्रिकी कौेशल्याचे जगभर कौतुक होत...
  July 6, 04:15 AM
 • जगातील सर्वात लांब समुद्रसेतुच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली जात आहे. चीनच्या पूर्व भागातील किंगदाओ ला हुंअंगदाओ बेटाने जोडणारा जगातील सर्वात लांब समुद्रसेतु असल्याचे म्हटले जाते. या सेतुचे अनेक नट-बोल्ट व्यवस्थित लावले न गेल्याने या सेतुच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ३० जून रोजी होणा-या उद्घाटनासाठी या पुलाचे काम लवकर उरकण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणचे नट-बोल्ट मोकळे राहिले आहेत. चीनी वृत्तपत्र शांघाय डेली ने दिलेल्या बातमीनूसार ४२.५ कि.मी. लांबीच्या या सेतुचे अनेक...
  July 5, 05:27 PM
 • बीजिंग. चीनची 8 हजार 700 किलोमीटर लांबीची नैसर्गिक वायूची पाईपलाईन नुकतीच सुरू झाली. ही जगातील सर्वाधिक लांबीची नैसर्गिक वायूची पाईपलाईन ठरली आहे. तुर्कमेनिस्तानपासून दक्षिण चीनपर्यंत ही पाईपलाईन आहे.या पाईपलाईनमुळे चीनमधील शांघाई, ग्वांगाओ आणि हॉंगकॉंग आदी औद्योगिक क्षेत्रांना नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जाणार आहे. या पाईपलाईनच्या 8 शाखा आहेत, त्यापैकी 3 शाखांचे काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी अन्य 5 शाखांचे काम पूर्ण होतील.दरवर्षी 30 हजार कोटी घनमीटर नैसर्गिक वायू वाहून आणण्याची या...
  July 4, 06:20 PM
 • बीजिंग । चीनच्या हँगझू शहरात एक दोन वर्षाचे बाळ चक्क दहाव्या मजल्यावरुन पडूनही आश्चर्यकारकरित्या बचावले. दहा मजली अपार्टमेंटमध्ये आजीसोबत खेळत असताना हे निऊनिऊ बाळ अचानक खिडकीजवळ आले आणि त्याचा तोल गेला. मात्र, खाली रस्त्यावरुन जात असताना एका वाटसरुने त्याला अलगद पकडले. या बाळाला झेलताना त्या वाटसरुचा हात मोडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  July 4, 01:07 AM
 • हाँगकाँग - सरकारच्या धोरणाविरोधात हाँगकाँगमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले. आपला असंतोष जाहीर करण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या वेळी पोलिसांनी २२८ जणांना अटक केली. दरम्यान, या मोर्चात २ लाख १८ हजार लोक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. मालमत्तेच्या किमती तसेच सरकारच्या इतर अनेक धोरणांवरून नागरिकांत असंतोष आहे. निवडणुकीसंदर्भात मांडलेल्या प्रस्तावालाही नागरिकांचा विरोध आहे. या मोर्चात ५४ हजार नागरिक सहभागी झाले होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.
  July 3, 12:37 AM
 • हाँगकाँग - चीनमधील जंगलांची देखरेख करण्याची जबाबदारी रोबोटच्या एका फौजेवर सोपविण्याची जोरदार तयारी करण्यात येऊ लागली आहे. अळीच्या आकाराच्या या रोबोट्सना ट्रीबोट असे नाव देण्यात आले आहे. हेच ट्रीबोट झाडांवर चढून उंचावरून जंगलांची देखभाल करणार असून, पर्यावरणाचेही संरक्षण करणार आहे. ट्रीबोट या रोबोटमध्ये कोणत्याही प्रकारच्या झाडांवर चढण्याची क्षमता आहे. अळीप्रमाणेच हे रोबोट आपल्या पायांच्या साहाय्याने झाडांच्या वेगवेगळ्या फांद्यांवर सहजपणे चढू शकतात. अळीपासून प्रेरणा - हा रोबोट...
  July 3, 12:27 AM
 • बीजिंग- चीनमध्ये बनविण्यात आलेला जगातील सर्वात लांब सागरी सेतू (समुद्र पुल) गुरुवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा पुल भर समुद्रात अत्याधुनिक तत्रंज्ञानाने बांधला आहे. 'किंगडाओ-जियाओझोऊ बे' असे पुलाचे नाव असून तो आठ पदरी बांधण्यात आला आहे. या पुलाची एकूण लांबी ३६.४८ किलोमीटर एवढी आहे.गुरुवारी त्याचे अधिकृत उदघाटन करण्यात आले असल्याचे सिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या पुलाला २.३ अब्ज डॉलर खर्च आला आहे. या पुलाचे काम मे २००७ पासून चालू होते.किंगडाओ शहराचे वाहतुक विभागाचे प्रमुखांनी...
  June 30, 06:20 PM
 • नवी दिल्ली- भारताला पाकिस्तानपासून फार धोका नसून चीनकडूनच भारताला मोठा धोका आहे, असा खुलासा संरक्षण मंत्रालयाने केला आहे.संरक्षण मंत्रालयाने तीन भूदल, वायूदल, हवाईदल या तीन विभागाच्या पुढील १५ वर्षाच्या संरक्षणविषयक नियोजनाबाबत एक अहवाल बनविण्यात आला असून, त्यात पाकिस्तानपेक्षा चीनकडूनच भारताला जास्त धोका असल्याचे म्हटले आहे.भारतीय संरक्षण विभागाने २०१० ते २०२५ या कालावधीसाठी ही योजना तयार केली आहे. त्या योजनेनुसार २०१२ मध्ये भारत डोंगराळ भागात लढण्यासाठी खास ९०,००० हजार जवानाची...
  June 28, 07:38 PM
 • बीजिंग: अमेरिकन विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यासाठी चीनने चांगलीच कंबर कसली आहे. स्पर्धेत पुढे राहण्यासाठी दर्जेदार इंग्रजी शिकण्यावर भर दिला जात असून, या उन्हाळी वर्गात कधी नव्हे ती फार मोठ्या संख्येने चिनी मुले सहभागी होणार आहेत. पालकांनी इंग्रजीची एवढी धास्ती घेतली आहे की या वर्गासाठी ते कितीही शुल्क भरण्यासाठी तयार झाले आहेत. त्यासाठी प्रत्येकी ५ हजार अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च लागणार आहे. या वर्गात ते अमेरिकन विद्यार्थ्यांसोबत खेळणार आहेत. त्यासाठी सुमारे ६० हजार मुले परदेशात...
  June 27, 03:14 AM
 • बीजिंग- भारतीय सैन्य दलाचे प्रतिनिधी मंडळ सध्या चीनच्या दौ-यावर आहे. त्याचवेळेस पाकिस्तानमध्येही चीन आणि पाकिस्तान यांच्या सैनिक अधिका-यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेवरून चीनच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित झाली आहे. एकीकडे चीन भारताशी संरक्षण क्षेत्रात देवाण-घेवाण करण्याविषयी चर्चा करत आहे , तर त्याचदरम्यान ते पाकिस्तान बरोबरील संरक्षण क्षेत्रातील आपले संबंध वाढवण्याचाही प्रयत्न करीत आहे. यावरून चीन हा भारतापेक्षा पाकिस्तानला महत्व देतो का? असा प्रश्न निर्माण होतोय.गेल्या एक...
  June 23, 11:54 AM
 • बीजिंग - ४० कोटी रुपयांच्या हिऱयांची तस्करी केल्याच्या आरोपाखाली २१ भारतीयांना गेल्या दीड वर्षापासून कैद करण्यात आले आहे. त्यातील दोघे राजस्थानचे रहिवासी आहेत. पाली (राजस्थान) येथील निवृत्त बँक व्यवस्थापकाचा मुलगा राजेश जैन आणि जयपूर येथील अन्य एका युवकाचा यात समावेश आहे. चीनच्या तस्करविरोधी विभागाने त्यांना अटक केली. भारतातील बहुराष्टीय कंपनीच्या मार्केटिंगसाठी दोघे चीनमध्ये गेल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयाने केला आहे. तस्करी प्रकरणात मुलांचाही काहीही संबंध नसल्याचे त्यांचे...
  June 23, 03:19 AM
 • बीजिंग -केवळ नऊ दिवसांत उपोषण समाप्त करावे लागणाऱया रामदेवबाबा यांच्या शारीरिक क्षमतेवर योगगुरू बी.के.एस. अय्यंगार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही जण कपालभाती विकून पतंजली योग भ्रष्ट करत असल्याची टीकाही अय्यंगार यांनी रामदेवबाबांचे नाव न घेता केली. अय्यंगार यांचे येथे योग शिबिर सुरू असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अय्यंगार यांच्या सन्मानार्थ बीजिंग टपाल विभागाने त्यांचे टपाल तिकीट जारी केले आहे. रामदेवबाबा यांनी आठवडाभरात उपोषण संपवल्याने त्यांच्यावर देशभरातील...
  June 23, 03:02 AM
 • हाँगकाँग -चीन आपल्या पहिल्या विमानवाहू जहाजाची सागरी चाचणी १ जुलै रोजी करणार आहे. सोव्हियत संघाच्या काळातील जहाजामध्ये नवे तंत्रज्ञान वापरून हे जहाज विकसित केले आहे. समुद्राच्या दक्षिण सीमेवरील वाढत्या तणावामुळे चीन चहाज बांधणीच्या अंतिम टप्प्यात आहे. विमानवाहू जहाजाचे आॅक्टोबर २०१२ पर्यंत जलावतरण होणार नाही, असे लष्करी अधिकायाच्या हवाल्याने हाँगकाँग कमर्शियल डेलीच्या वृत्तात म्हटले आहे. १ जुलैला कम्युनिस्ट पार्टीला ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या दिनाचे औचित्य साधून विमानवाहू...
  June 23, 02:51 AM
 • बीजिंग - पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ योग गुरू बी. के. एस अय्यंगार यांनी रामदेव बाबांनी नऊ दिवसातच संपवलेल्या उपोषणावर टीका केली. एक योग गुरू नऊ दिवसातच उपोषण संपवतो. यावरून त्यांच्या क्षमतेविषयी शंका उपस्थित केली आहे. 'कपालभाती'सारखे योग 'आसन' म्हणून विकून पतंजलि योगास ते भ्रष्ट करीत आहेत. सध्या अय्यंगार चीनमध्ये आपल्या भक्तांना योग शिकवत आहेत. नुकताच बिजिंग पोस्ट कार्यालयाने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकिट प्रकाशित केले आहे. रामदेव बाबांनी नऊ दिवसांतच आपले...
  June 22, 12:35 PM
 • बिजींग- मध्य आणि दक्षिण चीनला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून परिसरातील साऱया नद्या दुथडी भरून वाहत असल्याने महापुराचा तडाखा बसला आहे. लाखो लोकांना या पुराचा फटका बसला असून हजारो जण बेपत्ता झाले आहेत.चीनचे जलस्रोत मंत्री चेन लेई यांनी या भयंकर पूरस्थितीची माहिती देताना सांगितले की, मध्य आणि दक्षिण चीनमधील 10 नद्यांना महापूर आला आहे. या नद्यांवरील धरणे धोक्यात आली आहेत. आणखी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रचंड हानी होण्याची शक्यता आहे. सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,...
  June 21, 03:09 AM
 • बीजिंग: एखादी व्यक्ती चांगले जीवन जगत असेल तर तिला भारतात पुनर्जन्म मिळतो, असे एकदा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक माओ-त्से-तुंग म्हणाले होते. या आठवणीला भारताचे राजदूत एस. जयशंकर यांनी उजाळा दिला आहे. ते शनिवारी येथील संमेलनात मार्गदर्शन करताना बोलत होते. आशियाचा इतिहास व संस्कृतींचे आकलन या विषयावर येथे सुरू असलेल्या संमेलनात दोन्ही देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. हे संमेलन दोन्ही देशांच्या वतीने संयुक्तरीत्या आयोजित करण्यात आले आहे. या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,...
  June 19, 03:15 AM
 • बीजिंग- चीनमधील साम्यवादी पक्षाचा संस्थापक माओत्से तुंग याने एका जुन्या चीनच्या म्हणीचा दाखला देत म्हटले होते की, जर कोणी व्यक्ती आपल्या आयुष्यात चांगले काम व कर्म करेल त्याचा पुनर्जन्म भारत देशात होईल.माओ याच्या लाल पुस्तकातील म्हणी जगभर प्रसिध्द आहेत. त्याचे दाखले बोलण्यातून मिळतात. त्याने भारताबाबत केलेल्या वाक्याबाबत मात्र कोणी फार बोलले नाही. मात्र चीनमधील भारतीय राजदूत एस. जयशंकर यांनी शनिवारी याबाबत भाष्य केले.माओने १९५० साली भारताचे पहिले राजदूत एम. पणिक्कर यांच्याबरोबर...
  June 18, 08:44 PM
 • बिजिंग: अवघ्या दोन दशकांच्या काळात चीनमधील भ्रष्ट अधिकार्यांनी 123 कोटी डॉलर्सहून अधिक रक्कम परदेशात पळविली असल्याचे सेंट्रल बँकेने जाहीर केले आहे. सेंट्रल बँकेने चीनमधील भ्रष्टाचाराबाबत केलेल्या अभ्यासात ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. चीनमधील 16,000 सरकारी अधिकारी आणि सरकारी मालकीच्या कंपन्यातील 18,000 अधिकार्यांनी भ्रष्ट मार्गाने मिळविलेले 800 कोटी यान (123.7 कोटी डॉलर्स) परदेशात दडवले आहेत, असे बँकेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.वरिष्ठ स्तरावरील अधिकारी मोठय़ा रकमा घेऊन अमेरिका,...
  June 18, 03:13 AM
 • नवी दिल्ली- भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱयांना चीनचा व्हिसा देण्यास नकार देणाऱया चीनने आता तो व्हिसा देण्यास परत सुरवात केली आहे. प्रथम व्हिसा नकारणाऱया आता देणाऱया चीनने याबाबत एक पाऊल मागे गेतल्याचे दिसून येत आहे. यानंतर भारतानेही चीनशी एक वर्षासाठी संरक्षण विषयक मदत करण्यास तयार केली आहे. येत्या रविवारी जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेले मेजर जनरल रॅंकमधील एका वरिष्ठ अधिकाऱयांच्या नेतृत्त्वाखाली चीनचा दौरा करणार आहेत.पंतप्रधान यांनी चीनचा एप्रिलमध्ये दौरा केला होता. त्यावेळी...
  June 17, 12:11 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात