जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

 • बीजिंग- गेल्या दहा दिवसापासून चीनमध्ये सुरु असलेल्या वादळी पावसामुळे चीनमधील जनजीवन विस्कळीत झाले असून बुधवारी चार जण मृत्युमुखी पडले आहेत. वादळी पावसाने आतापर्यंत १०५ लोकांचे बळी घेतले आहेत तर शेकडो जण बेपत्ता झाले आहेत. चीनमधील पूर्व व मध्य प्रांतांमधील ७५ हजार नागरिक विस्थापित झाले आहेत. बुधवारी नव्याने मिळालेल्या माहितीनुसार, चार जण मरण पावले तर सात जण बेपत्ता झाले आहेत. वीज पडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. जिआन्गझी प्रांतामधून ७०,१०० नागरिकांना आपले घरदार सोडावे लागले आहे....
  June 16, 06:17 PM
 • वाशिंग्टन- अमेरिकेच्या संसदेतील संशोधन करणारी संस्था कॉँग्रेसनल रिसर्च सर्विस (सीआरएस)ने दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, चीन हा पाकिस्तान व इराणसारख्या देशांना अणुबॉँम्ब व क्षेपणास्त्र बनविण्याचे तंत्रज्ञान विकून जगात नवीन धोका निर्माण करत आहे. तसेच यामुळे शस्त्रास्त्राच्या व्यवहारात वाढ झाली असून अशाप्रकारच्या धोकादायक वस्तूच्या व्यापारामुळे त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे म्हटले आहे. यामुळे चीनने केलेल्या करारानुसार गोपनीयतेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जात...
  June 16, 01:32 PM
 • नवी दिल्ली - चीनी कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र 'पीपल्स डेली' ने पुन्हा एकदा भारतावर गरळ ओकली आहे. या वृत्तपत्राच्या संपादकीय मध्ये भारत हा अनेक वर्ष ब्रिटीशांच्या अंमलाखाली होता आणि त्यामुळे त्यांची मानसिकताही आशियायी देशांवर दबाव टाकण्याची असल्याचे म्हटले आहे. नुकतेच चीनने ब्रम्हपुत्रा नदीच्या प्रवाहाची दिशा बदलण्यावरुन भारताने चिंता व्यक्त केली होती. त्यावर मंगळवारी चीनेने या गोष्टीचा इन्कार केला होता. मात्र बुधवारी परत एकदा पीपल्स डेली मधून चीनने भारतावर हल्ला केला आहे. अरुणाच...
  June 15, 12:54 PM
 • बीजिंग- चीनमध्ये काही भागात दुष्काळाची परिस्थिती असली तरी गेल्या तीन दिवसपासून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे चीनमध्ये महापूर आला आहे. त्याचा फटका झायनिग या शहराला बसला असून या महापुरात सुमारे 94 जणांचा मृत्यू किंवा वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पुराच्या तडाख्याने हजारो लोक बेघर झाले आहेत.गेल्या तीन दिवसांत 300-३५० मिलिमीटर पावसाची तेथे नोंद झाली आहे. सर्व नद्या गच्च भरल्या असून धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. झायनिंग शहरात सर्वाधिक वित्त व जीवित हानी झाली आहे. वीज व...
  June 13, 09:47 AM
 • बिजींग- भारतातील माओवादी किंवा नक्षलवादी चळवळीला कोणत्याही प्रकारे पाठिंबा अथवा सहकार्य केले जात नसल्याचा निर्वाळा चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने दिला आहे. या संघटनांशी आमचा कुठलाही संबंध नसल्याचेही पक्षाने म्हटले आहे.कोणतेही सरकार हटविण्यासाठी हिंसक मार्गांचा अवलंब करण्याला पक्षाचा विरोध आहे, असे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) ज्येष्ठ नेते तथा राज्यमंत्री आय. पिंग यांनी म्हटले आहे. भारतातील नक्षलवादी चळवळीबाबत विचारणा केली असता माओच्या युगात अशी क्रांती योग्य...
  June 11, 01:47 AM
 • बीजिंग- दक्षिण-पश्चिम चीनमध्ये आलेल्या महापुरामुळे हाहाकार उडाला आहे. या घटनेत २१ जण ठार झाले. या पुराचे पाणी ११ शहरांत घुसले असून, अडीच लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. दरम्यान, सोमवारी आलेल्या पुरामुळे वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा कोलमडली असून शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. वॉग्मो भागाला या पुराचा तडाखा बसला आहे. येथील घरात पाणी घुसले असून काही वाहून गेले आहेत. यात २१ जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ३१ जण या घटनेत वाहून गेले आहेत. त्यांचा...
  June 9, 12:48 AM
 • बीजिंग - शीर्षक वाचून आश्चर्य वाटेल; परंतु हे खरे आहे. चीनमध्ये रोज सुमारे पाच हजार घटस्फोट होतात. स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाणातील प्रचंड तफावत व बदलते सामाजिक संदर्भ यातून चीनमध्ये ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत ही आकडेवारी लाखोंच्या घरात आहे. एका अभ्यासावरून चीनमध्ये रोज 5 हजार लोक काडीमोड घेतात. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी घटस्फोट घेणार्यांच्या संख्येत 17 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. विवाहावरून चिनी समाजात...
  June 8, 02:11 PM
 • बीजिंग- चीनने अमेरिकेच्या वरिष्ठ प्रशासन व सैनिकी अधिकारी यांचे मेल हॅक केल्याचे उघड झाल्यानंतर आता त्यांनी बीजिंगमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱयांचे जीमेल अकाऊंट हॅक केले असल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी अशी शंका व्यक्त केली आहे त्यांची गूगल अकाऊंटवर निशाना साधला आहे. चीनमध्ये यापूर्वी दूतावासात काम केलेल्या काही अधिकाऱयांनी याआधीही असे प्रकार घडल्याचे म्हटले आहे. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, ''हॅकरनी आमची जीमेल अकाऊंट प्रथम हॅक व नंतर त्याचे पासवर्ड बदलून काही मेल...
  June 4, 12:53 PM
 • भरगच्च गर्दीतून सुसाट निघालेल्या झँग गाँग याने एका कारला धडक दिली.पोलिसांना पाहताच त्याने कारचा वेग वाढवला. 15 मिनिटांच्या पाठलागानंतर तो गाठला गेला आणि सुरू झाले थरारनाट्य. चीनच्या युनान प्रांतातील ही घटना.झँगसोबत पत्नी, मुलगी होती. पोलिसांनी घेरताच झँग संतापला. मुलीला बखोटीला धरत धारदार तलवार तिच्या छातीवर ठेवून तो ओरडला. मला जाऊ द्या, नसता पोरीचा गळाच कापतो. झँगचा अवतार पाहताच सगळे स्तब्ध झाले.आक्रमक झँगला पाहून पोलिस गांगरले. पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंगवून ठेवले. थोड्याच वेळात...
  June 3, 03:29 AM
 • चीनने अमेरिकेवर सायबर हल्ला केला असून, चीनच्या हॅकर्सनी मोठ्या प्रमाणात संगणकाच्या माध्यमातून गोपनीय माहिती चोरली असून अशा स्थितीत दोन्ही देशांत तणावपूर्ण वातावरण असून अमेरिकेने सैन्य कारवाई करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे या दोन देशांत युध्दाची शक्यता निर्माण झाली आहे.चीनच्या हॅकर्सनी मोठ्या प्रमाणात अमेरिका, दक्षिण कोरिया या देशांतील परराष्ट्र पातळीवरील व संरक्षणविषयक अत्यंत गोपनीय माहिती चोरली आहे. त्याशिवाय चीनमधील सरकारविरोधी नेत्यांची बारीक-सारीक माहिती हॅक करुन...
  June 2, 01:48 PM
 • जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून नावलौकिक मिळवलेली चीन अर्थव्यवस्थेला आता भगदाढ पडू लागले आहे. तर बातमी अशी आहे की, चीनमधील अनेक कारखान्यामधील उत्पादनाची मागणी घटली असून तो गेल्या नऊ महिन्यापासून उत्पादन कमी- कमी होत आले आहे. याबाबतीत दोन पाहण्या करण्यात आल्या असून, चीनमधील कंपन्यात मे मध्ये कमी काम झाले असून, देशाच्या ब्युरो ऑफ स्टैटिक्सच्या अहवालानुसार परचेसिंग मैनैजर्स इंडेक्स (पीएमई) मध्ये मोठी घसरण झाली आहे. चीनमधील एका अर्थतज्ञांच्या म्हणण्यानुसार, मे...
  June 1, 08:35 PM
 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालक कान यांच्या राजीनाम्यानंतर युरोपीय व्यक्तीची नियुक्ती नको, अशी जाहीर भूमिका ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या देशांनी घेतली असली तरी चीनचा फ्रान्सला छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात असून नाणेनिधीच्या प्रमुखपदी भारतातील कोणतीही व्यक्ती चीनला नको आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, चीन हा फ्रान्स देशांशी सौदा करत असून फान्सचे अर्थमंत्री लागार्थ यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मात्र यापूर्वी ब्रिक्स देशांनी...
  May 26, 08:21 PM
 • बिजींग - अमेरिकेच्या लष्करी बळाला आव्हान देण्याची चीनची क्षमता नसून तैवान वेगळा काढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या फुटीरतावाद्यांचा सामना करण्याएवढीच आमची ताकद आहे, असे सांगत चिनी लष्कराचे जनरल चेन बिंगदे यांनी चीनच्या वाढत्या लष्करी सार्मथ्याबाबत अमेरिकेतील चिंता सौम्य करण्याचा प्रयत्न केला. कित्येक दशकांच्या आर्थिक सुधारणा आणि उदारीकरणानंतर देशाचे संरक्षण आणि लष्करी बळ वाढवण्याची प्रक्रिया ही 'भरपाई'च्या स्वरुपाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे नौदलप्रमुख माइक...
  May 23, 03:00 PM
 • बीजिंग - चीनने हवेतून हवेत मारा करणाऱ्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान चीनने स्वतः विकसित केले असून, हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या तंत्रज्ञानाविषयी चीनने पूर्णपणे गोपनीयता बाळगली आहे. या क्षेपणास्त्रामुळे चीनच्या लष्कराची ताकद वाढणार असल्याचे "एअर टू एअर मिसाइल रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या फन हुताओ यांनी म्हटले आहे.
  May 21, 06:52 PM
 • नवी दिल्ली - भारतात सॉफ्टवेअर निर्यातदारांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इन्फोसिस या कंपनीची शाखा आता चीनमधील शांघाय येथे सुरु होणार आहे.इन्फोसिस कंपनीने एका निवेदनाद्वारे हे स्पष्ट केले आहे. या निवेदनात दिलेल्या माहितीप्रमाणे इन्फोसिस या नविन शाखेसाठी सुमारे सव्वा ते दीड अब्ज अमेरीकन डॉलर्स इतकी गुंतवणूक करणार आहे. शांघायमधील सुमारे 15 एकर जागेवर हि शाखा उभी राहत असून, ती पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा अवधी लागणार आहे. याठिकाणी सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांना बसण्याची व्यवस्था...
  May 21, 03:39 PM
 • नवी दिल्ली - चीनच्या दिवसेंदिवस वाढणाऱया ताकदीचा विचार करून त्याचा मुकाबला करण्यासाठी भारत - अमेरिकेने नवा फॉम्युला तयार केला आहे. तिबेटचा स्वायत्त भाग तसेच पाकव्याप्त काश्मिरात ( पीओके) मध्ये चीन पाय पसरत असून हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. चीनच्या या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंग यांनी त्रिस्तरीय रणनितीचा अवलंब करण्याची शिफारस केली आहे. सिंग आणि उच्चपदस्थ अधिकाऱयांची नुकतीच पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत या अहवालावर...
  May 21, 11:04 AM
 • बिजींग - तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्यासाठी चीनची दारे खुली आहेत, असे वक्तव्य चीनने केले आहे. परंतु यासाठी लामा यांनी स्वतंत्र तिबेटच्या मागणीचा विचार सोडून द्यावा, असे म्हटले आहे. दरम्यान, लामा यांच्याशी संपर्क झाला नसल्याचेही चीनने स्पष्ट केले आहे. चीनचे तिबेटमधील उच्चाधिकाऱयाने म्हटले आहे की, हे घडू शकते मात्र ते लामा यांच्यावर अवलंबून आहे. त्यांना जर चीनमध्ये परतण्याची इच्छा असेल तर ते खुशाल येऊ शकतात. आम्ही त्यांचे स्वागत करू. त्यांच्यासाठी दार पूर्ण उघडू, असे सांकेतिकपणे...
  May 20, 04:55 PM
 • इस्लामाबाद - पाकिस्तानवर हल्ला केल्यास चीनवरच हल्ला झाला असे मानले जाईल, असा इशारा चीनने दिला आहे.लादेनवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर चीनने हा अप्रत्यक्षपणे अमेरिकेलाच इशारा दिला आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा असेही चीनने म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी सध्या चीनच्या दौऱयावर आहेत. चीनचे पंतप्रधान वेन जियाबाओ आणि गिलानी यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. जिआबाओ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषदेत गिलानी म्हणाले,'तैवान आणि...
  May 20, 03:25 PM
 • शांघाय - चीनने रविवारी दोन मानवरहित हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी केली. या हेलिकॉप्टरमधून ७५७ किलो एवढे वजन वाहून नेता येऊ शकते. वेईफॅंग शिआंग एरोस्पेस सेंटरवरून या हेलिकॉप्टरची चाचणी करण्यात आली. या हेलिकॉप्टरने चाचणीच्या वेळी दहा मिनिटे यशस्वी ७५ असे या हेलिकॉप्टरचा प्रकार आहे.
  May 20, 03:19 PM
 • नवी दिल्ली - चीनची वाढत्या ताकदीमुळे चिंतेत असलेल्या भारताने त्याला टक्कर देण्यासाठी काही नव्या उपाययोजनांवर विचार सुरू केलाय. भारताचे लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी तिबेट स्वायत्त भाग आणि पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाला टक्कर देण्यासाठी तीन स्तरिय योजना आखली आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीच्यावेळी या योजनांवर चर्चा करण्यात आली. टेकड्यांच्या प्रदेशात घुसखोरांसोबत दोन हात करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलेली...
  May 20, 11:55 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात