Home >> International >> China

China News

 • बीजिंग- चीनने आपल्या दोन दिशादर्शक (नेव्हिगेशन) उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीला सक्षम पर्याय उभा करण्याचे काम सध्या चीनमध्ये प्राधान्याने सुरू आहेत. ग्लोबल पोझिशनिंग नेटवर्कला चीन निर्मित पर्याय उभा करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या दोन उपग्रहांसह ३० छोट्या उपग्रहांचा समूह प्रक्षेपित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. द बायडू-३ असे नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाचे नाव आहे. रविवारी रात्री उशिरा मार्च- थ्री बी कॅरिअर...
  November 7, 07:10 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये आई आणि मुलाच्या लग्नाचा प्रकार समोर आलाय. हे वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसेल पण हे लग्न करण्याचे कारण अत्यंत भावनिक आहे. खरे पाहता या चार वर्षाच्या मुलाला ल्यूकेमिया हा दुर्धर आजार झालेला आहे. त्यामुळे तो अखेरच्या काही दिवसांचा सोबती आहे. त्याने आपल्या आईसोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्याच्या पालकांनी स्पेशल वेडिंग करण्याचा निर्णय घेतला. आई जगातील सर्वात सुंदर महिला... - हे वाक्य आहे चीनच्या हेलोंगजियांग प्रांताची...
  November 4, 11:55 AM
 • शांघाई - चीनमध्ये तयार होत असणाऱ्या शिमाओ वंडरलँड इंटरकॉन्टीनेंटल क्वेरी हॉटेलचे फोटो व्हायरल होत आहेत. या अल्ट्रा हायटेक हॉटेलमधील सॅम्पल रुमच्या आतील फोटो चर्चेत आहे. हे हॉटेल जमीनीपासून 100 मीटर खोलवर तयार होत आहे. या हॉटेलचे बांधकाम गेल्या पाच वर्षापासून निरंतर सुरु आहे. आतापर्यंत या हॉटेलचे मुलभूत स्ट्रक्चर तयार झालेले आहे. मात्र उर्वरीत काम वेगाने सुरु आहे. 18 मजली हॉटेलमध्ये असतील 300 खोल्या... - हे हॉटेल शांघाईच्या सोंगजियांना जिल्ह्यात तयार होत आहे. हा प्रोजेक्ट एप्रिल 2012ला सुरु...
  November 2, 01:06 PM
 • इंटरनॅशनल डेस्क - भारताच्या सीमारेषेवर डोकलामसारखे वाद रोखण्यासाठी चीनच्या लष्कराने हिंदी भाषा शिकण्याची आवश्यकता आहे. ही सूचना इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल रिलेशनच्या शांघाई अॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसच्या रिसर्च फेलो हू झियाँग यांनी केली आहे. झियाँग म्हणाले, की डोकलाम वादानंतर भारताने चीनबद्दल गैरसमज न होण्यासाठी लष्काराला मंदारिन भाषा शिकण्यास सांगितले आहे. झियाँगने सांगितले की, सीमारेषेवर तैनात असलेल्या जवानांना एकमेकांची भाषा अवगत असणे गरजेचे आहे. झियाँगच्या मते, एकमेकांची...
  November 1, 12:36 PM
 • बीजिंग/नवी दिल्ली - चीनने आपल्या दुष्काळी शिनजियांग प्रांताला कॅलिफोर्नियासारखे करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी ब्रम्हपुत्रा नदीचा प्रवाह ते शिनजियांगकडे वळविणार आहे. बीजिंग 1000 किलोमीटर लांबीची बोगदा तयार करणार आहे. या बोगद्यातून हे पाणी शिनजियांगकडे नेण्याचे नियोजन चीनने केले आहे. चीनी अभियंत्यांचे सध्या या प्रकल्पावर काम सुरु आहे. काही चाचण्याही घेतल्या जाताहेत. बीजिंगच्या या निर्णयावर पर्यावरणतज्ज्ञांसह भारताने चिंता व्यक्ती केली आहे. कारण, असे झाल्यास हिमायलयावर...
  October 31, 02:37 PM
 • शिनजियांग - जगातील दुसरे सर्वात मोठे वाळवंट असलेल्या चीनच्या धसत्या वाळवंट भागात तेल कंपन्यांच्या कामगारांनी जीव ओतला आहे. स्मशान शांतता असलेल्या या वाळवंटाला मृत्यूचा महासागर म्हणूनही ओळखले जाते. आता तेल कंपन्यांनी या वाळवंटात 15 वर्षांत 436 किमी हायवे बनवला आहे. ठिक-ठिकाणी झाडे लावून परिसर हिरवळ केला आहे. हायवे प्रोजेक्टची सुरुवात 2002 मध्ये झाली होती. तकलामाकन वाळवंट चीनच्या उत्तर-पश्चिमेतील शिनजियांग प्रांतात आहे. 3 लाख 37 हजार चौरस फुटांपर्यंत पसरलेल्या या वाळवंटाचा 85 टक्के भाग...
  October 30, 12:36 PM
 • बीजिंग- चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तिबेटच्या गुराख्यांना भारत-चीन सीमेजवळ आपली वस्ती करावी आणि चिनी क्षेत्राची सुरक्षा करावी, असे आवतण दिले आहे. प्रदेशात शांततेशिवाय लाखो कुटुंबे शांततेत जगू शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. तिबेट आपल्या गुराख्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सीमेजवळ वस्ती करण्यासाठी प्रेरणा देईल आणि चीनचा संरक्षक बनेल, अशी अपेक्षा जिनपिंग यांनी व्यक्त केली. तिबेटच्या लुंझे येथील एका कुटुंबातील दोन मुलींनी जिनपिंग यांना पत्र पाठवले होते. त्याच्या...
  October 30, 03:00 AM
 • मेक्सिको सिटी- हे फोटोज मेक्सिकोतील सेक्स वर्कर्ससाठी बनविण्यात आलेले रिटायरमेंट होम याचे आहेत. येथे प्रॉस्टिट्यूशन सोडलेल्या प्रौढ महिला राहतात. फ्रेंच फोटोग्राफर बेनेडिक्टने त्यांचे फोटोज आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत. त्याने आपल्या प्रोजेक्ट्सचा भाग म्हणून सुमारे दशकभर फॉर्मर सेक्स वर्कर्स यांचे जीवन जवळून पाहिले आहे. 300 पेक्षा जास्त वर्कर्सचा मुक्काम आहे सध्या... - बेनेडिक्टने आपल्या आठ वर्षाच्या प्रोजेक्टमध्ये 55 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या फॉर्मर सेक्स...
  October 30, 12:11 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - रशियन मॉडेल दझूबा हिचा कॅटवॉक करत असताना अचानक मृत्यू झाला. ती केवळ 14 वर्षांची होती. एका कंपनीच्या कंत्राटावर ती चीनच्या शांघाय शहरात गेली होती. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या एका मॉडेलिंग एजंसीने तिला करारावर बोलावले होते. तिच्याकडून दिवसरात्र इतके काम करून घेतले की तिला काही खाण्या-पिण्यासाठी देखील वेळ मिळत नव्हता. ती जेव्हा कॅटवॉकसाठी रॅम्पवर उतरली, त्याचवेळी चक्कर येऊन जमीनीवर कोसळली. ती कोमात गेली होती. यानंतर तिचा मृत्यू झाला. शोषण करत होती...
  October 29, 11:02 AM
 • बीजिंग- चीनच्या पूर्वेकडील शहर नॅजिंगच्या कम्युनिकेशन युनिव्हर्सिटीत विद्यार्थी- विद्यार्थिनींना नेहमी वर्गात दांडी मारण्याची सवय होती. हजेरी लावण्यासाठी विद्यार्थी एकमेकांना मदतही करत होते. यावर उपाय शोधत विद्यापीठाने विद्यार्थ्याची खरी ओळख व्हावी यासाठी फेस ट्रेस डिव्हाइसचा उपाय शोधला आहे. फेस स्क्रीनिंगआधी विद्यार्थी गायब होण्यासाठी मेकअपपासून हेअर स्टाइल बदलत होते. ७० ते ८० विद्यार्थ्यांच्या वर्गात प्राध्यापकांना हजेरीवेळी संभ्रम निर्माण होत होता. नव्या प्रणालीने...
  October 29, 03:00 AM
 • बीजिंग - चीनच्या राष्ट्राध्यक्ष पदी दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सैनिकांना युद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. जगातील सर्वात मोठे लष्कर असलेल्या चीनच्या सैन्य दलात 23 लाख जवान आणि अधिकारी आहेत. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने नुकतेच झालेल्या काँग्रेसमध्ये शी जिनपिंग यांना दुसऱ्यांदा देशाचा आणि पक्षाचा नेता निवडले आहे. भारतासाठी शी जिनपिंग यांचे लष्कराला दिलेले आवाहन लक्षवेधी ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच...
  October 27, 04:20 PM
 • बीजिंग - चीनच्या सत्ताधारी कम्यूनिस्ट पार्टीने मंगळवारी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दुसऱ्या ५ वर्षांच्या कार्यकाळावर शिक्कामोर्तब केले आहे. जिनपिंग यांची विचारप्रणाली पक्षाच्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली असून त्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या घटनेत शी जिनपिंग यांच्या नावाचा समावेश करणे म्हणजेच त्यांना पक्ष संस्थापक माआे त्सेतुंग आणि त्यांचे राजकीय वारसदार डेंग शीआपिंग यांचा दर्जा देण्यासारखे आहे. नवयुगासाठी चिनी मूल्यांवर आधारित समाजवाद(socialism with...
  October 25, 05:34 AM
 • बीजिंग - डोकलाम वाद मिटल्यानंतरही उलट-सुलट प्रतिक्रिया देणाऱ्या चीनने अखेर हा वाद मिटल्याची कबुली दिली आहे. चीनच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, सिक्किमच्या डोकलाम परिसरात 73 दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर तोडगा निघाला आहे. हा तोडगा कित्येक चर्चा आणि बैठका झाल्यानंतर काढण्यात आला असेही संबंधित अधिकाऱ्याने मान्य केले आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (PLA) अधिकारी लिऊ फांग यांनी सत्ताधारी काँग्रेसच्या चालू...
  October 23, 10:44 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - आपल्या कार्यालयातील अतिरिक्त काम पसंत नसेल तर एकदा चीनचे वर्क कल्चर आवश्य पाहावे. चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगारांचे आयुष्य अतिशय धक्कादायक आहे. अनेक स्टार्ट-अप कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना डेडलाइन देते. ही डेडलाइन शब्दशः त्यांच्यासाठी डेडलाईन ठरते. टारगेट पूर्ण करण्यासाठी त्यांना कार्यालयातच बसून जेवणे, झोपणे आणि सकाळी उठून ऑफिसमध्येच फ्रेश होऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या खुर्चीवर बसावे लागते. बॉसने संगणकासोबत मागवला बेड... तंत्रज्ञान...
  October 22, 10:49 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- दक्षिण-पूर्व आशियातील कंबोडिया देश सध्या राजकीय अस्थिरतेला तोंड देत आहे. मात्र, भारत देशाचा या देशाशी खास संबंध आहे. कारण या देशात हिंदू धर्माचे सर्वात मोठे प्राचीन मंदिर आहे. कंबोडिया पर्यटक विभागाच्या माहितीनुसार, भारतापासून जवळपास 5 हजार किलोमीटर अंतरावर कंबोडिया देशातील अंकोर येथे अंकोरवट मंदिर आहे. भगवान विष्णूंना समर्पित हे विशाल हिंदू मंदिर जगातील सर्वात मोठे पूजनस्थळ आहे. सरकार दरवर्षी करते करोडो रूपये खर्च... - जगातील सर्वात मोठे हे मंदिर तेथील सिमरिप...
  October 21, 12:10 AM
 • इंटरनॅशनल डेस्क- कॅमेरा कधीही खोटं बोलत नाही असे मानले जाते पण हे फोटोज पाहून त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. हे फोटो अशा एंगलमधून क्लिक केले आहेत की पहिल्या नजरेत काहीतरी वेगळेच वाटेल किंवा तसे दिसेल. मात्र, जर तुम्ही नीट पाहिले तरच तुम्हाला लक्षात येईल. येथे आम्ही तुम्हाला असेच 9 फोटोज दाखविणार आहोत, जे अशाच एंगलमधून क्लिक केले आहेत. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इतर फोटोज...
  October 20, 12:10 AM
 • बीजिंग- चीनमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या (सीपीसी) १९ व्या काँग्रेसला बुधवारी सुरुवात झाली. दहशतवाद, फुटीरवाद, धार्मिक कट्टरता याच्याशी एकजुटीने लढण्याचा संकल्प करतानाच सीमाप्रश्नी चर्चेतून तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. चीनच्या सर्व वैशिष्ट्यांसह समाजवादाने एका नव्या युगात प्रवेश केला आहे. चीनचा समाजवाद लोकशाही, लोकांचे मूलभूत हक्कांचे संरक्षणासाठी सर्वात व्यापक, व्यवहार्य आणि प्रभावी लोकशाही ठरली आहे, असे जिनपिंग...
  October 19, 03:00 AM
 • इंटरनॅशनल डेस्क - कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) च्या 19 वी नॅशनल काँग्रेस 18 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. दर 5 वर्षांनी होणाऱ्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वात मोठ्या संमेलनावर साऱ्या जगाची नजर असते. यातच पक्ष आणि एकूण देशाचा नेता निवडला जातो. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश चीनच्या राष्ट्राध्यक्ष पदी पुन्हा शी जिनपिंग यांची निवड निश्चित मानली जात आहे. अशी होते राष्ट्राध्यक्षाची निवड... - ऑक्टोबरमध्ये सुरुवातीला कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) देशभर आपल्या प्रतिनिधींची...
  October 18, 03:40 PM
 • बीजिंग- विद्यार्थ्यांमधील स्थूलपणा कमी करण्याची समस्या अनेक देशांत पाहायला मिळते. चीनने त्यावर अजब शक्कल लढवली आहे. लठ्ठ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना गुणांची कमाईदेखील करता येणार आहे. विद्यार्थ्यांना तंदुरुस्त व आहाराविषयी जागरूक करण्यासाठी नानजिंग कृषी विद्यापीठाने हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लठ्ठ मुला-मुलींनी आहारावर नियंत्रण केल्याचे आणि व्यायामावर भर दिला जात असल्याचे दाखवून दिल्यास त्याबद्दल...
  October 18, 03:00 AM
 • बीजिंग - चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) १८ ऑक्टोबरपासून आपले १९ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करत आहे. दर ५ वर्षांनी ही बैठक होते. तीत पक्षाला नवा नेता आणि देशाला नवे अध्यक्ष मिळतात. शी जिनपिंग हे पुन्हा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. त्याआधी ११ ते १४ ऑक्टोबरपर्यंत सीपीसीच्या मध्यवर्ती समितीची बैठक झाली. तीत जिनपिंग यांनी आपल्या अनेक निकटवर्तीयांना पक्षाचे पदाधिकारी केले आहे. जिनपिंग २०१२ मध्ये सत्तेत आले होते. तेव्हापासून त्यांची प्रतिमा खूप उंचावली आहे. जिनपिंग यांना...
  October 16, 03:11 AM
 
जाहिरात

RECOMMENDED