जाहिरात
जाहिरात
Home >> International >> China

China News

 • न्यूयॉर्क/हाँगकाँग -काश्मीरमधून ३७० कलम रद्द झाल्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांत नेणारा चीन हाँगकाँगमधील निदर्शनांमुळे संतापला आहे. त्याने हाँगकाँगच्या आंदोलकांच्या बाजूने आवाज उठवणाऱ्या देशांना धमकावणे सुरू केले आहे. पहिला इशारा कॅनडाला दिला आहे. ओटावातील चिनी दूतावासाने म्हटले की,कॅनडाने हाँगकाँगच्या प्रकरणांत हस्तक्षेप बंद करावा. हा पूर्णपणे चीनचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात कोणताही देश, संघटना किंवा व्यक्तीने दखल देऊ नये. चीनने हा इशारा कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री क्रिस्टिया...
  August 20, 09:53 AM
 • बीजिंग -चिनमधील डॉक्टरांनी रविवारी एका रुग्णाच्या आतड्यातून टूथब्रश बाहेर काढला आहे. त्याने २० वर्षांपूर्वी आत्महत्त्या करण्यासाठी गिळला होता. गुआंगडोंग राज्यातील शेनझेन शहरातील ५१ वर्षीय ली नावाच्या रुग्णाने जाणूनबुजून एक टूथब्रश गिळला होता. त्याला एचआयव्हीग्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे तो तणावात होता. जून महिन्यात त्याच्या पोटात दुखत होते. त्यामुळे त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सीटी स्कॅन केेले. तेव्हा छोट्या आतड्यांत एक अजब वस्तू...
  August 17, 10:15 AM
 • बीजिंग -जम्मू आणि काश्मीर प्रकरणी पाकिस्तानची चीनकडून निराशा झाली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या भेटीदरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले की, द्विपक्षीय मतभेद वादाचे कारण होऊ नये. भारत-पाकमधील तणावावर आमची नजर आहे. चीनने भारताकडून या मुद्द्यावर सकारात्मक प्रयत्नांची अपेक्षा व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी मदत मागण्यासाठी चीनला गेले होते. त्यानंतर चीनचे वक्तव्य आले आहे. तत्पूर्वी, सोमवारी परराष्ट्रमंत्री एस....
  August 13, 10:10 AM
 • माद्रिद / बीजिंग -स्पेनच्या शास्त्रज्ञाने चीनच्या प्रयोगशाळेत प्रथमच एक डिझायनर भ्रूण तयार केला आहे. तो माणूस आणि माकडाच्या गुणसूत्रापासून तयार केला आहे. हायब्रीड भ्रूणापासून तयार होणाऱ्या मुलांमध्ये दोघांचीही वैशिष्ट्ये असतील. कायदेशीर कारवाईपासून बचाव करण्यासाठी हा प्रयोग चीनमध्ये करण्यात आला. या भ्रूणाचा १४ दिवस विकास झाल्यानंतर बंदी आणली होती. हा निर्णय माणसात प्राण्यांचे अवयव प्रत्यारोपित करण्यासाठी महत्वाचे मानले जात आहे. स्पॅनिश संशोधक जुआन कार्लोस यांनी अानुवांशिक...
  August 5, 09:54 AM
 • बीजिंग- चीनच्या हेनान प्रांतातील यीमा शहरात शुक्रवारी एका गॅस प्लँटमध्ये स्फोट झाला. यात 10 जणांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा स्फोट शुक्रवारी स्थानीक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता झाला. ही घटना घडल्यापासून 5 लोक बेपत्ता आहेत, त्यांच्याबद्दल अद्याप काहीच माहिती मिळाली नाहीये. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्पोट टाक्यातील ज्वलनशील पदार्थामुळे झाला नाही, पण खुप जोरदार धमाका झाला असल्याचे स्थानीकांचे मत आहे. या स्फोटामुळे 3 किलोमीटर दूरवरील घराच्या काचा...
  July 20, 03:33 PM
 • शेनयांग-ईशान्य चीनच्या लायोनिंग प्रांताला बुधवारी चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळात सहा जणांचा मृत्यू झाला असून १९० लोक जखमी झाले आहेत. वादळामुळे ९ हजारांवर लोक बेघर झाले आहेत. सायंकाळी पंधरा मिनिटांत वादळाने दाणादाण उडवली. तडखा बसलेल्या भागात मदतकार्य सुरुवात झाली आहे. अग्निशमन, आरोग्य कर्मचाऱ्यांसह इतर ८०० हून जास्त कर्मचारी नागरिकांच्या मदतीला धावले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. वादळात ४३०० घरांची पडझड चक्रीवादळात ४...
  July 5, 10:33 AM
 • बीजिंग - चीनच्या सिचुआन प्रांतात रात्री भूकंपाचे दोन मोठे झटके बसले. यामध्ये किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून 122 जण जखमी झाले आहेत. चीनच्या या भूकंपाचे केंद्र यिबिन शहर होते. स्थानिक वेळेनुसार, सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास पहिला भूकंप आला. तर मंगळवारी सकाळी भूकंपाचा दुसरा हादरा बसला. या भूकंपाची तीव्रता 6 आणि 5.3 रिश्टर स्केल एवढी होती. पहिला भूकंप आला त्यावेळी बहुतांश लोक झोपेत होते. सिचुआन प्रांतात अनेक बहुमजली इमारती आहेत. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू...
  June 18, 10:37 AM
 • बिश्केक/नई दिल्ली -प्रधानमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी किर्गिस्तानच्या बिश्केकमध्ये शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषदेनिमित्त चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याबाबत चर्चा केली. मोदींनी पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. परराष्ट्र सचिवांनी दोन्ही नेत्यांत झालेल्या चर्चेची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादमुक्त वातावरण बनवण्याची गरज आहे, सध्या तसे होत...
  June 14, 09:08 AM
 • बीजिंग - हेनान प्रांतातील ११ वर्षांचा एक मुलगा अनोख्या प्रयत्नात आहे. त्याला आपल्या वडिलाचे प्राण वाचवायचे आहेत. आजारी पित्याला बोन मॅरो देण्यासाठी तो तयार झाला. खूप आहार सेवन करत, तो आपले वजन वाढवतो आहे. ११ वर्षाच्या लू याचे वडील जिकुआन आजारी आहेत. त्यांना बोन मॅरो प्रत्यारोपित करावे लागणार आहेत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु जो दाता तयार होईल, त्याचे वजन कमीत कमी ४५ किलो तरी हवे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे जिकुआन यांचा मोठा मुलगा तयार झाला. त्याने आपले वजन ३०...
  June 12, 11:49 AM
 • बीजिंग - चीनमधील ५७ वर्षीय जियाला खूप वर्षापासून नाकातून रक्त वाहत होते. तिने याकडे दुर्लक्ष केले. नंतर मात्र, तिला पश्चाताप करण्याची वेळ आली. तिचा त्रास खूप वाढल्यानंतर डाॅक्टरांना दाखवले. त्यांनी एक्स-रे काढला. तेव्हा खरे कारण समजले. तिच्या नाकात दात उगवला होता. ते एेकताच ती खूप घाबरली. तिला नाकात दात उगवल्याचे कळलेच नाही. नाकातून रक्त येणे साधारण बाब आहे, असे तिला वाटले.
  June 12, 11:47 AM
 • बीजिंग -चीनच्या दक्षिण ग्वांग्झी प्रांताला पुराचा तडाखा बसला असून शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले हाेते. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली हाेती. पुराचा फटका सुमारे १४ लाख लाेकांना बसला आहे. पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत ७ जण मृत्युमुखी पडले, तर १५ लाखांहून जास्त लोकांना त्याचा फटका बसला. पुरात फसलेल्या १.४ लाख लोकांना सुरक्षा छावण्यांत हलवण्यात आले आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात झालेल्या २४ सेंमी पावसाने पुरती दाणादाण उडवली. बचावकार्यात आपत्कालीन यंत्रणा सक्रिय असून...
  June 11, 08:16 AM
 • बीजिंग -चीनची राजधानी बिजिंगमध्ये देशातील पहिला सायकल महामार्ग सुरू झाला आहे. तीन मार्गिका असलेल्या या महामार्गाची लांबी ६.५ कि.मी असून ६ चाैरस फूट रुंद आहे. हुइलाेंगुआन आणि शांगदी या भागांना हा महामार्ग जाेडताे. या भागातून जवळपास ११,६०० लाेक राेज प्रवास करतात. व्यस्तवेळेतही या भागात माेठी वाहतूक काेंडी हाेते. लाेकांचा त्रास कमी व्हावा म्हणून हा महामार्ग तयार केला आहे. या तीन मार्गिकांवरून फक्त सायकल चालविण्यात येतील. त्यासाठी प्रती तास १५ कि.मी वेग निश्चित केला आहे. महामार्गावर...
  June 3, 11:28 AM
 • बीजिंग - चीनची लिली एअरलाइन 130 अनाथ मुलांना पायलटचे प्रशिक्षण देत आहे. हवाई प्रवास करताना येणाऱ्या अडचणींना कशाप्रकारे दूर करता येईल याबाबत त्यांना ट्रेनिंगमध्ये सांगण्यात येत आहे. अनाथ मुलांना आपले भविष्य सुधारता यावे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचा आमचा उद्देश असल्याचे लिली एअरलाइनकडून सांगण्यात आले आहे. निंबध स्पर्धेतून करण्यात आली मुलांची निवड कोर्स इंस्ट्रक्टर चांग ही यांनी सांगितले की, एअरलाइनने या प्रशिक्षणासाठी एक निबंध स्पर्धा ठेवली होती. तुम्हाला पायलट का व्हायचे?...
  May 26, 01:12 PM
 • बीजिंग- चीनच्या न्यायालयाने एका 70 वर्षीय जापानी नागरिकाला हेरगिरीच्या आरोपात 5 वर्षांची शिक्षा सुनावली. शुक्रवारी ही माहिती जापानच्या विदेश मंत्रालयने दिली. मीडिया रिपोर्टनुसार जापानी व्यक्तीला चीनच्या शेंडोंगमधून मार्च 2017 मध्ये अटक करण्या आले होते. आरोपीवर 4300 डॉलरचा दंडदेखील लावण्यात आला आहे. तपास यंत्रणेनुसार आरोपी एका चीनी कंपनीसाठी त्या परिसरात सर्वे करत होता. सरकारच्या परवानगीशिवाय करत होता सर्वे आरोपीवर तपास यंत्रणेने कोणते आरोप लावले आहेत, अजून स्पष्ट नाहीये. पण चीनच्या...
  May 18, 07:29 PM
 • बीजिंग -जर एखादी व्यक्ती हजरजबाबी नसेल तर तिला कोणाशी युक्तिवाद करणे कठीण होऊ शकते. हीच अडचण लक्षात घेऊन ताओबाओ या जगातील सर्वात मोठ्या ईकॉमर्स प्लॅटफॉर्मने अशी सेवा सुरू केली आहे, ज्याअंतर्गत चीनमध्ये कोणतीही व्यक्ती स्वत:साठी व्यावसायिक युक्तिवाद करणारी व्यक्ती भाड्याने घेऊ शकेल. ही सेवा ऑनलाइन, मोबाइल आणि एसएमएसवर होणाऱ्या युक्तिवादासाठी मिळेल. मात्र सेवेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. उदा. ही सेवा कितपत उपयोगी ठरेल, युक्तिवाद करणारा अपयशी ठरल्यास पैसे परत मिळतील का? स्थानिक...
  May 9, 10:55 AM
 • बिजिंग- चीनमध्ये एकच मुलगा अशी पॉलिसी असल्यामुळे आता तेथील तरूण मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या देशात जाऊन लग्न करत आहेत. सगळ्यात जास्त पाकिस्तानी तरूणींशी चीनी तरूणांनी लग्न केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. चीनमध्ये सध्या स्री-पुरुष असमानता असल्यामुळे असे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. या कारणासोबतच दुसरे एक कारणदेखील आहे. चीनमध्ये जर एखाद्या तरूणाकडे स्वतःच्या मालकीचा फ्लॅट नसेल तर तरूणींचे पॅरेंट्स आपली मुलगी कोणालाच देत नाहीत. चीनच्या मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती दिवसेंदिवस...
  May 7, 04:05 PM
 • झेंगझोऊ- छायाचित्रात चीनच्या हेनान राज्यात रोलर कोस्टर राइड घेताना प्रवासी दिसत आहे. हा रोलर कोस्टर फुक्सी पर्वतरांगेतील दोन किमीपेक्षा जास्त वनक्षेत्रात विस्तारलेला आहे. या रोलर कोस्टरची एका जागी सर्वाधिक उंची २०० मीटर आहे. हा जगातील सातवा सर्वात लांब रोलर कोस्टर आहे. येथे लोक चारही बाजूंनी घनदाट जंगलाचे दृश्य पाहण्यासाठी येतात. फुक्सी पर्वत जेंगझोऊ शहराच्या जवळ आहे.
  May 5, 10:41 AM
 • बीजिंग मार्व्हलच्या सुपरहीरो मालिकेतील चित्रपट अॅव्हेंजर्स एंड गेम पाहिल्यानंतर चीनमध्ये राहणारी एक तरुणी इतकी रडली की, तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयात तिला ऑक्सिजन मास्क लावावा लागला. ही २१ वर्षीय तरुणी चित्रपट पाहण्यासाठी सिनेमा हॉलमध्ये गेली होती. चित्रपट पाहिल्यानंतर तिला ही चित्रपट मालिका संपल्याचे कळले. त्याचे तिला इतके वाईट वाटले की, ती रडू लागली. अनेक तास ती रडत होती. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी सांगितले, तिचे...
  April 30, 11:44 AM
 • चीनमधील कम्युनिस्ट नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी पंतप्रधान हाेणार आहेत. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ही घाेषणा केली. त्यांचे सरकार चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग व माेदी यांच्यातील अनाैपचारिक बैठकीची तयारी करत आहे. मागील वर्षी चीनच्या वुहान शहरात ही बैठक झाली हाेती. त्याच धर्तीवर पुन्हा बैठक आयाेजित केली आहे. या वर्षी ही बैठक भारताच्या एखाद्या शहरात हाेऊ शकते. परराष्ट्र धाेरणात निवडणुकीच्या पूर्वी तयारी करणे धाेकादायक समजले जाते. कारण...
  April 30, 10:53 AM
 • बीजिंग -चीनमध्ये एक व्यक्ती दररोज नदीतून पोहून जात आॅफिसला पोहोचते. वुहान येथील रहिवासी झू बिवू (५३) याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा मार्ग शोधून काढला आहे. गेल्या ११ वर्षांपासून ते ऑफिसला पाेहून जातात. ऑफिसला जाण्यासाठी त्यांना २.२ किमी दूर अंतर पाेहून जावे लागते. यासाठी त्यांना ३० मिनिटे वेळ लागतो, तर रेल्वेने जाण्यासाठी १ तास लागतो. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, झू हेनयांग जिल्ह्यात राहतात. ते वुचांग येथील एका फूड मार्केटमध्ये मॅनेजर आहेत. झू यांनी सांगितले, केवळ वेळ...
  April 24, 12:00 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात