आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NASAच्या दाव्याने खळबळ:दर 37 हजार वर्षांनी सजीवसृष्टीचा नाश करतो लघुग्रह, यापूर्वी 4 वेळा असे घडले

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

"अथांग ब्रह्मांडातील सजीवसृष्टीचे नेतृत्व करणाऱ्या आपल्या वसुंधरेला 37 हजार वर्षांत एकदा संपूर्ण सजीवसृष्टी नष्ट होईल असा लघुग्रह धडकतो," असा धक्कादायक दावा अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था अर्थात "नासा"ने केला आहे. 1 किमीपेक्षा जास्त व्यासाचा एखादा लघुग्रह पृथ्वीला धडकला, तर पृथ्वीवरील संपूर्ण जीवन संपुष्टात येऊ शकते असे मानले जाते. या धडकेने लाखो लोकांचा मृत्यू होईल. एवढेच नाही तर त्यानंतर होणाऱ्या भयावह भूकंप, ज्वालामुखीचे विस्फोट व त्सुनामीसारख्या आपत्तीतही कोट्यवधींचा बळी जाईल.

'डेलीस्टार'च्या वृत्तानुसार, असा एखादा लघुग्रह पृथ्वीला धडकला तर राखेचे ढग सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास अडथळा निर्माण करतील. जग अनेक वर्ष अंधारात बुडून जाईल. यामुळे उर्वरित लोकांच्या जगण्याची आशा संपुष्टात येईल. विशेष म्हणजे इतिहासात अनेकदा आपल्या पृथ्वीने अशा महाकाय लघुग्रहांचा आघात सहन केला आहे. पण, प्रत्येकवेळी आपली वसुंधरा काळाच्या कसोटीवर खरी उतरली व तिने स्वतःच स्वतःची पुनर्बांधणी केली.

लघुग्रहानेच दिली ग्लोबल वॉर्मिंगला चालना

आतापर्यंत आपल्या पृथ्वीला तब्बल 4 वेळा अशा संकटांचा सामना करावा लागला आहे. सुमारे 2.229 अब्ज वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात कोसळलेल्या एका लघुग्रहाने याराबुब्बा क्रेटर (विवर) तयार झाले होते. या टक्करीपूर्वी पृथ्वी मुख्यतः एक बर्फाळ ग्रह होता. पण, याराबुब्बा धडकेमुळे ग्लोबल वॉर्मिंगला चालना मिळाली. त्यावेळी जवळपास अर्धा ट्रिलियन टन पाण्याची वाफ हवेत मिसळली. रशियाच्या उत्तर सायबेरियातील 3.50 कोटी वर्ष जुने महाकाय विवरही लघुग्रहाच्या धडकेने तयार झाले आहे. हे विवरही लघुग्रहाच्या धडकेने झालेल्या विध्वंसाचे एक आदर्श उदाहरण आहे.

लघुग्रहांमुळेच झाला डायनासोरचा अंत

मेक्सिकोतील चिक्सुलब (Chicxulub) क्रेटरही 6.60 कोटी वर्ष जुने आहे. हे क्रेटर पृथ्वीवरील डायनासोरह 75 टक्के सजीवांचा सफाया करणाऱ्या एका लघुग्रहाच्या धडकेने तयार झाल्याचे मानले जाते. सर्वात अलीकडील घटना 19 व्या शतकातील आहे, ज्यात मेक्सिकन खगोलशास्त्रज्ञ जोस बोनिला यांनी 1883 मध्ये सूर्यासमोरून मार्गक्रमण करणाऱ्या 300 हून अधिक रहस्यमय वस्तूंचा शोध लावला होता. 2011 मध्ये असे आढळून आले की, ते कदाचित कोट्यवधी टन वजनाच्या धूमकेतूचे तुकडे आहे, जे पृथ्वीपासून काहीशे किमी अंतरावरुन गेले होते.

गत महिन्यातच पृथ्वीची लघुग्रहासोबत चकमक

उल्लेखनीय बाब म्हणजे गत महिन्यातच Asteroid 388945 (2008 TZ3) नामक एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेला होता. शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 7,484,704 लाख किमी अंतरावरुन जाणाऱ्या सर्वच लघुग्रहांचा समावेश धोकादायक लघुग्रहांच्या श्रेणीत केला आहे. हा लघुग्रहही याच श्रेणीतील होता. तो मेच्या मध्यात पृथ्वीपासून 5,632,704 किमी अंतरावरुन पुढे गेला.

490 मीटर लांबीचा हा लघुग्रह अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील 440 मीटर उंच एम्पायर स्टेट बिल्डिंगहूनही मोठा होता. तो पृथ्वीला धडकला असता तर मोठा विध्वंस झाला असता. उल्लेखनीय बाब म्हणजे 1908 मध्ये पूर्व सायबेरियात कोसळणाऱ्या एका उल्कापिंडाने 200 मीटर परिघातील सर्वकाही नष्ट केले होते. 100 मीटरहून लांब असणारा कोणताही उल्कापिंड ज्वालामुखीच्या स्फोटाच्या तुलनेत जवळपास 10 पट जास्त विध्वंस घडवून आणतो.

बातम्या आणखी आहेत...