आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 1 Year Of The Capitol Attack 48% Of Americans Support Violence, Trump's Popularity Rises | Marathi News

कॅपिटलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती:हिंसाचाराचे 40% अमेरिकींद्वारे समर्थन; ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत 10 टक्के वाढ, ट्रम्प अजूनही रिपब्लिकनचे अव्वल नेते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कॅपिटल हिंसाचारातील आरोपाखाली पोलिसांनी आजवर ७०५ जणांना अटक केली आहे. त्यापैकी १६५ जणांना शिक्षाही झाली आहे. शिंगांची कॅप परिधान करून अमेरिकन समाजातील द्वेषाचा चेहरा बनलेल्या कुख्यात शामनला नोव्हेंबर २०२१ मध्ये शिक्षा झाली. तेव्हा शामन मानसिक रुग्ण असल्याचा बचाव त्याच्या वकिलाने केला आहे.

अमेरिकन संसदेवरील (कॅपिटल) हल्ल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. ६ जानेवारीला हिंसाचाराची ऐतिहासिक घटना घडली होती. या घटनेबद्दल अमेरिकेतील समाजात दोन मतप्रवाह दिसून येतात. यंदा करण्यात आलेल्या माय गॅव पाहणीनुसार ४८ टक्के लोक अद्यापही कॅपिटल हिंसाचाराचे समर्थन करतात. हिंसक कृतीमुळे विरोधकांना कडक संदेश मिळतो, असे मत ९ टक्के लोकांनी व्यक्त केले. २०२४ मधील निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला पुन्हा सत्ता मिळाल्यास ४ टक्के अमेरिकन समुदाय पुन्हा हिंसाचाराला पाठिंबा देईल, अशी धक्कादायक माहिती पुढे आली. फेब्रुवारी २०२१ च्या एपी-नॉर्कच्या पाहणीत ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत १० टक्के वाढ झाली. ट्रम्प यांनी २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी आपली दावेदारी अतिशय दमदारपणे मांडण्यासाठी रणनीती आखल्याचे दिसते. पराभूत झाल्यानंतरही ट्रम्प यांनी पक्षातील अव्वल नेता म्हणून असलेले स्थान राखले आहे. गेल्या वर्षी त्यांनी पक्षासाठी सर्वाधिक १५ लाख कोटी रुपयांचा निधी उभारला. ट्रम्प सातत्याने जाहीर सभाही घेत आहेत.

हिंसाचारात बहुतांश पोलिस-लष्कर कुटुंबातील तरुण
संसदेवरील हल्ल्याचा तपास समोर आला आहे. या घटनेत सामील बहुतांश तरुण पोलिस तसेच लष्करी कुटुंबातील होते. न्यूयॉर्क विद्यापीठातील प्रो. मायकल रोव म्हणाले, ही घटना म्हणजे अमेरिकन समाजात वाढत असलेल्या असहिष्णुतेचे प्रतीक मानली पाहिजे. अमेरिकन समाजात अनेक तरुण कृष्णवर्णीय तसेच श्वेतवर्णीय नसलेल्या इतर समुदायाबद्दल कटुतेचा भाव बाळगू लागले आहेत.

ट्रम्पविरोधी सात रिपब्लिकन सिनेटरचे अद्यापही मौन
हिंसाचाराच्या विरोधात राजीनामा देणारे व्हाइट हाऊस प्रतिनिधी व सदस्य दडून बसले आहेत. ट्रम्प यांच्याविरोधातील डेमोक्रॅटिक पार्टीच्या महाभियोग खटल्याच्या प्रस्तावाचे समर्थन करणारे उत्तर कॅरोलिनचे सिनेटर रिचर्ड बर्र, लुसियानाचे बिल कॅसेडी, सुजॉन कॉलिन्स, अलास्काच्या लिझा मुरकोव्हिस्की, युटाहच्या मिट रोमनी, नेब्रास्काच्या बेन सेसे व पेन्सिल्व्हिेनियाच्या पेट टोमी यांनीही आता मौन धारण केले आहे.

हिंसाचाराच्या विरोधात सभा : आपण दक्ष राहायला हवे, अन्यथा लोकशाहीला मोठा धोका : कमला हॅरिस
कॅपिटल हिंसाचाराच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमेरिकेत ठिकठिकाणी विरोधात सभा झाल्या. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन म्हणाले, दोनशे वर्षांचा इतिहास असलेल्या अमेरिकेच्या लोकशाहीवादी मूल्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. कोणताही पक्ष संविधानापेक्षा मोठा असू शकत नाही. सर्वांना त्याचे पालन करावे लागेल. उपाध्यक्ष कमला हॅरिस म्हणाल्या, लोकशाहीची खरी शक्ती म्हणजे कायद्याचे शासन होय. आपण सतर्क राहिलो नाही आणि बेजबाबदारपणा दाखवल्यास हा देशाच्या लोकशाहीसाठी मोठा धोका ठरू शकतो. कॅपिटल हिंसाचार अमेरिकन मूल्यांच्या विरोधात आहे. आपण सर्वांनी लोकशाही वाचवण्यासाठी योगदान दिले आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत ते गमावू शकत नाहीत. सर्वांनी एकजुटीने या दिशेने काम करायला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...