इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे 10 फोटो:2 दिवसांत 6 मुलांसह 32 जणांचा बळी; हमासचा दुसरा टॉप कमांडर ठार
इस्रायल व पॅलेस्टाईनच्या हमास या कथित अतिरेकी संघटनेमध्ये गत 2 दिवसांपासून युद्धाचा भडका उडाला आहे. त्यात 6 चिमुरड्यांसह 32 जणांचा बळी गेला आहे. इस्रायलने शुक्रवारी गाझा पट्टीत हवाई हल्ले सुरू केले. त्यात हमासचा सीनिअर कमांडर तायसीर अल जबारी मारला गेला. त्यानंतर रविवारी झालेल्या आणखी एका हल्ल्यात दुसरा कमांडर झाला झाला. इस्रायलच्या सैन्याने आपल्या माऱ्यात हमासचा दुसरा टॉप कमांडर खालिद मन्सूर मारला गेल्याचे स्पष्ट केले आहे.
2 दिवस झालेल्या हल्ल्याची काही क्षणचित्रे...
इस्रायलने हमासच्या धमकीनंतर गाझा पट्टीवर हवाई हल्ला केला. हमासनेही गत 2 दिवसांत इस्रायलवर 400 हून अधिक रॉकेट्सचा मारा केला.
इस्रायलच्या हल्ल्यात गाझा शहरातील 215 जण जखमी झालेत. हे छायाचित्र राएद राजाबीचे आहे. त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.
हे छायाचित्र पॅलेस्टाईनच्या जबलिया शरणार्थी शिबिरातील आहे. येथे रॉकेट एका कारवर येऊन पडले. त्यात कारसह आसपासच्या परिसराचे मोठे नुकसान झाले.
इस्रायली लष्कराने अनेक रॉकेट्स डागले. त्यातील एका रॉकेटने 5 मजली इमारतीचा वेध घेतला.
पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीत इस्रायलने सर्वाधिक हवाई हल्ले केले. हे छायाचित्र हल्ल्यानंतर जीवनावश्यक वस्तुंसह पलायन करणाऱ्या स्थानिक नागरिकाचे आहे.
हे छायाचित्र उत्तर गाझा पट्टीच्या बेत हानोनमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय नूर ज्वेदीच्या नातेवाईकांचे आहे. नूर हल्ल्यात मारला गेला. नातेवाईकांचे रडून बेहाल झालेत.
पश्चिम गाझा पट्टीच्या शेख एजलीन भागात राहणाऱ्या शामलाख कुटुंबाचे घरही हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहे. आता ते रस्त्यावर आलेत.
शेख एजलीन भागात झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांमुळे आपल्या घराबाहेर बसलेली ही 2 छोटी मुले.
इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या एअरस्ट्राइकला ऑपरेशन ब्रेकिंग डॉन असे नाव देण्यात आले आहे.
हा संघर्ष जवळपास 100 वर्षांपासून सुरू आहे. येथील वेस्ट बँक, गाझा पट्टी व गोलन हाइट्स सारख्या भागांवर वाद आहे.