आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिझ्झा किंग:10 हजार रु. घेऊन अमेरिकेत गेले, रेस्तराँत कुकचे काम मिळाले; आता इंडियन पिझ्झा किंग ओळख

वॉशिंग्टन / रोहित शर्माएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे सुनील सिंह यांची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. ते २००२ मध्ये ३०० डॉलर म्हणजे तेव्हाचे १० हजार रु. घेऊन अमेरिकेत आले होते. मात्र,आज ते पिझ्झा किंग म्हणून ओळखले जातात.

१९९४ मध्ये सुनील भारतात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. या दरम्यान त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना ग्रीन कार्डसाठी स्पॉन्सर केले होते. सुनील अमेरिकेत दाखल झाले. मात्र, येथे त्यांना नोकरी मिळाली नाही. कसेबसे रेस्टनच्या एका रेस्तराँमध्ये कुकची नोकरी मिळाल्याने ती केली.

१९९९ मध्ये सुनीलनी वयाच्या ३९ व्या वर्षी कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टिममध्ये पीजी कोर्स केला. यानंतर त्यांना एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळाली. मात्र, मंदीमुळे त्यांना नाेकरीवरून काढण्यात आले. यानंतर सुनील यांनी स्वत: पिझ्झा व्यवसाय सुरू केला.त्यामुळे त्यांनी पिझ्झा डिलिव्हरीचे काम केले.

३ वर्षांपर्यंत काम केल्यानंतर त्यांनी २ लाख डॉलर कमावले. २००२ मध्ये सुनीलनी पापा जॉन पिझ्झा फ्रँचायझी खरेदी केली. आता ते पापा जॉनच्या ३८ फ्रेंचाइझी आणि ८ ट्राॅपिकल स्मूथी कॅफे फ्रँचायझीचे मालक आहेत. त्यांच्या हाताखाली ७०० कर्मचारी काम करत आहेत. सुनील म्हणाले की, मी भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात मोफत पिझ्झा वाटतो यामुळे लोक पिझ्झा किंग संबोधतात.

व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेऊ नका
सुनील सिंह म्हणाले, व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा सल्ला आहे की, त्यांनी कर्ज घेऊ नये. कर्ज घेतले तरी लवकरात लवकर फेडले जावे. कोणतेही काम मोठे किंवा छोटे नसते. प्रत्येक कामासाठी तयार राहा. मी पिझ्झा डिलिव्हरीही केली. प्लॅन असल्यावरच व्यवसाय सुरू करा.

बातम्या आणखी आहेत...