आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडात इच्छामरण:1 वर्षात 10  हजार आत्महत्या, आर्थिक चणचणीतील लोकांनाही दिला जातो सल्ला

ओटावा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडात इच्छामरणाला परवानगी अडचणीची ठरत आहे. येथे गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये १० हजारांहून जास्त लोकांनी इच्छामरणाद्वारे जीव दिला. हा आकडा कॅनडात वर्षभरात झालेल्या एकूण मृत्यूंच्या ३०% पेक्षा जास्त आहे. आता ४ महिन्यांनंतर मार्च २०२३ मध्ये मानसिकदृष्ट्या आजारी लोकांनाही कायदेशीर इच्छामरणाची परवानगी मिळेल. याअंतर्गत अल्पवयीनांनाही हा हक्क दिला जाईल. एवढ्या प्रमाणात इच्छामरण करण्यामागचे कारण सांगताना “द डीप प्लेसेस : ए मेमोएर ऑफ इलनेस अँड डिस्कव्हरी’ लेखक रॉस दौतहत म्हणाले की, एक वर्षात १० हजार लोक इच्छामरण स्वीकारत असतील तर इच्छामरणाला परवानगी कोणत्याही नागरी समाजाची निशाणी होऊ शकत नाही. उलट ते दहशतीचे राज्य होते.

मात्र, देशाती बहुतांश लोक इच्छामरणाचे समर्थन करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सन्मानाने जगण्यासोबत सन्मानाने मरणेही माणसाचा हक्क आहे. एसोसिएटेड प्रेसच्या मारिया चेंग आपल्या रिपोर्टमध्ये नमूद करतात की, कॅनडात आरोग्य कर्मचारी आर्थिक तंगीमुळे त्रस्त असणारे आणि जे आत्महत्येचा विचार करतात त्यांनाही इच्छामरणाचा सल्ला देतात. रॉस दौतहत म्हणाले, हा नैसर्गिकरित्या घातक विचार आहे. असे असेच चालू दिल्यास आगामी काळात हा असा शूर समाज तयार करेल की जे लोक मृत्यूला चांगले समजू लागतील आणि हा मानवतेच्या दृष्टीने शेवटचा अध्याय ठरेल.

२०१६ मध्ये कायदा, दरवर्षी इच्छामृत्यूच्या संख्येत वाढ २०१५ मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर कॅनडात इच्छामरणाचा मार्ग मोकळा झाला. पुढील वर्षी २०१६ मध्ये कायदा झाला आणि १८ वर्षावरील लोक कोणत्याही अडचणीमुळे निराश असतील. त्यांना इच्छामरणाची परवानगी दिली जाते. यानंतर दरवर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त इच्छामरणाची प्रकरणे समोर आली आहेत. २०२१ मध्येच २०२० पेक्षा ३३% जास्त इच्छामरणाची प्रकरणे समोर आली. आता मानवी हक्क संघटनाही कॅनडातील वाढत्या इच्छामृत्यूवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...