आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 10 Years After The Victim's Family Was Formed, He Saved The Life Of An Indian By Paying Rs 1 Crore; News And Live Updates

अबुधाबी:पीडिताचे कुटुंबीय तयार झाल्यावर 10 वर्षांनंतरएक कोटी भरपाई देऊन भारतीयाचे प्राण वाचवले

अबुधाबी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघातात सुदानी तरुणाच्या मृत्यूच्या घटनेनंतर न्यायालयाने दिली होती फाशीची शिक्षा

संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) ‘ब्लड मनी’द्वारे एनआरआयने भारतीय व्यक्तीचे प्राण वाचवल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. केरळच्या बेक्स कृष्णनना २०१२ मध्ये यूएईच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. बेपर्वाईने गाडी चालवून सुदानी व्यक्तीच्या हत्येच्या प्रकरणात ते दोषी ठरले होते. तेव्हापासून कृष्णन यांचे कुटुंबीय व नातेवाईक त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होते. सुमारे १० वर्षांहून जास्त काळ पीडितेचे नातेवाईक कृष्णनला क्षमा करण्यास तयार नव्हते. जानेवारी २०२१ मध्ये ते सुदानला परतले. त्यामुळे त्यांचा संपर्क कठीण झाला.

शेवटी कृष्णन यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्ध व्यापारी व लुलू ग्रुपचे प्रमुख युसूफ अली यांची मदत मागितली. त्यांनी संपूर्ण प्रकरण समजून घेतले आणि दोन्ही बाजूंकडील लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांची ही चर्चा अनेक दिवस चालली. असंख्य वेळा पीडित कुटुंबाला समजावले. त्यांना विनवण्या करण्यात आल्या. अखेर पीडित कुटुंबाने कृष्णन कुटुंबाला माफ करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर युसूफ अली यांनी दोषीच्या सुटकेसाठी मोबदला किंवा ब्लड मनी म्हणून न्यायालयात ५ लाख दिरहम (सुमारे १ कोटी रुपये) जमा केले.

आता कृष्णन केरळला पुन्हा कुटुंबात परतू शकतो. अनेक देशांत ब्लड मनीला न्यायाची एक पद्धत मानली जाते. ही पीडित कुटुंबाला दिली जाणारी रक्कम असते. हत्येच्या प्रकरणात दोषीला ही रक्कम द्यावी लागते.

हा पुनर्जन्म, बाहेरचे जग बघण्याची आशा सोडली होती..
कृष्णन तुरुंगात भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान खूप भावुक झाले. ते म्हणाले, हा माझ्यासाठी पुनर्जन्म आहे. कारण स्वातंत्र्य मिळेल आणि आपण बाहेरचे जग पाहू अशी आशाही मी सोडली होती. कुटुंबाच्या भेटीला जाण्यापूर्वी युसूफ अली यांची भेट घेईल.

बातम्या आणखी आहेत...