आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिनेसोटा:महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा; प्रचार सभेत ट्रम्प यांचे विधान

मिनेसोटा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन डीसीमध्ये कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर झालेल्या आंदोलनात आंदोलकांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना एक कायदा आणून १० वर्षांसाठी तुरुंगात टाकणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. मिनेसोटामध्ये एका प्रचार सभेला संबोधित करत होते.

तसेच त्यांनी अब्राहम लिंकन, जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस जॅफरसनसह अनेक महापुरुषांचे पुतळे पाडले गेल्याचाही उल्लेख केला. महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केल्या प्रकरणावर ते म्हणाले, नेहमी शांततेसाठी पुढाकार घेतलेल्या गांधींनाही आंदोलकांनी सोडले नाही. या लोकांना त्यांच्या कृत्याची जाणीव नाही. हे लोक आपल्या इतिहासाला काळिमा फासत आहेत. ट्रम्प यांनी या दरम्यान मध्य पूर्व आणि आयएसआयएसचाही उल्लेख केला. दरम्यान, पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली होती.

बातम्या आणखी आहेत...