आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक आराेग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचआे) मार्गदर्शक तत्त्वानुसार काेराेनापासून बचाव करण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणे आणि मास्क घालणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. जगभरात या तीन पर्यायांची पूर्णत: अंमलबजावणी हाेईपर्यंत खूप उशीर झाला हाेता. परंतु, या दरम्यान चीनला लागून असलेल्या हाँगकाँग या लहानशा देशातील लाेकांनी सुरक्षितता बाळगण्यामध्ये तत्परता दाखवली. एका रात्रीत शाळा बंद केल्या. दर दाेन तासांनी हात धुवा असे शहरभर फलक लागले. घरातून बाहेर पडताना मास्क जरूर लावा. लाेकही मागे हटले नाहीत. हाँगकाँगमध्ये मास्क वापरण्याचे प्रमाण १०० % नाेंद झाले. फायदा असा झाला की ७५ टक्के लाेकसंख्या असलेल्या या देशात काेराेनामुळे केवळ ४ मृत्यू झाले. १,०४० संक्रमित आहेत, तर आतापर्यंत ८५९ लाेक बरे झाले आहेत. नागरिकांना सर्जिकल मास्क कमी पडू नये यासाठी येथील तुरुंगातील कैदी दर महिन्याला २५ लाख मास्क तयार करत आहेत. या काळात पश्चिम देशांमध्ये मास्कची गरज आणि त्याची क्षमता यावर वाद हाेत राहिला आणि अनेक आठवडे त्यात निघून गेले. हाँगकाँगमधील लाेकांनी १७ वर्षांपूर्वी आलेल्या सार्स महामारीच्या प्रकाेपाचा कटू अनुभव घेतला आहे. त्यातून धडा घेत येथील प्रशासनाने मास्कचे व्यापक स्तरावर उत्पादन सुरू केले.
महामारीने उंबरठा ओलांडण्याच्या आधीच ११ लाख मास्क तयार
संपूर्ण हाँगकाँग व्यापून टाकलेल्या मास्कच्या मागेही रंजक कहाणी आहे. येथील कैदी लाखाेंच्या संख्येने सर्जिकल मास्क तयार करत आहेत. यामध्ये अनेक जण जादा पैसे मिळवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत. चीनच्या सीमेवर मध्यम स्वरूपाची सुरक्षा असलेल्या लाे वु तुरुंगात फेब्रुवारीपासून २४ तास मास्क बनवण्याचे काम सुरू आहे. कैद्यांबराेबरच निवृत्त कर्मचारी व नाेकरी गमावलेले अधिकारही मास्क बनवण्यात याेगदान देत आहेत. या महामारीने उंबरठा आेलांडण्या आधीच येेथे दर महिन्याला ११ लाख मास्क तयार केले जात हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.