आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण:साडेतीन हजार वर्षांच्या संस्कृतीच्या 10 हजार नागरिकांना विजेचे मात्र वावडे!

मेक्सिकाे सिटी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन माया संस्कृतीचे लाेक अजूनही विजेचा वापर आपले घर उजळवण्यासाठी किंवा इतर कामांसाठी वापरत नाहीत. विजेच्या वापराने जीवन सुकर हाेते. परंतु विजेमुळे संस्कृती व परंपरेला धाेका हाेऊ शकताे, अशी येथील रहिवाशांची भावना आहे. विजेचा वापर वाढल्यास पर्यटकदेखील येऊ लागतील. पर्यटक आल्यास संस्कृतीला नुकसान होईल. त्यामुळेच विजेसोबत गॅसचा देखील ते वापर करत नाहीत. त्याऐवजी पारंपरिक चुलीवर भोजन तयार केले जाते. या संस्कृतीचे लोक जंगलाचे संरक्षण करतात. येथील जीवनशैलीत अनेक शतकांपासून काहीही बदल झालेला नाही. त्यामुळेच त्यांचा भोवताल निसर्गाने व्यापून टाकलेला आहे.

या संस्कृतीमधील लोकांची दिनचर्या देखील ऋतुमानावर आधारित असते. मोपान भाषिक माया संस्कृतीचे लोक बेलीज व ग्वोटमालाचे मूळ निवासी आहेत. देशात या समुदायाची लोकसंख्या १० हजारांवर आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ३ टक्के आहे. त्यामुळे या संस्कृतीला संरक्षित करण्यात आले आहे. बेलीज माया संस्कृतीच्या लोकांचे मूळ स्थान होते. परंतु आता माया संस्कृतीच्या लोकांचे अमेरिकेत ११ टक्के एवढे प्रमाण आहे. सांताक्रूझ समुदायाचे जोस मेस म्हणाले, येथील जीवन जगण्याची पद्धती उर्वरित जगापेक्षा अतिशय सुरक्षित मानली जाते. आपली भूमी व घराच्या संरक्षणासाठी या समुदायाला खूप संघर्ष करावा लागतो. जग वेगाने बदलू लागले आहे. त्यामुळे या समुदायाचा संघर्षदेखील आणखी वाढू लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...