आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायल-हमासच्या संघर्षाचे सात दिवस:इस्रायलमध्ये 10 हजार भारतीय, रात्रंदिवस बंकरमध्ये मुक्काम

आनंद चौहान, इस्रायलच्या सीमेवरील बेरसेवा शहरातूनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अध्यक्ष बायडेन यांची नेतन्याहू, पॅलेस्टाइन राष्ट्रपतींशी चर्चा

मी, पत्नी व तीन मुलींसह आमचे कुटुंब अडीच वर्षांपासून इस्रायल सरहद्दीवरील बेरसेवा शहरात राहते. आमचे शहर गाझापट्टीच्या सीमेपासून ४५ किमी अंतरावर वसलेले इस्रायली शहर आहे. पॅलेस्टाइन दहशतवादी संघटना हमासने रॉकेट हल्ले सुरू करून युद्धासारखी स्थिती निर्माण केली आहे.

इस्रायलचे सैनिकदेखील त्यांना चोख प्रत्युत्तर देताना हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करतात. तसे तर आम्ही राहत असलेल्या भागात काही प्रमाणात हानी झाली. ती सोडल्यास बहुतांश भाग सुरक्षित आहे. हमासचे अतिरेकी अधूनमधून हल्ले करू लागले आहेत. आता इस्रायलने हमासला धडा शिकवण्याचे ठरवले आहे. आता अशी परिस्थिती किती दिवस राहील हे स्पष्ट नाही. परंतु लोकांत घबराट आहे. बाजारपेठ आणि जनजीवन पाहिल्यास ही गोष्ट जाणवते. राजकोट (गुजरात) आणि उर्वरित भारतातून आमची ख्यालीखुशाली विचारली जात आहे. बेरसेवा गाझापट्टयाजवळ वसलेले असल्याने गेल्या सात दिवसांपासून संपूर्ण शहर व स्थानिक प्रतिष्ठाने बंद आहेत. सतत वॉर्निंग सायरन आणि बॉम्बस्फोटांचे आवाज कानी पडत आहेत.

इस्रायल सरकार व प्रशासन सातत्याने सुरक्षेचे उपाय करत आहेत. लोक रात्र घरात तयार केलेल्या बंकरमध्ये काढू लागले आहेत. माझ्या घरात बंकर नाही. त्यामुळे आम्ही जवळच्या एका बंकरमध्ये आहोत, अशा शब्दांत आनंद यांनी परिस्थिती सांगितली. इस्रायलमध्ये सौराष्ट्रासह १० हजार भारतीयआनंद चौहान मूळचे राजकोटच्या (गुजरात) पंचनाथ भागातील रहिवासी आहेत. आनंद यांचे आई-वडील कुटुंबासह राजकोटमध्ये राहतात. इस्रायलमध्ये आनंद यांचा किराणाचा व्यवसाय आहे. पाच-सहा दिवसांपासून व्यापार ठप्प आहे. इस्रायलमध्ये सुमारे १० हजार भारतीय आहेत. त्यापैकी २५०० ते ३ हजार गुजराती आहेत.

अध्यक्ष बायडेन यांची नेतन्याहू, पॅलेस्टाइन राष्ट्रपतींशी चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू व पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती मेहमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली. दूरध्वनीवर झालेल्या या चर्चेत बायडेन यांनी इस्रायलवरील कारवाईचे समर्थन केले. हल्ल्यात मुले व सामान्य लाेकांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. हमासने इस्रायलवरील राॅकेट हल्ले करणे बंद करावे, असे बायडेन यांनी अब्बास यांना सांगितले.

यांच्या घरी इस्रायली राजदूत
इस्रायलच्या मुत्सद्यांची एक टीम रविवारी सौम्या संतोष यांच्या घरी केरळला दाखल झाले. येथे त्यांनी सौम्या यांचा कुटुंबीयांचे सांत्वन केले. जोनाथन जडका म्हणाले, सौम्या कुटुंबाच्या मदतीसाठी आम्ही सदैव तयार राहू. हमासच्या हवाई हल्ल्यात सौम्या यांचा मृत्यू झाला होता.

नेतन्याहू म्हणाले : युद्ध दहशतवादाच्या विरोधात
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पॅलेस्टाइनसोबतच्या संघर्षासाठी हमासला दोषी ठरवले. आम्ही उद्दिष्टापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत गाझाच्या विरोधातील आमची कारवाई सुरूच राहील, असे नेतन्याहू यांनी जाहीर केले. हे युद्ध दहशतवादाच्या विरोधात आहे.

इस्रायलचे गाझावर हल्ले; ४२ जणांचा मृत्यू, ५० जखमी
इस्रायलने गाझा िसटीवर पुन्हा हवाई हल्ले केले. त्यात ४२ जणांचा मृत्यू झाला, तर ५० लाेक जखमी झाले. गाझाच्या आराेग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. गेल्या एक आठवड्यात हा इस्रायलचा गाझावरील सर्वात माेठा हल्ला आहे. इस्रायलने दाेन दिवसांत हा तिसऱ्यांदा हमास नेत्यांच्या घरांवर बॉम्बवर्षाव केला. आतापर्यंत गाझामध्ये १८८ पॅलेस्टाइन नागरिक मारले गेले तर १,२३० जण जखमी झाले. इस्रायलमध्ये १० जण ठार झाले.

आठवड्यापासून बाजारपेठ ठप्प, दहशतीचे वातावरण
छायाचित्र बेरसेवा शहरातील आहे. येथील सगळी दुकाने, बाजारपेठा आठवड्यापासून बंद आहेत. रस्त्यावर बॅरिकेड लावलेले आहेत. एवढेच नव्हे तर घाबरलेले लोक घरातून बाहेर पडत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...