आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनानर उपचार:80 देशांतील 102 आरोग्य संस्था कोरोनाचे औषध शोधत आहेत; 120 लसींचे परीक्षण सुरू, 6 देशांनी यश मिळाल्याचा दावा केला

रिर्सच डेस्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीन, अमेरीका, ब्रिटेन, इटली, इस्रायल आणि नेदरलँडने व्हॅक्सीन किंवा अँटीबॉडी तयार केल्याचा दावा केला

कोरोना महामारी जगभर पसरून 130 दिवस उलटून गेले आहेत. यादरम्यान जगभरातील 40 लाखांपेक्षा जास्त लोकांना विषाणूची लागण झाली आहे. तर, 2.7 लाख कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या महामारीला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ज्ञ आणि संशोधक याचे औषध शोधण्याच्या मागे लागले आहेत.

कोरोना, ज्याला मेडिकल भाषेत SARS-CoV-2 देखील म्हटले जाते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने सांगितल्यानुसार, या महामारीला रोखण्यासाठी 120 लसींवर परीक्षण सुरू असून, 80 पेक्षा जास्त देशातील 102 आरोग्य संघटना संयुक्तपणे या कामात लागल्या आहेत. भारत, जर्मनी, अमेरिकेतील आरोग्य संघटना सोबत मिळून संशोधन करत आहे. चीनने सर्वात आधी 4 मार्च, अमेरिकेने 24 मार्च, ब्रिटेनने 21 एप्रिल, इस्राइलने 5 मे, इटलीने 6 मे आणि नीदरलँडने 7 मे ला व्हॅक्सीन किंवा अँटीबॉडी बनवल्याचा दावा केला आहे. जगभरातील मीडियामध्येही कोरोनाच्या अँटीबॉडी, व्हॅक्सीन बनवल्याची दर दुसऱ्या दिवशी नवीन बातमी येत असते.

भारत- सीएसआयआरसह काही संस्था लसीचे परीक्षण करत आहेत

भारताती वैज्ञानिक आणि औद्योगिक संस्था (सीएसआयआर) covid-19 च्या लसीचे परीक्षण करत आहे. याशिवाय अहमदाबादमधील औषध निर्माण कंपनी हेस्टर बायोसाइंसेजने 22 एप्रिलला घोषणा केली होती की, त्यांची कंपनी भारतीय प्रौद्योगिकी संस्था गुवाहाटीसोबत मिळून कोरोनाचे औषध तयार करेल. यापूर्वी पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटने सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोरोनाचे औषध घेऊन येईल, असा दावा केला होता.

चीन- मिल्ट्री मेडिकल सायंस अकादमीने सर्वात आधी केला व्हॅक्सीन बनवण्याचा दावा

4 मार्चला चीनमधून बातमी आली होती क, 53 वर्षीय शेन वेईच्या नेतृत्वात एका टीमने मिल्ट्री मेडिकल सायंस अकादमीमध्ये कोरोनाचे व्हॅक्सीन बनवले आहे. ही चीनमधील प्रतिष्ठित अकादमी आहे, ज्यात 26 विशेषज्ञ, 50 पेक्षा जास्त शास्त्रज्ज्ञ आणि 500 पेक्षा जास्त अनुभवी लोक काम करत आहेत. याशिवाय चीनमधील तीन कंपन्या कॅनसिनो बायोलॉजिक्स, वुहान इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स, सिनोवेक बायोटेकनेदेखील व्हॅक्सीनच्या चाचण्या सुरू केल्याचा दावा केला आहे. सिनोवेक बायोटेकने मानवी चाचण्या सुरू केल्याचा दावा केला आहे.

अमेरीका- फार्मास्युटिकल कंपनी मॉडर्नाने 2020 डिसेंबरपर्यंत व्हॅक्सीन तयार होण्याचा दावा केला

अमेरिकेतील फार्मास्युटिकल कंपनी मॉडर्ना कोविड-19 च्या लसीवर काम करत आहे. कंपनीने 24 मार्चला घोषणा केली की, ते 2020 डिसेंबरपर्यंत कोरोनावर लस तयार करतील. फायजर, जॉनसन अँड जॉनसन या कंपन्यादेखील व्हॅक्सीनवर काम करत आहेत. याशिवाय गिलियड सायसेज कंपनीने रेमडेसिवर नावाचे औषध तयार केले आहे, ज्याला हायड्रोक्सीक्लोरोक्वीननंतरची सर्वात उपयोगी औषध म्हटले जात आहे. 6 मे ला जापाननेही याला मान्यता दिली आहे.

ब्रिटेन- 23 एप्रिलपासून व्हॅक्सीच्या चाचण्या सुरू, शास्त्रज्ज्ञांना 80 % यश मिळ्याची आशा

लंडनमध्ये कोरोना व्हॅक्सीनवर काम करत असलेल्या ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ज्ञांनी 23 एप्रिलपासून लसीच्या चाचण्या सुरू केल्याचा दावा केला आहे. ब्रिटेनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉकने याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आरोग्य विभाग औषध तयार करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. यासाठी संशोधकांना 2 कोटी पाउंड देण्यात आले आहेत. तसेच, यावर परीक्षण करणाऱ्या शास्त्रज्ज्ञांनी 80 % यश मिळण्याचा दावा केला आहे.

इस्राइल- आयआयबीआरने मोनोक्लोन पद्धतीने व्हायरसवर हल्ला करणारी अँटीबॉडी विकसीत केल्या

5 मे ला तेल अ‌वीवकडून माहिती आली होती की, इस्राइल इंस्टीट्यूट फॉर बॉयोलॉजिकल रिसर्च (आयआयबीआर) ने मोनोक्लोन पद्धतीने व्हायरसवर हल्ला करणारी अँटीबॉडी तयार केल्याचा दावा केला. इस्राइलचे संरक्षण मंत्री नॅफ्टली बेनेट यांचायानुसार, अँटीबॉडी मोनोक्लोनल(मानवाच्या शरीरातच व्हायरसला मारण्यास सक्षम) पद्धतीने तयार केले आहे. परंतू, या व्हॅक्सीनेच ट्रायल माणसांवर झाल्याचे त्यांनी सांगितले नाही.

इटली- टॅकिज बॉयोटेकने सर्वात अॅडव्हान्स व्हॅक्सीन असल्याचा दावा केला

6 मे ला रोममधून बातमी आली होती की, टॅकिज बॉयोटेकने चाचण्यांच्या सर्वात अॅडवांस स्टेजवरील व्हॅक्सीन तयार केल्याचा दावा केला आहे. टॅकिजचे सीईओ लुईगी ऑरिसिचियोने इटालियन न्यूज एजेंसी एएनएसएला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, लवकरच या औषधाची मानवी चाचणी केली जाईल. 

नीदरलँड-: 47D11 नावाची अँटीबॉडी कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनला ब्लॉक करण्या सक्षम

नीदरलँड्समध्ये यूट्रेच्ड यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 47D11 नावाची एक अँटीबॉडी शोधली आहे, जी कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनला ब्लॉक करते. कोरोना व्हायरस याच स्पाइक प्रोटीनच्या मदतीने मानसांच्या पेशांवर हल्ला करतो. सोशोधकांनी वेगवेगळ्या कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनला उंदरांमध्ये इंजेक्ट केले. यात SARS-CoV2, सार्स आणि मर्सचे व्हायरस सामील आहेत. यानंतर संशोधकांनी कोरोनाला हरवणारी 51 अँटीबॉडीज उंतरांपासून वेगळी केली. यात फक्त 47D11 नावाची अँटीबॉडी संक्रमण रोखण्यास सक्षम होती. 

दोन पद्धतींची होत आहे चर्चा

प्लाजमा थेरेपी-  चिकित्सकांनुसार, ज्या व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर तो ठीक होतो, अशा व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. अशा लोकांच्या रक्तातून प्लाज्मा काढून इतर रुग्णांना दिला जातो. या ट्रीटमेंट स्ट्रेटजीवर अमेरिकेसोबतच भारतदेखील काम करत आहे.
 
अँटीबॉडी-हे एक प्रोटीनपासून बनलेली विशेष इम्यून पेशी आहेत. याला बी-लिम्फोसाइटदेखील म्हटले जाते. जेव्हा शरीरात बाहेरील (फॉरेन बॉडीज) येते, तेव्हा ही शरीराला अलर्ट देते. बॅक्टीरिया किंवा व्हायरसला रोखण्याचे काम ही अँटीबॉडी करते. याप्रकारे ही शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

बातम्या आणखी आहेत...