आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वृद्धांना अधिक माेठ्या संख्येत काेराेनाची महामारी आपल्या विळख्यात घेत असल्याचे म्हटले जात आहे. यातूनच माेठ्या प्रमाणात वृद्धांना याची बाधा झाल्याची चर्चा आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्ये सध्या लंडनमधील १०६ वर्षीय काेनी यांनी काेराेनाला पराभूत करून मिळवलेला विजय हा, या सर्व चर्चा आणि नाेंदींना आव्हाना देणारा ठरत आहे. शंभरी अाेलांडणाऱ्या या आजींनी काेराेनासारख्या माेठ्या आव्हानाला यशस्वीपणे परतवून लावले आहे. त्यामुळे बर्मिंगहॅम येथे पणजी असलेल्या काेनी यांच्या लढ्याचे खास शब्दात काैतुक केले जात आहे. याशिवाय त्यांच्या या विजयाने बाधित असलेल्या वृद्धांनाही प्रेरणा मिळणार आहे. त्यांनाही या महामारीवर मात करण्याची शक्ती मिळणार असल्याचे वैद्यकीय तज्ञ म्हणतात. याशिवाय काेनी यांच्या विजयाने आता वृद्धांनाही या महामारीला पराभूत करता येऊ शकते, हेदेखील स्पष्ट केले. त्यांना सर्वच डाॅक्टरांनी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय वंशीय महिलाचेही मात; सर्वांनी केले काैतुक
साउथ लंडनमधील एका रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये भारतीय वंशीय महिलेेनेही काेराेनाला पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. याच कारणामुळे त्यांचेही रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने खास सेलिब्रेशन केले. यासाठी रुग्णालयाच्या प्रशासनाकडून अशा प्रकारच्या काैतुकातून सर्वांनाच लढण्यासाठीची प्रेरणा दिली जात असल्याची बाधितांची प्रतिक्रीया आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.