आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 1061 Patients Were Given Hydroxychloroquine And Azithromycin; 98% Is Fine, There Is No Risk To The Heart

कोरोनाची संजीवनी:1061 रुग्णांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अॅझिथ्रोमायसिन दिले; 98% ठणठणीत बरे, हृदयालाही धोका नाही

पॅरिस3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठी विशेष : कोरोनावरील औषधाच्या शोधापूर्वी फ्रान्सच्या मार्सिलेत झाले सर्वात मोठे संशोधन
  • ७४ ते ९५ वयोगटातील फक्त ५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

कोरोनावर उपचारासाठी २ औषधांची सर्वाधिक चर्चा होत आहे. एक हायड्रोक्सीक्लोरोक्वीन व दुसरी अॅझिथ्रोमायसिन. या औषधांमुळेच फ्रान्स, चीन, भारतासह बहुतेक देशांत उपचार होत असून रुग्ण वेगाने बरे होत आहेत. भारतात ही औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळेच अमेरिकेसह जगातील अनेक देश भारताकडे यांची मागणी करताहेत. फ्रान्समध्ये कोरोनाच्या १०६१ रुग्णांवर सातत्याने तीन दिवस या दोन्ही औषधाने उपचार करण्यात आले. नंतरच्या दिवशी तपासणीअंती ९७३ रुग्ण (९१.७%) पूर्णत: संसर्गमुक्त झाले. या उपचारांमुळे कोणालाही हृदयासंबंधी धोका झाला आणि याच्या सेवनाने त्यापैकी ९८% रुग्ण ठणठणीत बरे झाल्याचे निष्कर्ष आहेत. फ्रान्समधील मार्सिले येथे आयएचयू मेडिटरीन इन्फेक्शनचे विख्यात साथरोग तज्ञ प्रोफेसर दिदिएर रोल्ट यांनी सांगितले की, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अॅझिथ्रोमायसिन ही औषधे कोरोनाविरुद्ध योग्य आहेत की नाही हे शोधण्यासाठी आम्ही संशोधन केले. तीन मार्च ते नऊ एप्रिल २०१० या काळात ५९,६५५ नमुन्यांच्या चाचणीनंतर आम्ही ३८,६१७ रुग्णांची कोविड-१९ चाचणी केली. त्यात ३१६५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यापैकी १०६१ रुग्णांवर आमच्या संस्थेत उपचार झाले. या रुग्णांचे सरासरी वय ४३.६ वर्षे होते आणि त्यात ४९२ पुरुष होते. या औषधांचे उपचार आम्ही १० दिवस केले, तर ९७३ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याचे आढळले. एकाही रुग्णाला हृदयासंबंधी धोका झाला नाही. उर्वरित ८८ रुग्णांपैकी ४७ रुग्णांना दीर्घकाळापासून संसर्ग होता. तर, १० रुग्णांना आयसीयूत ठेवावे लागले. या काळात आयसीयूमध्ये ५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांचे वय ७४ ते ९५ दरम्यान होते. इतर रुग्णांना संसर्गमुक्त होईपर्यंत रुग्णालयातच ठेवले होते. 

देशात याच औषधांनी उपचार, मात्रा किती ते डॉक्टर सांगतील

भारतातही हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन-अॅझिथ्रोमायसिन देऊनच कोरोनावर उपचार होत आहेत. आयसीएमआरने ११ कोटी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि २५ लाख अॅझिथ्रोमायसिनच्या गोळ्या कोरोना उपचार करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. आयसीयूतील किंवा व्हेंटिलेटरवरील रुग्णांना हे औषध देण्यात येत आहे. हे औषध केव्हा आणि किती द्यायचे याचा निर्णय उपचार करणारे डॉक्टर घेत आहेत. कोरोनाप्रमाणे लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ही औषधे दिली जात नसल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...