आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजास्त तणाव तुमच्या डोळ्याच्या आरोग्यासाठी नुकसानकार आहे. यामुळे तुमच्या डोळ्याची दृष्टीही जाऊ शकते.एका अभ्यासात उघड झाले की, तणावाने ग्लुकोमा, दृष्टी जाण्याशिवाय डोळ्यांशी संबंधित अनेक समस्यांचा धोका वाढतो. सर्वात जास्त दृष्टी अधू होण्याची जोखमी असते.
नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात दिसले की, २०४० पर्यंत जगभरात ग्लुकोमाची रुग्णसंख्या वाढून ११ कोटींच्या आसपास पोहोचेल. कायमच्या तणावामुळे ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिममध्ये असंतुलन आणि व्हॅस्कुलर डिरेग्युलेशनमुळे डोळे आणि मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. संशोधन पथकाला हेही दिसले की, इंट्राओकुलर प्रेशरमध्ये वाढ, एंडोथेलियम डिसफंग्शन(फ्लॅमर सिंड्रोम) आणि सूज हे तणावाचे असे काही परिणाम आहेत,ज्यामुळे आणखी नुकसान होते. डोळ्यांचे मज्जातंतू आणि ब्लड व्हेसल कोर्टिसोल नावाच्या हार्मोनने प्रभावित होतात. हे डोळ्यांवर परिणाम करतात. आपण जेव्हा तणावात असतो तेव्हा डोळ्यांच्या आतील द्रवपदार्थात तणाव वाढण्यासह रक्तवाहिन्या कोरड्या पडण्याचा धोका राहतो. हे डोळ्यांच्या अनेक समस्यांचे कारण ठरते. एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांवर उपचार सुरू असतात तेव्हा यादरम्यान त्या व्यक्तीने जास्त ताण घेतल्यास डोळे बरे होण्यास वेळ लागतो. मात्र, दररोज कमीत कमी ७ ते ८ आठ झोप आवश्य घ्यावी. झोप पूर्ण न झाल्यास तणाव वाढण्याची शक्यता असते.
कॅफिन, मद्य आणि निकोटीन घटकाने तणाव वाढतो
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या इरविन स्कूल ऑफ मेडिसिनमधील सेंटर फॉर ट्रान्सलेशनल व्हिजन रिसर्चनुसार, कॅफिन, मद्य आणि निकोटीनमुळेही तणाव वाढतो. त्यामुळे आपण अँटिऑक्सिडंटची योग्य मात्र घेतली पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.