आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅरेजला आग:मालदीवमध्‍ये 8 भारतीयांसह 11 जणांचा जळून मृत्यू

माले5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालदीवची राजधानी माले येथील एका गॅरेजमध्ये गुरुवारी लागलेल्या आगीत ८ भारतीयांसह ११ जणांचा जळून मृत्यू झाला. या घटनेनंतर मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहंमद सालेह यांनी गुरुवारी होणारा प्रजासत्ताक दिन सोहळा पुढे ढकलला आहे.

दुर्घटना झालेल्या इमारतीत मोठ्या संख्येने भारतीय, श्रीलंकन व बांगलादेशी स्थलांतरित कामगार राहत होते. ही घटना रात्री १२.१७ वाजता घडली. अग्निशमन दलाने पहाटे ४.३४ वाजता आगीवर नियंत्रण मिळवले. १० लोकांचा घटनास्थ‌ळीच मृत्यू झाला, दोघांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृतांमध्ये बांगलादेशचा एक व्यक्ती आहे, तर इतर दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...