आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेराेना संकटामुळे जगभरात लाॅकडाऊनचा परिणाम पर्यावरणावरही झाला आहे. अनेक ठिकाणी वीज, काेळसा व इतर प्रदूषण पसरवणारे प्रकल्प बंद करण्यात आले आहेत. काेराेना विषाणूचे उच्चाटन करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययाेजनांमुळे पर्यावरणात नायट्राेजन डायआॅक्साइडचे प्रदूषण सरासरी ४० टक्क्यांनी घटले. त्यामुळे गेल्या ३० दिवसांत पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) प्रदूषणाच्या सरासरी स्तरात १० टक्के घट झाली आहे. त्यामुळे युराेपात हवा शुद्ध झाली आहे. परिणामी एक महिन्यात सुमारे ११ हजार लाेकांना अकाली मृत्यूच्या संकटातून बाहेर काढता आले आहे.
सेंटर फाॅर रिसर्च आॅन एनर्जी अँड क्लीन एअरच्या अहवालानुसार यादरम्यान सर्वाधिक परिणाम मुलांच्या आराेग्यावर झाला आहे. गेल्या एक महिन्यात युराेपात मुलांमधील दम्याच्या प्रकरणांत लक्षणीय घट झाली आहे. ६ हजार प्रकरणांत घट झाली. त्याशिवाय प्रसूतिपूर्व जन्मदरातही ६०० हून जास्त घट झाली. त्याचबराेबर सुमारे १९०० मुलांना आणीबाणीच्या उपचाराद्वारे वाचवण्यात यश मिळाले आहे. लाॅकडाऊनच्या काळात काेळसा व विजेचे ३७ टक्के प्रकल्प बंद हाेते. एक तृतीयांश तेल प्रकल्प बंद राहिले. त्यामुळे नायट्राेजन आॅक्साइडचे उत्सर्जनही कमी झाले. दम्याच्या रुग्णांसाठी हे उत्सर्जन घातक असते. परंतु त्यात घट झाल्याने रुग्णांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे. श्वास व फुप्फुसाच्या संसर्गाशी संबंधित कारणांमुळे लाेकांचे प्राण वाचले आहेत. स्वच्छ हवेमुळे आता त्यांच्या आराेग्यावर चांगला परिणाम घडवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.