आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडिट रेटिंग वाईट असल्यास कर्ज नाही:1.2 कोटी लोक शैक्षणिक कर्ज घेऊन पदवीधर नाहीत

अमेरिका25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत कार डिलरशिपमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यास ती पुन्हा महाविद्यालयात शिकू शकेल, अशी आशा वाटते. घरे खरेदी करता येईल का, असा विचार एक ऑपरेशन मॅनेजर करत आहेत. आपल्याला कधीही अनेक दशकांपासूनचे शैक्षणिक कर्जाचे आेझे कमी करता येणार नाही, हे वास्तव एका कस्टमर सर्व्हिसमधील कर्मचाऱ्याला जाणवू लागले आहे. हे लोक प्रातिनिधीक आहेत. कारण अमेरिकेत कोट्यवधी लोकांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी कर्ज घेतले, परंतु त्यांना त्याचा फार लाभ झाला नाही. अजूनही त्यांच्या पाठीवर शैक्षणिक कर्जाचे आेझे आहे. त्यांना चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम देखील पूर्ण पूर्ण होऊ शकलेला नाही. मात्र अध्यक्ष जो. बायडेन यांचा कर्जमाफीचा कार्यक्रम लागू झाल्यास त्यांचे कर्ज काही प्रमाणात माफ होऊ शकेल. कर्जमाफीनंतरही अमेरिकेतील महागड्या महाविद्यालयीन शिक्षणाची समस्या सुटणारी नाही. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. कार्लो सालेरनो या वर्षी एका अहवालात म्हणाले, शैक्षणिक कर्जाची परतफेड करू न शकलेल्या १.२ कोटी लोकांकडे कोणतीही पदवी नाही. ६६ टक्के श्वेत कर्जदार महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. ४७ टक्के श्वेत कर्जदार पदवीधर होऊ शकले नाहीत. बायडेन यांच्या योजनेअंतर्गत वार्षिक १.२५ लाख डॉलर (सुमारे १ कोटी रुपयेे) पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांंचे सुमारे ८ लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज माफ होणार आहे. लाभार्थींपकी गरीब कुटुंबातील सुमारे १६ लाख लोकांचे कर्ज माफ करण्याची योजना आहे. पदवीधर होऊ न शकलेल्यांवर सरासरी १२ लाखांहून कमी कर्ज आहे. असे कर्ज नेहमीच त्रासदायक ठरते. अनेकांवर तर दंड व व्याजामुळे कर्ज वाढून ते ५० हजार डॉलर (सुमारे ४० लाख रुपये) एवढे झाले आहे. कर्ज असलेल्या लोकांची क्रेडिट रेटिंग खराब होते. त्यांना कार, घरासह इतर कामांसाठी कर्ज घेणे कठीण होते.

बातम्या आणखी आहेत...