आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • International
 • 12 Days Of Mourning In Britain; Queen's Body To Be Kept For 4 Days For Funeral, To Be Buried Next To Husband Philip

ब्रिटनमध्ये 12, भारतात एक दिवसाचा दुखवटा:राणीचे पार्थिव 4 दिवस अंत्यदर्शनासाठी ठेवणार, पती फिलिपशेजारी होणार दफन

लंडन25 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले आहे. 6 फेब्रुवारी 1952 रोजी त्यांनी ब्रिटनची सत्ता हाती घेतली होती. तेव्हा त्या फक्त 25 वर्षांच्या होत्या, तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी 70 वर्षे राज्य केले. गुरुवारी त्यांचे निधन झाल्यानंतर प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे.

शाही परंपरेनुसार राणी एलिझाबेथ यांच्यावर 10व्या दिवशी म्हणजे 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथून त्यांचे पार्थिव लंडनला आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर वेस्टमिन्स्टर अॅबे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराचे विधी 12 दिवस चालणार आहेत. प्रिन्स फिलिप यांच्या शेजारी राणीला दफन केले जाईल.

अंत्यसंस्काराच्या आधी राणीचे पार्थिव चार दिवस वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ठेवण्यात येणार आहे जेणेकरून सर्वसामान्यांना श्रद्धांजली वाहता येईल.
अंत्यसंस्काराच्या आधी राणीचे पार्थिव चार दिवस वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ठेवण्यात येणार आहे जेणेकरून सर्वसामान्यांना श्रद्धांजली वाहता येईल.
18 व्या शतकापासून वेस्टमिन्स्टर अॅबे येथे कोणत्याही राजावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. मात्र, राणीच्या आईचे अंत्यसंस्कार 2002 मध्ये येथे झाले.
18 व्या शतकापासून वेस्टमिन्स्टर अॅबे येथे कोणत्याही राजावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. मात्र, राणीच्या आईचे अंत्यसंस्कार 2002 मध्ये येथे झाले.

स्कॉटलंड ते लंडनपर्यंत राणीची अंत्ययात्रा असेल

स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथून राणी एलिझाबेथ यांचे पार्थिव लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये पोहोचेल. तेथून ते वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये आणले जाईल. यादरम्यान लष्करी परेड होईल. या अंत्ययात्रेत राजघराण्यातील सदस्यांचाही सहभाग असणार आहे.

5व्या दिवशी वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये पोहोचणार पार्थिव

 • किंग चार्ल्सला राणीच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता (3.30 तास IST) सेंट जेम्स पॅलेसमध्ये नवीन राजा म्हणून घोषित केले जाईल.
 • शोकसंदेशावर सहमती देण्यासाठी संसदेची बैठक होईल. इतर सर्व संसदीय कामकाज 10 दिवसांसाठी स्थगित राहील. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदार श्रद्धांजली अर्पण करतील.
 • दुपारी 3.30 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता) पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ नवीन राजासह जनतेला संबोधित करतील.
 • सरकार राष्ट्रीय शोक कालावधीची माहिती देईल. हा राष्ट्रीय शोक 12 ते 13 दिवस चालण्याची शक्यता आहे.
 • वेस्टमिन्स्टर अॅबे, सेंट पॉल कॅथेड्रल आणि विंडसर कॅसल येथे मोठ्या घंटा वाजवल्या जातील. राणीला गन सॅल्यूट दिला जाईल. राणीच्या आयुष्यातील प्रत्येक वर्षाच्या स्मरणार्थ हायड पार्कवर 96 वेळा फायर केले जाईल.
 • नवे राजा देशाला टीव्ही संबोधन देणार आहेत. नवीन राजा म्हणून ते राणीला श्रद्धांजली वाहणार आहेत.
 • दुसऱ्या दिवशी राणीची शवपेटी बकिंगहॅम पॅलेसमध्ये परत येईल. त्यांचे पार्थिव बालमोरल येथून रॉयल ट्रेन किंवा विमानाने लंडनला नेण्यात येईल. यादरम्यान ब्रिटिश पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ पॅलेसमध्ये उपस्थित राहणार आहेत.
 • तिसऱ्या दिवशी राजा चार्ल्स युनायटेड किंगडमला भेट देतील. स्कॉटिश संसदेपासून सुरुवात करतील. त्यानंतर ते एडिनबर्ग येथील सेंट गिल्स कॅथेड्रलला भेट देतील.
 • चौथ्या दिवशी, राणी एलिझाबेथ यांचे पार्थिव बकिंगहॅम पॅलेसमधून वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये हलविण्याचा सराव तालीम केली जाईल.
 • पाचव्या दिवशी महाराणी एलिझाबेथ यांचे पार्थिव बकिंगहॅम पॅलेसमधून वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये हलवले जाईल.
 • सहाव्या दिवशी अंत्यसंस्काराची तालीम होणार आहे.
 • सातव्या दिवशी, राजा चार्ल्स वेल्स संसदेत आणखी एक शोक प्रस्ताव स्वीकारण्यासाठी वेल्सला जातील. ते कार्डिफ येथील लिआनडाफ कॅथेड्रललाही भेट देतील.
 • 10 व्या दिवशी अंत्यसंस्कार केले जातील. देशभरात २ मिनिटांचे मौन पाळण्यात येणार आहे. विंडसर कॅसल येथे एका समारंभानंतर राणीला किंग जॉर्ज VI मेमोरियल चॅपलमध्ये दफन केले जाईल.

राणीची शवपेटी रॉयल स्टँडर्डमध्ये गुंडाळली जाईल

राणी एलिझाबेथ यांचे पार्थिव शवपेटीमध्ये ठेवण्यात येईल आणि ऐबेमध्ये आणले जाईल. शवपेटी वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये आणली जाईल, रॉयल स्टँडर्डमध्ये गुंडाळली जाईल- एक प्रकारचे शाही कापड. तेथे गेल्यावर, इम्पीरियल राज्य मुकुट शवपेटीवर ठेवला जाईल. राजेशाहीचे प्रतीक असलेले ओर्ब आणि राजदंडही ठेवण्यात येणार आहे.

दिवंगत राणीशी संबंधित या बातम्याही जरूर वाचा...

25 व्या वर्षी आल्या होत्या गादीवर; 17 फोटोंमधून पाहा, महाराणींचा जीवन प्रवास...

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ-II यांचे निधन झाले आहे. 6 फेब्रुवारी 1952 रोजी किंग जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर त्या ब्रिटनच्या गादीवर विराजमान झाल्या होत्या. तेव्हा त्या फक्त 25 वर्षांच्या होत्या. तेव्हापासून 70 वर्षांपर्यंत त्या गादीवर राहिल्या. 2 दिवसांपूर्वीच त्यांनी ब्रिटनच्या 15 व्या पंतप्रधान लिझ ट्रस यांना शपथ दिली होती. एलिझाबेथ-II या ब्रिटनच्या इतिहासात दीर्घ काळ गादीवर राहिलेल्या पहिल्या महिला महाराणी आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी

ब्रिटनमध्ये शाही प्रतीके बदलली जाऊ शकतात:एलिझाबेथ यांचा फोटो हा नोट आणि नाण्यांमधून काढला जाऊ शकतो; राष्ट्रगीतही बदलणार

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे निधन झाले आहे. त्या 96 वर्षांच्या होत्या. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या मृत्यूनंतर ब्रिटनमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. प्रामुख्याने अनेक शाही प्रतीके बदलली जाऊ शकतात. यात ध्वज, नोट, नाणे यावरून महाराणी एलिझाबेथ यांचा फोटो हटवून नव्याने राजा होणारे प्रिन्स चार्ल्स यांचा फोटो लावला जाऊ शकतो. येथे वाचा संपूर्ण बातमी

15 देशांच्या प्रतिकात्मक महाराणी होत्या एलिझाबेथ:दर बुधवारी PM सोबत घेत होत्या गुप्त बैठक; सरकारी कामावरही होती नजर

ब्रिटनवर सर्वाधिक काळापर्यंत राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. त्या केवळ ब्रिटनच नव्हे तकर 14 अन्य स्वतंत्र देशांच्याही महाराणी होत्या. हे सर्वच देश केव्हा न केव्हा तरी ब्रिटीश हुकूमतीच्या अधिपत्याखाली होते. येथे वाचा संपूर्ण बातमी

एलिझाबेथ II यांचा 3 वेळा भारत दौरा:प्रजासत्ताक दिनी होत्या प्रमुख पाहुण्या, काशी नरेश सोबत हत्तीवरुन केली सिंहाची शिकार

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय आता या जगात नाहित. 96 वर्षीय राणीने स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. एलिझाबेथ-द्वितीय यांनी तीन वेळा भारताला भेट दिली होती. 1961, 1983 आणि 1997 मध्ये त्या भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या. आज आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. चला तर मग पाहूयात निवडक 10 छायाचित्रे... येथे वाचा संपूर्ण बातमी

चार्ल्स- III बनले ब्रिटनचे नवे राजे : 2.23 किलो सोन्याचा मुकुट, 70 वर्षांनंतर ब्रिटनचे राष्ट्रगीत बदलणार; वाचा कसा होईल राज्याभिषेक

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स नवे राजे झाले आहेत. ते आता राजे चार्ल्स तिसरे म्हणून ओळखले जातील. नवीन राजे म्हणून त्यांना काय म्हटले जावे, हा नवीन चार्ल्स III यांचा पहिला निर्णय आहे. परंपरेनुसार, ते चार्ल्स, फिलिप, आर्थर, जॉर्ज या चारपैकी कोणतेही एक नाव निवडू शकतात. त्याची पत्नी कॅथरीन डचेस ऑफ कॉर्नवॉल म्हणून ओळखली जाईल. येथे वाचा संपूर्ण बातमी

एलिझाबेथ यांच्या घराण्यातील वाद:मुलगा चार्ल्सची प्रेम प्रकरणे, सून डायनामुळे आले नैराश्य्य; केटच्या टॉपलेस फोटोमुळे होत्या लज्जित

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाले आहे. त्या 96 वर्षांच्या होत्या. 70 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या प्रतिमेवर कोणताही डाग नाही, परंतु या काळात राजघराण्यात तेढ आणि दुरावा निर्माण झाला होता. जरी कुटुंबातील विश्वासाला तडा गेला, अनेक प्रश्न निर्माण झाले तरी एलिझाबेथ यांनी ते हाताळण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्येक वेळी त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...