आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामारी:लसीकरण, दक्षतेमुळे बाधित रुग्णांत ब्रिटनमध्ये १२%, अमेरिकेत ५ % घट; उभय देशांनी लसीकरणात इस्रायलला पिछाडीवर टाकले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरुवातीला अमेरिका, ब्रिटनमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या सर्वाधिक; अमेरिकेने ११ कोटी लोकांना दिला डोस

कोरोना महामारीच्या या टप्प्यात दक्षता अत्यंत महत्त्वाची आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास संसर्गाचा आलेख वाढताना दिसतोय. म्हणूनच दक्षता कमी झाल्यास लसीकरण कमी होईल आणि महामारी वाढेल, असे चित्र आहे. सर्वाधिक बाधित अमेरिका, ब्रिटन व इस्रायलने वेगाने लसीकरण व दक्षतेतून संसर्गाला नियंत्रणात आणले आहे. फ्रान्स, इटली, जर्मनी, स्पेनसारख्या युरोपीय देशांनी मंद लसीकरण व लॉकडाऊनमध्ये लवकर सवलत दिल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्याची संधी गमावली आहे. आता बहुतांश युरोपीय देशांत लॉकडाऊन लागू करावा लागला आहे.

जानेवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यात दररोज सरासरी अमेरिकेत २.४५ लाख व ब्रिटनमध्ये ५८ हजार रुग्ण येत होते. दोन महिन्यांनंतर दररोज नव्या रुग्णसंख्येत ब्रिटनमध्ये १२ टक्के व अमेरिकेत ५ टक्के घट झाली आहे. ब्रिटनने १३ डिसेंबर व अमेरिकेने २० डिसेंबरला लसीकरणास सुरुवात केली होती. आता तीन महिन्यांनंतर या देशांत कोरोनाचे नवे बाधित वेगाने कमी होत आहेत. आता पुन्हा बेपर्वाई केल्यास महामारीचा नवा टप्पा येऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला. कोरोनाच्या बाबतीत दुर्लक्ष करण्याचा सर्वात जास्त फटका ब्राझीलला बसला. जगभरात सर्वाधिक संसर्ग व मृत्यू ब्राझीलमध्ये झाले.

इस्रायलचा ५५ % लोकसंख्येला डोस
जगात लसीकरणाच्या बाबतीत इस्रायल सर्वात पुढे आहे. इस्रायलने ५५ टक्के लोकसंख्येला डोस दिले आहेत. राजधानीत एक वर्षानंतर या आठवड्यात नाइट कल्ब सुरू करण्यात आले आहेत.

मृत्यू कमी करण्याची क्षमता : आरोग्य संघटना
-सध्या दोन्ही देश लसीकरणाच्या बाबतीत इस्रायलपेक्षा पुढे आहेत.
-फ्रान्समध्ये पॅरिससह १६ शहरांतील १२ काेटी लोक लॉकडाऊनमध्ये आहेत. पोलंडने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केला. तेथे संसर्ग वेगाने वाढत आहे.
-ब्राझील : ब्राझील नवे रुग्ण व दररोजचे मृत्यू याबाबतीत जगात पुढे आहे. ब्राझीलमध्ये गेल्या पाच दिवसांत सुमारे ४ लाख नवे रुग्ण आढळून आले. शनिवारी येथे गेल्या चोवीस तासांत ८९४०९ बाधित आढळले.
-ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी कोरोना लसीचा पहिला शॉट घेतला. लसीमध्ये मृत्यू कमी करण्याची क्षमता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...