आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉशिंग्टन:पाकिस्तानात 12 अतिरेकी संघटनांचे ‘पालनपोषण’, अमेरिकी संस्थेच्या अहवालात खुलासा

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात १२ अतिरेकी संघटना सक्रिय आहेत. यातील पाच सक्रिय अतिरेकी संघटनांचे लक्ष्य भारत आहे. यातील लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मुहम्मदसारख्या संघटनांचा समावेश आहे. अमेरिकी काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस (सीआरएस) च्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. सीआरएसने आपल्या अहवालात म्हटले की, अमेरिकी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानातील अनेक ऑपरेशनल बेस आणि अतिरेकी गटांची ओळख पटवली आहे. यातील काही हिंसक संघटना १९८० पासूनच पाकिस्तानात सक्रिय आहेत.

क्वाड संमेलनादरम्यान अमेरिकी काँग्रेसकडून जारी केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले की, सर्व अतिरेकी संघटनांचे संचालन पाकिस्तानातून होत आहे. या वेगवेगळ्या पाच प्रकारच्या संघटना असून त्या भारत आणि काश्मीरला लक्ष्य करत आहेत. यातील काही संघटना संपूर्ण जगालाच लक्ष्य करत आहेत तर काहींचे लक्ष्य अफगाणिस्तान आहे.

लश्कर-ए-तोयबा: लश्कर-ए-तोयबा १९८० मध्ये पाकमध्ये निर्मित संघटना आहे. २००१ मध्ये तिला जागतिक अतिरेकी संघटना म्हणून घोषित करण्यात आले. २००८ मध्ये याच संघटनेने मुंबईत हल्ला केला होता.

जैश-ए-मोहम्मद: या संघटनेची स्थापना २००२ मध्ये झाली. तिचा संस्थापक मसूद अजहर आहे. २००१ मध्ये तिचे विदेशी अतिरेकी संघटना म्हणून डिझाइन केले गेले. भारताच्या संसदेवरील हल्ल्यात याच संघटनेचा हात होता.

हरकत-उल-जिहाद-इस्लामी: ही संघटना १९८० मध्ये अफगाणिस्तानात निर्मित झाली. २०१० मध्ये ती जागतिक अतिरेकी संघटना ठरली. १९८९ नंतर तिने भारतात हल्ले सुरू केले.

हिजबुल मुजाहिद्दीन: १९८९ मध्ये ही कथितपणे पाकमधील सर्वात मोठा इस्लामिक पक्ष म्हणून स्थापन झाला. २०१७ मध्ये जागतिक अितरेकी संघटना म्हणून घोषित.

बातम्या आणखी आहेत...