आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 130 Countries Agree To Keep Global Corporate Tax At Least 15%; This Tax Will Be Levied On Facebook And Google

कार्पोरेट कर:ग्लोबल कार्पोरेट कर किमान 15% ठेवण्यावर 130 देश राजी; फेसबुक, गूगलवर आकारला जाईल हा कर

न्यूयॉर्क/ फ्रँकफर्टएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेनुसार (ओईसीडी) जगातील १३० देशांनी कार्पाेरेट कराचा दर किमान १५ टक्के ठेवण्यावर सहमती दर्शवली आहे. यामुळे गूगल, अमेझॉन, फेसबुक आणि अॅपलसारख्या टेक कंपन्यांवर किमान १५ टक्के कर आकारला जाऊ शकेल. ओईसीडीनुसार बहुराष्ट्रीय कंपन्या कुठूनही आपला व्यवहार सांभाळत असल्या तरी त्यांना संबंधित देशांत योग्य कर द्यावा लागेल. अमेरिकेकडून आलेल्या या प्रस्तावाला गेल्या महिन्यात जी-७ देशांनीही पाठिंबा दिला होता.

अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन म्हणाल्या, जागतिक किमान कराच्या या दरामुळे जगात कार्पाेरेट कर कमी करण्याच्या स्पर्धेला लगाम घालू शकेल. तर, जर्मनीने करासंबंधी न्यायाच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अत्यंत कमी कर आकारणाऱ्या आयर्लंड आणि हंगेरी या देशांनी मात्र या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. या देशात कोणत्याही प्रकारच्या टेक कंपन्यांवर अत्यंत कमी कर आकारला जात आहे. शिवाय, या कराचे प्रमाण विविध देशांत वेगवेगळे होते. या महत्त्वाच्या निर्णयास येत्या ऑक्टोबरपर्यंत अंतिम रूप दिले जाईल. २०२३ पासून हा कर लागू होईल.

बातम्या आणखी आहेत...