आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशात निवडणुकीच्या ताेंडावर हिंदूंवरील हल्ल्यांत वाढ:कट्टरवाद्यांनी हिंदुबहुल वस्तीत केली 14 मंदिरांची ताेडफाेड

ढाका2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीला एक वर्षाहून कमी कालावधी राहिला आहे. निवडणूक येताच हिंदूंच्या विराेधातील गुन्ह्यांत वाढ हाेत आहे. भारतातील पश्चिम बंगाल राज्याजवळील बांगलादेशच्या ठाकूरगाव जिल्ह्यातील १४ मंदिरांत रविवारी ताेडफाेड केल्याची घटना समाेर आली.

ठाकूरगावातील बालियादंगी येथे श्रीकृष्ण, लक्ष्मी, कालीमातेच्या मंदिरांत ताेडफाेड झाली. घटनेनंतर हिंदूंमध्ये दहशत निर्माण झाली आहे. बांगलादेश हिंदू-बाैद्ध-ख्रिश्चन एकता परिषदेचे अध्यक्ष निमचंद्र भाैमिक म्हणाले, घटना निंदनीय असून कट्टरवादी पूर्वीही निवडणुकीआधी असा हिंसाचार करत हाेते. शेख हसीना यांच्या सरकारकडून सुरक्षेबाबत हिंदूंच्या पदरी निराशा आली आहे.

दहा वर्षांत हिंदूंवर ३६०० पेक्षा जास्त हल्ले
बांगलादेशची मानवी हक्क संघटना एएसकेच्या आकडेवारीनुसार हिंदू समुदाय व मंदिरांवर १० वर्षांत ३६०० हून जास्त हल्ले झाले. त्यात १६७० पेक्षा जास्त हल्ले मंदिरांच्या ताेडफाेडीसाठी झाले.

बातम्या आणखी आहेत...