आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळाचे थैमान:द. कोरियात वादळात 14 हजार लोक बेघर, ‘हिन्नामनाेर’ वादळाने घातले थैमान

सेऊलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र दक्षिण काेरियातील उलसान शहराचे आहे. दक्षिण काेरियात ‘हिन्नामनाेर’ वादळाने शब्दश: थैमान घातले आहे. वादळाच्या तडाख्यात झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब काेसळले. सुमारे १४ हजार लाेकांना आपली घरेदारे साेडावी लागली. ३५०० लाेकांना सरकारने सुरक्षित ठिकाणी पाेहाेचवले आहे. रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे.

वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे दक्षिण काेरियात दाेन जणांचा मृत्यू झाला तर दहा लाेक बेपत्ता आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी सरकारने अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. उद्यानांमध्ये ढिगारे पडले आहेत. वादळ धडकल्यानंतर किनाऱ्यावर अनेक मीटर उंचीच्या लाटा उसळल्या.

143 ताशी वेगाने जपानच्या बेटांच्या दिशेने हिन्नामनाेरचे मार्गक्रमण सुरू. 66 हजार घरांतील वीज खंडित. गेल्या पाच दिवसांत ४१२ वेळा सतर्कतेचे इशारे देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...