आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:142 वर्षांपूर्वी बाटलीत बंद करून जमिनीत गाडलेली 21 प्रकारची बियाणी काढतात दर 5 वर्षांनी; यातून समजेल अंकुरणाचे खरे कारण

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिशिगन विद्यापीठ परिसरात वनस्पतिशास्त्रातील जगातील सर्वात जुना प्रयोग सुरू

अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्रज्ञांनी अनेक वर्षे जुन्या बियाण्याच्या अंकुराचे खरे कारण शोधले आहे. येथे जगातील सर्वात जुन्या प्रयोगांपैकी एक आजही सुरू आहे. १४२ वर्षांपूर्वी वनस्पतिशास्त्रज्ञ प्रा. विल्यम जेम्स बिल यांनी विद्यापीठ परिसरात २० बाटल्यांमध्ये २१ वेगवेगळ्या प्रकारची बियाणी भरून जमिनीत गाडली. यात काळी मोहरी, पांढरा तीळ व विविध प्रकारच्या सदाहरित वनस्पतींच्या बियाण्यांचा समावेश आहे. दर पाच वर्षांनी या बाटल्यांत ठेवलेल्या बियाण्यांमधून ५-५ बियाणी काढून पेरणी करतात व अनेक वर्षे जुने असूनही ही बियाणी अंकुरित हाेतात की नाही याचा शोध घेतात. कधी-कधी अनेक वर्षे होऊनही ती अंकुरत नाहीत.

विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी ५ वर्षांनी बुधवारी रात्री प्रयोगासाठी ती पुन्हा काढली. झाडे किती काळ जमिनीवर अस्तित्व टिकवू शकतात हे शोधण्यासाठी प्रा. बिल यांनी १८७९ मध्ये या प्रयोगाची सुरुवात केली. तसेच त्यांना जमिनीत उगवण्यासाठी काय प्रेरित करते व काही बियाणी ५० वर्षांपर्यंतही का अंकुरित होत नाहीत, यावर संशोधन करायचे होते. प्रा. बिल यांनी या संशोधनाच्या सुरुवातीलाच सिद्धांत सांगितला होता. सुरुवातीच्या काही वर्षांत १०-१५ वर्षांनंतर बियाणे अंकुरित झाले. मात्र, आता त्यांची अंकुरण क्षमता घटली आहे. पथकाच्या सदस्य प्रा. मार्जोरी वेबर सांगतात, आम्हाला ‘व्हर्बास्कम ब्लेटरिया’च्या बियाण्यातून मोठे यश मिळाले आहे. ते पिवळ्या रंगाच्या फुलांचे झाड आहे. १०० वर्षांचा काळ उलटूनही प्रत्येक वेळी त्याचेच बियाणे अंकुरित झाले. अनेक वर्षे सुकल्यानंतरही कोणते बियाणे कशा प्रकारे अंकुरित होते हे आपल्याला जाणून घेता येईल. हा प्रयोग अजून ८० वर्षे अजून सुरू राहील.

सूर्यप्रकाश बियाण्यावर पडू नये म्हणून बाटली रात्रीच काढली जाते
विद्यापीठाने या प्रयोगासाठी बियाणे रक्षक मंत्रालय स्थापन केले आहे. तरुण प्राध्यापकांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आधी दर पाच वर्षांनी बाटल्या काढल्या जायच्या. आता २० वर्षांनी काढतात. तेही सूर्यप्रकाश त्यावर पडू नये म्हणून रात्रीच्या अंधारात. असे झाल्यास बियाणे बंद बाटलीतही अंकुरित होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...