आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 15 Killed In Cafe Fire In Russia, 250 People Trapped In Cafe Rescued, Fire Started By Using Flare Gun

रशियात कॅफेला आग लागून 15 ठार:कॅफेत अडकलेल्या 250 जणांची सुटका, भांडणात फ्लेअरगन वापरल्याने उडाला आगीचा भडका

मॉस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियन शहरातील कोस्ट्रोमा येथे एका कॅफेला लागलेल्या आगीत शनिवारी 15 जणांचा मृत्यू झाला आणि 5 जण जखमी झाले, अशी माहिती वृत्तसंस्थेने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भांडणाच्या वेळी कोणीतरी उघडपणे फ्लेअर गन वापरल्यानंतर पहाटेच्या सुमारास आग लागली. माहिती मिळताच मदत बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि 250 जणांची सुटका केली. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

कॅफेत अडकलेल्यांची सुटका

या कॅफेत जवळपास शेकडो लोक होते. तथापि, आग लागल्यानंतर 250 लोकांना बाहेर काढण्यात बचाव पथक यशस्वी झाले. कोस्ट्रोमाचे गव्हर्नर सर्गेई सिटनिकोव्ह यांनी सांगितले की, पाच जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय मदत मिळाली आहे.

कॅफेत उपस्थितांमध्ये झालेल्या भांडणात फ्लेअरगन वापरल्याने आग लागल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
कॅफेत उपस्थितांमध्ये झालेल्या भांडणात फ्लेअरगन वापरल्याने आग लागल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

आगडोंब सुरू असतानाच कोसळले कॅफेचे छत

आगीच्या या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून फ्लेअर गन वापरणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. कोस्ट्रोमा हे रशियातील जवळपास 2 लाख 70 हजार लोकसंख्येचे शहर आहे. हे शहर नदीकाठी वसलेले आहे. कोस्ट्रोमा हे मॉस्कोच्या उत्तरेस अंदाजे 340 किलोमीटर (210 मैल) अंतरावर आहे.

रशियामधील मनोरंजनाच्या ठिकाणी प्राणघातक आग लागण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. 2009 मध्येही पर्म शहरातील लेम हॉर्स नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हाही ती आग कोणीतरी फटाके फोडल्यानंतर भडकली होती.

कॅफेला लागलेल्या आगीचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...