आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वाइंट काउन्सेलिंग प्रक्रिया सुरू:10 आयआयटीमध्ये 15 नव्या ब्रँच सुरू

कोटा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील २३ आयआयटी, ३२ एनआयटी, २६ ट्रिपलआयटी, ३३ जीएफटीआयच्या ५४,४७७ जागांवर प्रवेश दिला जाईल. त्यासाठी ज्वाइंट काउन्सेलिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण ११२ महाविद्यालयातील ४६९ ब्रँच भरून लॉक करण्याचा पर्याय दिला आहे.

विद्यार्थी २१ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी आणि पसंती देऊ शकतात. या वर्षी १० आयआयटींनी १५ नवीन ब्रँच सुरू केल्या आहेत. मुंबईत एनर्जी इंजिनिअरिंगच्या ४७ जागा, रुरकीत डेटा सायन्स आणि एआय ४० जागा, गुवाहाटीत एनर्जी इंजिनिअरिंगच्या २० जागा, हैदराबादेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ आयसी डिझाइनच्या १६ जागा सुरू केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...