आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकच्या समांतर बाजारास विरोध:बोलिव्हियात 15 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा

ला पाज18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोलिव्हियात कोक उत्पादक शेतकरी समांतर बाजाराच्या विरोधात रस्त्यावर उतरले. जवळपास १५ हजार शेतकऱ्यांनी ला कुम्ब्रे येथून मोर्चा काढत राजधानी ला पाजच्या दिशेने निघाले आहेत. सरकारने कोक पानांचा समांतर बाजार बंद करावा, अशी मोर्चेकऱ्यांची मागणी आहे. या बाजाराच्या माध्यमातून काही निवडक फर्म्सना प्रोत्साहन दिले जात आहे. बोलिव्हियात अंदाजे १ लाख कोक फार्म आहेत. येथे कोक शेतीस कायदेशीर मान्यता आहे. कोक संघटनांद्वारे प्रतिबंधित बाजारांत कोक पानांची खरेदी आणि विक्री कायदेशीर कक्षेत येते.

जगातील ४५% कोक बोलिव्हियात पिकते : बोलिव्हिया जगातील प्रमुख कोक उत्पादकांपैकी एक आहे. जगातील एकूण कोक पाने आणि कोक पेस्टचे ४५ टक्के उत्पादन बोलिव्हियामध्ये होते. कोकच्या शेतीवर क्वेशुआ आणि आयमारा स्वदेशी शेतकरी उत्पादकांचे नियंत्रण आहे. बोलिव्हियातील नागरिक कोकचा उपयोग दैनंदिन गरजांसोबतच वैदयकीय उपचारातही नियमितपणे करतात.

बातम्या आणखी आहेत...