आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:यंदा वापरलेले 150 काेटी मास्क समुद्राला करतील प्रदूषित, 6800 टनांहून जास्त प्लास्टिक प्रदूषण!

हाँगकाँगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेराेनामुळे यंदा बनले 5200 काेटी मास्क, पैकी 3 टक्के समुद्रात पाेहाेचणार

काेराेना विषाणू आराेग्यासाेबत विविध प्रकारच्या समस्यांनाही साेबत घेऊन आलाय. एका अहवालानुसार वापरण्यात आलेल्या मास्कमुळे यंदा सागरी जैवविविधता आणि पर्यावरण देखील प्रदूषित हाेणार आहे. वापरलेले सुमारे १५० काेटी फेस मास्क विविध माध्यमांतून समुद्रात पाेहाेचतील.

हजाराे टन प्लास्टिकमुळे सागरी पाण्यात पसरलेल्या प्रदूषणामुळे सागरी जीवसृष्टीवर संकट आले आहे. हाँगकाँगच्या पर्यावरण संरक्षण संस्था आेशियन्स एशियाने या संबंधात एक ग्लाेबल मार्केट रिसर्चच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. काेराेना विषाणूमुळे यंदा ५२०० काेटी मास्क तयार करण्यात आले आहेत. पारंपरिक गणनेच्या आधारे त्यापैकी ३ टक्के समुद्रात जातील. हे सिंगल यूज मास्क मेल्टब्लाॅन प्रकारातील प्लास्टिकने तयार केलेले असतात. त्याची बांधणी, धाेके व संसर्गामुळे त्याचे रिसायकल करणे खूप कठीण असते. कचराकुंडी असताना किंवा बेजबाबदारपणे असे मास्क फेकले जातात. तेव्हा ते समुद्रात पाेहाेचतात. अर्थात कचरा व्यवस्था यंत्रणा अपयशी ठरल्यानेही असे घडते. प्रत्येक मास्कचे वजन तीन ते चार ग्रॅम असते. त्यामुळेच अशा स्थितीत ६८०० टनांहून जास्त प्लास्टिक प्रदूषण निर्माण हाेईल. त्याला नष्ट हाेण्यासाठी ४५० वर्षे लागतील. मायक्राे व नॅनाे प्लास्टिक कण वन्य जिवांसाठी खूप हानिकारक आहेत. मास्कला कानाला लावण्यासाठी वापरलेल्या रबराची दाेरी सागरी जिवांना जाळण्यात अडकवण्याचे कारण ठरत आहे. आॅगस्टमध्ये मियामी किनाऱ्यावर स्वयंसेवकांना स्वच्छता करताना डिस्पाेजेबल मास्कमध्ये अडकलेले अनेक मासे आढळून आले हाेते. सप्टेंबरमध्ये ब्राझीलमध्ये तर मृत पेंग्विन सापडला हाेता. त्याच्या पाेटात मास्क आढळून आले हाेते. अहवालात अशी अनेक उदाहरणे आहेत.

दुसऱ्यांदा वापर, धुण्यायोग्य मास्क वापरावे

पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये यासाठी वारंवार वापरता येऊ शकतील असे मास्क वापरले पाहिजेत, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. धुता येऊ शकेल, असे मास्क वापरावेत, असे आवाहन ब्रिटनच्या रॉयल सोसायाटीने केले आहे. वापरानंतर मास्कचे कान काढून टाकावेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser