आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कर भरती:अमेरिकेत उद्दिष्टापेक्षा 15 हजार कमी युवा सेनेत भरती, काही युनिट बंद होऊ शकतात; राखीव सेनेवर ताण

अमेरिका2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी लष्करात भरती होणाऱ्या तरुणाईची संख्या सतत कमी होत आहे. वित्त वर्ष २०२२ मध्ये लष्करात झालेल्या ४५ हजार युवा भरती झाले. सरकारने मात्र, ६० हजाराचे उद्दिष्ट ठेवले होते. भरतीच्या संख्येच्या हिशेबाने १९७३ नंतर सर्वात वाईट वर्ष राहिले. लष्कर सचिव क्रिस्टीन वॉर्मुथ यांनी सांगितले की, काही युनिट बंद करावे लागू शकतात. सोबत नॅशनल गार्ड आणि राखीव लष्कराला सामान्य ड्युटीवर जावे लागू शकते.

कमी होणाऱ्या भरतीमागचे मोठे कारण कोरोना मानले जाते. लॉकडाऊनमुळे तरुणाईची शैक्षणिक कामगिरी घसरली आहे आणि मानसिक आरोग्य व लठ्ठपणासारख्या समस्याही वाढल्या आहेत. सुरक्षा दलांच्या तज्ज्ञ कॅथरीन कुजामिन्सकी म्हणाल्या, ज्या तरुणांनी शालेय शिक्षण ऑनलाइन पूर्ण केले आणि मित्रांसोबत कमी वेळ घालवला, ते लष्करात दाखल होणे किंवा महाविद्यालयात जाण्याच्या निर्णयात विलंब करत आहेत. या वर्षी लष्करी भरतीस पात्र तरुणांची टक्केवारी २९ वरून कमी होऊन २३% झाली. या पात्र तरुणांपैकी केवळ ९% लष्करात जाऊ इच्छितात. लष्कराच्या सक्तीच्या कोविड लसीकरण धोरणामुळेही भरतीवर नकारात्मक परिणाम पडला आहे. अमेरिकेत १८ ते २४ वयोगटातील एक तृतीयांश तरुणाईने कोरोना विषाणू प्रतिबंधक लस घेतली आहे.तरुणांच्या भरतीसाठी लष्कराला खासगी कंपन्यांकडूनही मोठी स्पर्धा मिळत आहे. या कंपन्या जास्त वेतन देतात.

कडक नियमांमुळे अनेक तरुण भरतीसाठी अपात्र अमेरिकी लष्करात भरती होण्याचे कठोर नियम आहेत. तरुण तंदुरुस्त असावा. गणित, विज्ञान ,भाषा परीक्षा उत्तीर्ण झाली पाहिजे. ड्रग किंवा अल्कोहोलचे व्यसन नसावे, गुन्हा केलेला नसावी.

बातम्या आणखी आहेत...