आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताचा शेजारी देश नेपाळमधील कावरेपालनचोक जिल्ह्यात एक बस पलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजधानी काठमांडूपासून 48 किमी पूर्वेला असलेल्या बेथानचौक गावाजवळ हा अपघात झाला. अपघातामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कावरेपाल्चोक जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याबाबत एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास एका हा अपघात झाला. एक धार्मिक कार्यक्रम करून लोक या बसमधून आपल्या गावाकडे परतत असताना हा अपघात झाला.
गेल्या जुलै महिन्यात नेपाळमध्ये भीषण अपघात झाला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये नेपाळमध्ये अशा प्रकारच्या अपघातांची संख्या वाढत आहे. खराब रस्ते आणि स्थानिक सार्वजनिक वाहनांच्या दयनीय अवस्थांमुळे नेपाळपमध्ये यावर्षी सतत अपघात घडत आहेत. काठमांडूला जाणारी बस नेपाळच्या बागमती प्रांतात दरीत कोसळल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला. तर या अपघातातील 30 जखमींना दरीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. रमेच्छाप जवळील खंडादेवी लुभूघाट भागात ही घटना घडली.
गतिराेधकच ठरतेय अपघाताचे कारण
पळसे गावाजवळ महामार्गावरच दोन्ही बाजूने गतिरोधक टाकण्यात आले आहे. हे दोन्ही बाजूचे गतिरोधक चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बाभळेश्वर वडगाव, मोह, शेवगे, शिंदे, नानेगाव या गावातील नागरिकांचा सर्व वावर हा पळसे गावातून याच रस्त्यावरुन हाेताेे. यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पळसे येथे ३५ कोटी रुपयांचा उड्डाणपूलासाठी डिसेंबर २०२१ मध्ये प्रस्ताव दिला होता. मात्र ताे केंद्राकडे धूळखात पडल्याने असे लहान-माेठे अपघात आता नित्याचेच झाले आहेत. आता या भीषण अपघाताने येथील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आम्ही झोपेत होतो, अचानक अख्खी बस पेटली
'आम्ही सर्व गाढ झोपेत होतो. अचानक बसची भीषण टक्कर झाल्याचे जाणवले. त्यामुळे सीटवरुन खाली कोसळले. समोर पाहते तर बसच्या पुढील भागाला आगीने वेढले होते. खिडकीतून उडी मारत कसाबसा जीव वाचवला.' नाशिक बस अपघातात वाचलेल्या अनिता सुकदेव चौधरी सांगत होत्या. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
दिंडीत टेम्पो घुसला, 7 वारकरी ठार
कोल्हापूरहून पंढरपूरकडे कार्तिक वारीसाठी निघालेल्या दिंडीत कार घुसून 7 वारकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना सांगोला - मिरज मार्गावरील जुनोनी गावाजवळ घडली. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.