आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजर्मनीत पुढील वर्षी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व तरुणांना (सुमारे ७.५ लाख) १८ हजार रुपयांचा कल्चर पास दिला जाईल. या पैशांतून त्यांनी संस्कृतीशी संबंधित पुस्तके, संग्रहालय भेट, थिएटर भेट, सांस्कृतिक चित्रपट पाहावे असा उद्देश आहे. दोन वर्षांच्या काळात हे पैसे खर्च करता येतील. ते तिकीट अॅप तसेच संकेतस्थळावरून खरेदी करू शकतात. कल्चर पासमुळे तरुणांना बाहेर जाऊन संस्कृती अनुभवण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास जर्मनीच्या सांस्कृतिक मंत्री क्लाउडिया रोथ यांनी व्यक्त केला. पॉप म्युझिक, ऑपेरा किंवा नाटकही पाहता येईल. कोरोनामुळे मुले सांस्कृतिक कार्यक्रमांपासून वंचित राहिली. स्पेननेदेखील गेल्या मार्चमध्ये यूथ कल्चर बोनस म्हणून एका रकमेची घोषणा केली होती. स्पेन सरकारच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार तरुण वर्गाला सांस्कृतिक गोष्टींबद्दल जिव्हाळा वाटावा असा या योजनेचा उद्देश आहे. सुमारे १८०० कोटी रुपयांच्या या स्पेन सरकारच्या योजनेसाठी २.८१ लाख तरुण पात्र ठरले होते. संस्कृतीवर लोक कशा प्रकारे खर्च करतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते, असे स्पेन सरकारने म्हटले होते. लाइव्ह आर्टसाठी ८५०० रुपये, पुस्तक खरेदीसाठी ४२५० रुपये दिले होते. जर्मनी व स्पेन या दोन्ही देशांच्या योजनेमागे फ्रान्सच्या कल्चर-फंड मॉडेलचे यश ही प्रेरणा होती. फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्री रिमा अब्दुल मलक यांनी त्याची २०२१ मध्ये सुरुवात केली होती. त्यात १८ वर्षीय मुलांना वर्षभर २६ हजार रुपये मिळत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.