आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना जगात / 194 देशात 18 हजार 905 लोकांचा मृत्यू, ब्रिटनमध्ये प्रिन्स चार्ल्स संक्रमित, पत्नी कॅमिला यांनाही आयसोलेट करण्यात आले

aurangabad6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनमध्ये आतापर्यंत 422 लोकांचा मृत्यू

रोम/ वॉशिंग्टन - जगातील 194 देश कोरोनाव्हायरसच्या प्रभावाखाली आले आहेत. 18 हजार 905 लोकांचा मृत्यू झाला आहे. 28 हजार 271 संक्रमित आहेत. 1 लाख 9 हजार 961 रुग्ण बरे झाले आहेत. ब्रिटनच्या क्लेरेन्स  हाऊस (रॉयल रेसिडेंस)नुसार 71 वर्षीय प्रिन्स चार्ल्स कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यानंतर त्यांची पत्नी कॅमीला यांनाही आयसोलेट करण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 422 लोकांचा मृत्यू झाला असून आठ हजार पेक्षा जास्त लोक संक्रमित आहेत. इटलीमध्ये 24 तासात 743 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 69,176 लोक संक्रमित झाल्याची माहिती समोर आली आहे. या देशात आतापर्यंत 6 हजार 820 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीतील लॉकडाऊन 3 एप्रिलला समाप्त होत आहे. 

0